Breaking : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; जोराच्या धडकेत होत्याच नव्हतं झालं..
”प्रवास करत असताना आती घाई संकटात नाही” असे स्लोगन तुम्ही बऱ्याचदा पहात असाल, आणि तसाच प्रकार क्रिकेटपटूच्या कार एक्सीडेंट मध्ये देखील घडला, प्रचंड गती असल्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि महागडी बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाली, अनियंत्रित कारचा वेग असल्यामुळे ही कार डिव्हायडरला जोरदार धडकली.अपघाताच्या अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत, यामध्ये अनेक मोठमोठ्या गाड्यांना देखील अपघात होतात अशीच एक दुःखद घटना समोर येत आहे
क्रिकेटरच्या गाडीला अपघात झाला अपघात इतका भयंकर होता की यामध्ये महागडी असणारी बीएमडब्ल्यू ही कार जळून खाक झाली , हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्या असल्याची बातमी समोर येते यामध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंत यांना जबर मार लागला त्यांचा पायही फॅक्टर आहे तसेच त्यांच्या डोक्यालाही मोठे दुखापत झाल्याची बातमी समोर येते या घटनेचे cctv फुटेज सर्व हाती आले आहेत, या गाडीचा कशा पद्धतीने भीषण अपघात झाला हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की BMW कार जळून खाक झाली आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतची कार वेगात असल्याचं दिसत आहे. हा अपघात अंगावर काटा आणणारा आहे.या अपघातामध्ये पंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसंच त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पंत अपघातातून लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहे. या अपघातामुळे टीम इंडिया देखील हादरली आहे. टीममधील हुकमी एक्का म्हणून पंतकडे पाहिलं जातं. मात्र त्याला रिकव्हर होण्यासाठी किती वेळ जाईल याबाबत सध्या डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिली नाही.क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोळ उठले. हे सगळी दृश्यं रस्त्यावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता.पहाटे 5.15 वाजता हा अपघात झाला, उत्तराखंडमधील रुरकीजवळ ही भयंकर दुर्घटना घडली. पंतच्या डोक्याला आणि पाठीला प्रचंड दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर त्याला पुढील उपचारासाठी देहरादूनला हलवण्यात आलं आहे.