शिंदे गट व फडणवीस सरकार यांनी सरकार स्थापन केलं, या सत्ता स्थापनेला जवळजवळ 20 दिवस झाले आहेत. तरी देखील या नवीन सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. पूर्ण जनतेच लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे आहे. आणि बऱ्याच वेळेस या मुद्द्यावरून विरोधकांनी नव्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. बऱ्याचदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची तारीख विचारली असता, यांच्याकडून स्पष्टपणे असं काहीही सांगितले जात नव्हतं. पण आता याबाबतची निश्चित माहिती समोर आली आहे.
नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, आणि या दिवशी 22 मंत्री आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यांमध्ये होणार असून यापैकी पहिला 22 जुलैला पार पडणार आहे. आणि जर या दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या तर हा विस्तार 23 जुलैला होणार आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली असणार आहे. शिंदे गटाचे ५ मंत्री तर भाजपचे ७ मंत्री असे एकूण १२ मंत्री शपथ घेणार आहेत. पण आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नेमकं मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार आहे याबद्दलचे कुणाचेही नाव अजून पर्यंत समोर आलेले नाही. याबाबतचे नाव अजूनही गुलदस्त्यामध्येच ठेवलेले आहेत. आणि यामध्ये विशेष सांगायचे झाले तर भाजपच्या दिल्ली हाय कमांडची मंत्रिमंडळ विस्तारावर बारीक नजर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सविस्तर माहिती अशी की, मंत्रिमंडळामध्ये भाजपला 29 कॅबिनेट मंत्री पद हवी आहेत. तर शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री अशी एकूण १३ मंत्रिपद हवी आहेत. या आधी शिंदे गटांमध्ये शिवसेनेचे ७ मंत्री आहेत. शिंदे गटाने 40 बंडखोर आमदार आणि१० अपक्ष असे एकूण 50 आमदार शिंदे गटामध्ये सामील आहेत आणि यामुळे शिंदे गटाला जास्त मंत्रिपद हवी आहेत. ६ आमदारांमागे १ मंत्री पद द्या शिंदे गटाकडून अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण 19 मंत्रीपद शिंदे गटाला पाहिजे आहेत. अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. पण यामध्ये भाजपकडून याला अजून पर्यंत होकार दिलेला नाही. आणि एवढेच नाही तर भाजपमध्ये चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये नको आहेत व सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद द्यावे अशी इच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या विस्तार रखडलेला होता.
यामध्ये अंदाजे कोणत्या पक्षाला कोणती खाती जातील याकडे आपण नजर टाकू,
नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडे असतील. तर नगर विकास आणि महसूल ही खाते शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. सुधीर मनगंटीवार यांच्याकडे अर्थ खात जाऊ शकते. तर दादा भुसेंकडे पूर्वीचे कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांनाही एकदा चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळू शकते. त्यांच्यासोबत शंभूराज देसाई व अब्दुल सत्ता या राज्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळू शकतात.