३७ व्या महाराष्ट्र अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धात वेदांत जाधवला कांस्यपदक.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील रहिवासी वेदांत जाधव यांचे मुंबई येथे ६/११/२२, रोजी नुकत्याच पार पडलेल्या ३८व्या महाराष्ट्र अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा रायफल संघटने मार्फत अजिंठा राइफल शूटिंग क्लब चा गुणी राष्ट्रीय नेमबाज वेदांत राम जाधव याने ५० मीटर थ्री पोझिशन, (पुरुष गटात ) ५६७/६०० गुण मिळवत कांस्यपदक पटकावले.
वेदांतला श्री संग्राम देशमुख व फुलचंद बांगर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा रायफल संघटनेचे अध्यक्ष व पोलीस कमिशनर श्री निखिल गुप्ता, सचिव श्री अनंत बर्वे, श्री उमेश पटवर्धन, श्री मनीष धूत, हेमंत मोरे, श्री जगतसिंग राजपूत, प्रा.पगारे सर व समस्त पालक रुंद यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.