ब्रेकिंग : मराठा समाजासाठी धडपडणारे शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे याचं अपघाती निधन, ड्रायव्हर ने केले हे आरोप.
महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठा समाजासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाचं भलं व्हावं यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करणारा मराठ्यांचा आवाज म्हणजेच शिवसंग्राम या पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे हे काळाआड गेलेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. आणि डोक्याला मार लागल्यामुळे रुग्णालयात पोहोचायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.
विधान परिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगदा जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर मेटे यांना पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगाही होता तोही जखमी असल्याची माहिती समोर येतेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांसह विनायक मेटे हे काल (शनिवारी) रात्रीच मुंबईकडे निघाले होते.. बीडमध्ये आयोजित विविध कार्यक्रम रद्द करून ते मुंबईला जात होते.
अपघातानंतर तासभर त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे..
यांच्या अपघाताची बातमी कळताच शिवसंग्राम चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाजासाठी सातत्याने काम करणारे, धडपडणारे विनायक मेटे यांच्या अचानक जाण्यानं मराठा समाजात एक पोकळी निर्माण झाली. या राजकीय वर्तुळात देखील विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे दुखाचे सावट पसरले.