ब्रेकिंग : ठाकरे सरकारचे भवितव्य धोक्यात, उद्या बहुमत चाचणी होणारच !
महाराष्ट्रातल्या राजकीय नाटकाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून सुप्रीम कोर्टाकडून लागणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सादर करण्यासाठी उद्याचा दिवस दिला आहे. आणि राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आणि या प्रकरणाची सुनावणी चालू होती यामध्ये बरेच गोष्टी घडून आले आहेत.
यामध्ये आपण पाहू शकतो की साडेतीन तास तीनही पक्षांचे युक्तिवाद झाले सुप्रीम कोर्टाने ९ वाजता निकाल दिला आहे. यामध्ये राज्यपाल हे देवदूत नसून तेही माणूसच असतात असे शिवसेनेचे वकील अभिषेक सिंघवी हे म्हणतात. राज्यपाल हा जर राजकीय व्यक्ती नसेल तर विधानसभा अध्यक्ष हा राजकीय कसा होऊ शकतो असा सवाल अभिषेक सिंगवी यांनी केला आहे. यामध्ये बोलताना म्हणतात की जेव्हा डावा हात दहाव्या शेड्युल पासून बांधला जातो आणि उजव्या हाताला फ्लोर टेस्ट करायला सांगितले जाते तेव्हा फ्लोर टेस्ट लोकशाहीसाठी आवश्यक आहे असा युक्तिवाद होऊ शकत नाही.
आत्ताच आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार उद्या बहुमत चाचणी होणार आहे शिवसेनेकडून जे बहुमत चाचणीसाठी स्टे आणला गेला होतात तोच ते सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे त्यामुळे उद्याची बहुमत चाचणी होणार आहे असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत सर्व राजकीय नेत्यांचे ज्या निर्णयाकडे लक्ष लागून होते असा निकाल आत्ताच सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे बहुमत चाचणी वर कसलीही स्थगिती नाही उद्या बहुमत चाचणी होणार
तीन तास युक्ती वाद केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की उद्या ११ ते ५ या दरम्यान बहुमत चाचणी होणार आहे यावरती कसल्याही प्रकारची स्थगिती नाही. उद्या फ्लोर टेस्ट होणार आहे उद्या शिवसेना उद्धव ठाकरे यांना फ्लोर टेस्ट साठी सामोरे जायचे आहे
यामध्ये बोलत असताना संजय राऊत यांच्या वक्तव्याला एक महत्त्वाचं वळण भेटला आहे. आमदारांचे मृतदेह परत येतील असं एक नेता म्हणतो ही खरंच गंभीर वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून केला गेला आहे असे तुषार मेहता म्हणतात. त्याचप्रमाणे शिवसेना हा बाहेर पडलेला आहे यामध्ये तुषार मेहता बोलताना म्हणतात तिची चौकशी पूर्ण करत दूषित आहे चेहरे पाहून नोटीस देण्यात आलेली आहे ते बंडखोर नेते आहेत त्यांचे चेहरे पाहून नोटीस देण्यात आली आहे असं म्हणतात. यामध्ये बोलताना वकील तुषार मेहता हे म्हणतात की, उपाध्यक्षांनी कार्यालय व पदाचा गैरवापर केला आहे शिंदे गटाचे वकील म्हणतात की एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे हीच खरी शिवसेना आहे
सरकार अल्पमतात आल्याच्या मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे राज्यपालांनी निर्णय घेतल्याचा युक्तिवाद केला जात आहे, त्यामुळे फ्लोर टेस्टचे निर्देश दिले आहेत. असेल तर त्यात गैर काय? मीडिया हा या लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे सध्याच्या परिस्थितीत फ्लोर टेस्ट हा एकमेव पर्याय आहे अस कौल म्हणतात.पदाचा गैरवापर होऊ नये म्हणून मध्य प्रदेश प्रकरणात तातडीने बहुमत चाचणीचे आदेश दिले अशी कौल म्हणतात
आम्ही कोर्टात आलो तेव्हा आम्ही उपाध्यक्षांना लिहिले होते की आमचा तुमच्यावर विश्वास नाही, आणि असे असतानाही आम्हाला अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली