ब्रेकिंग : PUBG गेम नंतर आता ” हि ” गेम Google Play Store वरून हटवण्यात आली.
आत्ताची सगळ्यात मोठी बातमी !! मोबाईल मध्ये गेम खेळणाऱ्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. काही दिवसापूर्वी मोदी सरकारने चायनीज एप्लीकेशन आणि गेम्स वर बंदी आणली होती. त्यामध्ये pubg ही गेम सुद्धा होती. त्यानंतर भारतातील गेम खेळणाऱ्यांसाठी BGMI इंडिया ही नवीन गेम लॉन्च केली होती आणि ती देखील अल्पावधीत सगळ्यांकडे पोहोचली. आणि पुन्हा pubg सारखीच हिला बऱ्याच मुलांच्या मोबाईल मध्ये बघण्यात आली. पण आता ही BGMI गेम सुद्धा Google Play Store वरून हटवण्यात आली आहे. त्यामुळे ही गेम खेळण्यासाठी ही बातमी नक्कीच दुःखद असणार आहे.
पब्जी सारख्या गेम ने भारताचा प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मधल्या काही कालावधीमध्ये जेव्हा सगळीकडे कोरोना सारखा महाभयंकर रोग आला होता. अशा वेळेस लॉकडाऊन करण्यात आले होते. आणि या लॉकडाऊन मध्ये पब्जी गेम खेळण्याचे प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढले होते. हा गेम प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. सकाळ म्हणू नका की संध्याकाळ म्हणू नका प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त हाच गेम खेळताना पाहायला मिळायचा. पण त्यानंतर मोदी सरकारने या गेम वर बंदी घातली गेली.
पण बंदी घालून काही दिवस उलटत नाही तोच मागच्या वर्षी BGMI गेम लॉन्च करण्यात आला. हा गेम लॉन्च झाल्यानंतर पुन्हा एकदा याच वापराचे प्रमाण वाढत गेले. पुन्हा pubg सारखाच हा सगळ्यांचा मोबाईल मध्ये दिसू लागला. याचे वाढणारे अतिप्रमाण बघून राज्यसभेमध्ये नुकताच एक मुद्दा उपस्थित केला गेला. त्यामध्ये असं म्हटलं गेलं की, या गेमने मुलांवर हानिकारक प्रभाव पडत आहे आणि म्हणून ही गेम सुद्धा भारतातून बंद करण्यात यावी.
एका मीडियाचा रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात एका मुलाने गेम खेळत असताना आईने त्याला हटकले म्हणून त्याने रागात त्याच्या आईला मारल्याची घटना घडली. या गेम मुळे मुले आणखी खुनशी होताना आपण पाहत आहोत. या गेम साठी मुलं कुठल्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय आपल्याला या घटनेतून येतो आणि त्यामुळे सध्या या गेमला गुगल प्ले स्टोअर मधून काढण्यात आले आहे.
याबद्दल त्या कंपनीच्या प्रतिनिधींना विचारले असता ते म्हणतात की, आम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून कसे काढले गेले हे स्पष्ट करत आहोत आणि आम्हाला विशिष्ट माहिती मिळाल्यावर तुम्हा सगळ्यांना कळवू. सध्या हा गेम डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता.
या गेमला प्ले स्टोर वरून हटवल्यानंतर युजरला असेही वाटते की, pubg प्रमाणे ही गेम देखील बंद होती की काय, या गेम वर बंदी घातली जाते की काय. भारतामध्ये पब्जी मोबाईल गेम वर बंदी घातल्यानंतर क्राफ्ट कंपनीकडून हा नवा गेम लॉन्च करण्यात आला होता. आणि यामध्ये PUBGगेम सारखे मिळते जुळते फीचर्स युजर्सला देण्यात आले होते. त्यामुळे हा गेम हटवण्याचे कारण मानले जाते. पण या गेमला हटवण्यामुळे गेमर्सला जोरदार धक्का बसला आहे हे मात्र नक्की.