ब्रेकिंग : नाशिकमधील शाळेत विषबाधा, तब्बल एवढा मुलांना झाली विषबाधा. पहा बातमी सविस्तर
नाशिक मधून एक मोठी माहिती समोर येते आहे नाशिक मधील विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर बुधवारी पहाटे सुमारास आठ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याची माहिती मिळाली. इगतपुरी मध्ये मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अन्नातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतरच्या चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे या घटनेमुळे इगतपुरी जिल्हाभरात खळबळ उडाली आहे अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटने नंतर तेथील आरोग्य विभाग, तसेच तेथील पदाधिकारी काय निर्णय घेतील हे पाहणे अत्यंत महत्वाचं आहे.