ब्रेकिंग : न्यायालयात घेऊन जाताना आरोपीने स्वतः सोबत केले असे काही, पहा बातमी सविस्तर.
अहमदनगर मधील न्यायालय या ठिकाणी अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला. जिल्हा न्यायालयाच्या आवारातच आरोपीने स्वतःच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याची बातमी समोर आली.
कल्याण भिस्ते असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी नवनागापूर या ठिकाणी राहणारा आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल आव्हाड यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपी कल्याण भिस्ते यांच्या विरुद्दात MIDC पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करणे कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता.
त्यामुळेच एमआयडीसी पोलिसांनी त्याला मंगळवारी ताब्यात घेतलं आणि बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, उशिरा न्यायालयात हा प्रकार घडला. आरोपीने स्वतःच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला हा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.