ब्रेकिंग : बंडखोर एकनाथ शिंदे, आमदार ४८ तासात मुंबईत हजर होणार ?
काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल. एकदम ओके !! ही बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना आपण देखील पाहिले आहे. पण आता अशाप्रकारे शिवसेनेसोबत गद्दारी करून बंड पुकारून जे आमदार गुवाहाटीच्या प्रेमात पडले आहे अशांसाठी आता पुन्हा माघारी निघा असे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या राज्याचे राज्यपाल आजारपणातून नीट होऊन राजभवनावर दाखल झाले आहेत त्यामुळे जी काही राजकीय वर्तुळातील हालचाली होत्या त्यांना कमालीचा वेग आलेला आहे. असे आपल्याला म्हणता येईल त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे बंडखोर आमदार आहेत त्यांना 48 तासांमध्ये मुंबईमध्ये या अशी सूचना देण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या रात्री पर्यंत सर्व आमदार मुंबईमध्ये दाखल होतील.सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याची सूचना देण्यात आली आहे
त्याचप्रमाणे मुंबईमधील विमानतळाला अलर्ट केल गेल आहे. विशेष अधिकार वापरून या परिस्थितीचा आढावा घेऊन आमदारांना माघारी येण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना पक्षासोबत शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी जो काही बंड पुकारला आहे त्याचा आज पाचवा दिवस आहे. एकनाथ शिंदे पाच दिवसापासून बंडखोर आमदार घेऊन गुवाहाटी मध्ये आहे. राज्यपाल हे कोरोना सारख्या आजारामुळे दवाखान्यात होते आणि त्यातून त्यांनी आजारावर मात करून राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे गुवाहाटी मधील जे आमदार आहेत त्यांना 48 तासांमध्ये मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या वकिलांची एक ते हाय कोर्ट आणि एक दिन सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे. जनसामान्य आता फक्त या निर्णयाकडे वाट पाहून आहेत कि अखेर सत्ता कोणाची असणार आहे आणि बंडखोर आमदार विरुध्द शासन काय निर्णय घेणार आहे.