कायद्यानुसार ट्रॅफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का ?

आपण वाहन चालवत असताना आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात. आणि जर अशा वेळेस तुम्ही ट्रॅफिक पोलीस यांच्या तावडीत सापडला तर कारवाई मात्र होणारच. पण पोलिसांच्या तावडीतून निघण्यासाठी, सुटका करून घेण्यासाठी अनेक जण नियम मोडल्यानंतर निसटण्याचा प्रयत्न करतात आणि असे काही प्रकार घडू नये म्हणून ट्रॅफिक पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात.
काय आहे कायदा ?
भारतीय मोटार वाहन कायदा 1932 च्या अंतर्गत जर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास फक्त ए एस आय स्तरावरील अधिकारीच तुमचे चलन कापू शकतो. एस आय, इस्पेक्टर अधिकाऱ्यांना फक्त ऑन दी स्पॉट दंड करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी वाहतूक हवालदार हे असतात.
यामध्ये आपण खालील गोष्टी लक्षात ठेवा !
१. जर आपले चलन कापायचे असेल तर अशा वेळेस त्या वाहतूक पोलिसांकडे चलन बुक किंवा ही चलन मशीन असणे अनिवार्य आहे. जर त्या वाहतूक पोलिसांकडे या दोन्हीपैकी काहीही नसेल तर तो चलन कापू शकत नाही.
२. वाहतूक दंड कापण्यासाठी जो वाहतूक पोलीस अधिकारी असतो तो त्यांच्या असलेल्या गणवेश यामध्ये असला पाहिजे आणि त्या गणवेशावर बक्कल नंबर व त्या पोलिसांची नाव असणे आवश्यक आहे. तो अधिकारी व पोलिसांच्या गणवेशात मध्ये नसेल तर आपण त्याला ओळखपत्र विचारू शकतो.
३. वाहतूक पोलिसांचे जे कोणी हेडकॉन्स्टेबल असतात ते तुमच्या कडून फक्त १०० रुपयांचे दंड आकारू शकतात, त्यापेक्षा जास्त दंड आकारण्याचा अधिकार हा नेमून दिलेल्या एसआय यांनाच असतो.
४. आपण वाहन चालवत असताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, पीयूसी असणं अनिवार्य देखील असतं किंवा वाहनाची नोंदणी व विम्याची झेरॉक्स प्रत ही देखील अशा वेळी चालू शकते.
५. जर आपणाकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्यास तो दंड आपण नंतर देखील भरू शकतो अशावेळेस न्यायालयात जाऊन भरावे लागते पण अशा काळामध्ये वाहतूक अधिकारी तुमच्याकडे असणारे तुमचे ड्रायव्हिंग लायसन त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात.