ब्रेकिंग : मंदिरातून दानपेटी चोरीला जाते पण, या गावातून ” देवच ” गेले चोरीला, पहा बातमी सविस्तर.
गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवा. आपल्या लहान मुलांना लक्ष ठेवा. आपल्या वस्तू आपल्या सोबत ठेवा. चोरटे धुमाकूळ घालत आहेत. पाकीटमार करणारे चोरटे आहेत. चैन साखळी चोरटे आहेत यांच्यापासूनच सावध राहा असा आवाज तुम्ही आयुष्यात कित्येक वेळी ऐकत असाल.
गर्दीच्या ठिकाणी जात असाल, यात्रा – जत्रा असेल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की, सावधान राहा आणि आपल्या वस्तूंची काळजी घ्या. मात्र तरी देखील दरोडे पडतात, चोऱ्या होतात. मग पोलीस प्रशासन या चोरट्यांना मोठी कसरत करून पकडतात आणि जबर शिक्षा करून त्यांच्याकडून जप्त झालेल्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा घेतात.
मात्र तुम्ही कधी ऐकले का ? देव चोरीला गेलाय ? खरच देव चोरीला गेलाय ही घटना आहे जालना जिल्ह्यातील जाम रामदास समर्थ यांच्या जन्म गावी चक्क देव चोरीला गेला. साडेचारशे वर्षांपूर्वी पासूनच्या असलेले हे देव अचानक चोरट्याने चोरून नेले. हे देव का चोरी गेले असतील या देवांमध्ये काय रहस्य आहे किंवा या देवांमुळे काय होणार आहे चोरटे हे नेहमी वस्तू रक्कम यांच्यावरती दरोडे टाकत असतात मात्र चोरट्याने देवावरती डल्ला टाकलाय.
आणि त्यामुळे जाम समर्थ गावातील सर्व ग्रामस्थ हे अस्वस्थ आहेत. त्यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलाय कारण रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या या मूळ गावात कधीकाळी रामदास स्वामी यांनी देखील या देवांची पूजा केली आहे. त्यामुळे आमची या देवांवर अपार श्रद्धा आहे. ही भावना आपण कुठून आणणार मुर्त्या तुम्ही बदलू शकता मुर्त्या आणू शकतात मात्र आमचा देवच आम्हाला हवा आहे असा गावकरी आग्रह करत आहे.
देव चोरीला गेलेले आहेत हे देव नेमके कोणते आहे तर पंचधातुनी घडवलेल्या पाच ते सहा मुर्ती आहेत. त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की, राम लक्ष्मण सीता हे 14 वर्षे वनवासाला गेले वनवासात त्यांनी काय काय गोष्टी केला याची प्रचिती इथल्या प्रत्येकाला आहे. मात्र राम लक्ष्मण हे जाम समर्थ गावातून चोरीला गेले आहेत. गावकऱ्यांनी पोलिसांच्या आदेशानुसार गाव पिंजून काढलं वाड्यावर ती शेतात वाटेल तिकडे संशय येईल त्या भागामध्ये आपला देव सापडतोय का हे पाहिलं मात्र देव कुठेही सापडला नाही.
त्यानंतर रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण महाराज यांनी देखील या घटनेबद्दल नाराजगी व्यक्त केली. त्यांनी अन्नत्यागाचा इशारा दिला मात्र गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग दाखवत पुढील दोन दिवस हे प्रशासनासाठी दिले आहेत. दोन दिवसात आमचे देव आम्हाला आणून द्या अन्यथा संपूर्ण गाव अन्न त्याग करणार आहे. हा मुद्दा विधानसभेत देखील चर्चेला होता पोलीस प्रशासन देव शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या मुर्त्या चोरीला का गेल्या किंवा यामागे काय कारण आहे हे देखील आता शोधले जाते. मात्र महाराष्ट्रात देव चोरीला जाणारी ही पहिलीच घटना घडली कारण देवळातून दानपेटी चोरीला जाते देवळातून चपला चोरीला जातात मात्र देवळातून देव चोरीला गेले ते ही घटना जालना जिल्ह्यात घडली.