कोकणपश्चिम महाराष्ट्र

खालापूर टोलनाक्याजवळ बस फोडली, प्रवासी जखमी; कारण ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही.

काही दिवसापूर्वीच मुंबई पुणे महामार्गावर एका घटना घडलेली असताना त्यात पुन्हा एकदा मुंबई पुणे महामार्ग चर्चेला आला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर एका लक्झरी बस बसवर अज्ञात इसमानी दगडफेक केली. या सदरच्या घटनेत बसचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. या दगडफेकीत काही प्रवाशांना दुखापतही झाली आहे. या घटनेनंतर बसमध्ये असणाऱ्या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात या वाद झाला होता. आणि यावरुनच बसवर ही दगडफेक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. यानंतर लगेचच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलीस सध्या याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खासगी बसवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दगडफेकीत या लक्झरी बसच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी देखील झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरील काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बसची समोरची काच आणि खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. यावरुनच अंदाज लावता येईल की ही दगडफेक किती भयानक होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस सध्या याबाबत तपास करत असून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खासगी बसवर दगडफेक केली आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दगडफेकीत या लक्झरी बसच्या काचा फुटल्या.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!