ब्रेकिंग : आज रात्री मुख्यमंत्री राजीनामा देणार ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सर्वात जवळच्या सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकारला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट आदेश दिले आहेत. उद्याही फ्लोअर टेस्ट होणार आहे. पण मुख्यमंत्री या फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार नसल्याची माहिती सूत्राने दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज रात्री जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल. आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला म्हणून मुख्यमंत्री व्यथित झालेत. त्यामुळे या नोटीसला सामोरे जाणार नाही तर त्याऐवजी ते राजीनामा देतील अशी सूत्रांकडून माहिती. मी त्या माणसाच्या विरोधात मतदान करताना पाहायचे नाही असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटवर्तीयांना सोबत चर्चा करताना म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडलेल्या बैठकीत औरंगाबाद उस्मानाबाद नवी मुंबई विमानतळाच्या याबाबत या बैठकीत ते बोलत होते. धन्यवाद माझ्याकडून भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो.
कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलं, आणि त्या मनोगत मध्ये सर्वांचे आभार मानले. त्याचप्रमाणे मी चांगलं काम केलं लोकांनी मला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं यामध्ये मी सगळ्यांचा ऋणी आहे असं त्यांनी बोलून दाखवले. त्यादिवशी त्यांनी मोठे निर्णय देखील घेतले या मध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर, उस्मानाबाद – धाराशिव व नवी मुंबई विमानतळ याचे नाव दि. बा. पाटील यास मंजुरी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कुठल्याही गोष्टीला सामोरे जात नाही आहेत त्यामुळे नेमकं आज रात्रीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.