महत्वाची बातमी – News Mall 18

खा. निलेश लंकेच्या जनसेवाला प्रकृतीने लावला ब्रेक; रूटीन चेकअपसाठी पुण्यात…
सप्रेम नमस्कार,

सततचे सार्वजनिक कार्यक्रम, आपणापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अविरत धावपळ आणि यावर्षीच्या तीव्र उष्णतेमुळे गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी आज मी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालो आहे.

सद्यस्थितीत माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत पूर्वीप्रमाणे कार्यरत होईन. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादाचे भक्कम बळ माझ्या पाठीशी असल्याने कुणीही चिंता करू नये.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच नव्या उर्जेसह पुन्हा जनसेवेत सक्रिय होईन.

— निलेश लंके
खासदार, अहिल्यानगर

खासदार निलेश लंके पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

अहिल्यानगर : सततचे सार्वजनिक कार्यक्रम, कडाक्याच्या उन्हातील धावपळ आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे प्रकृती अस्वस्थ जाणवू लागल्याने अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार लंके यांची प्रकृती काहीशी नरम होती. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच शरीरातील थकवा लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही रुटीन तपासण्या करण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना खासदार लंके म्हणाले,
“रुटीन तपासण्या आणि योग्य उपचारांनंतर मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत पूर्ण क्षमतेने उपस्थित राहीन. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कुणीही काळजी करू नये.”

उपचार आणि विश्रांतीनंतर खासदार निलेश लंके लवकरच पुन्हा अहिल्यानगरमध्ये सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांची दडपशाही उघड! प्रभाग १५ मध्ये गुंडागर्दीचा कहर; उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच सत्ताधाऱ्यांची दडपशाही, प्रशासनाचा गैरवापर आणि गुंडागर्दी उघडपणे सुरू असल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक १५ मध्ये समोर आला आहे. शिवसेना ( शिंदे गट ) उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव यांच्या कुटुंबीयांना निवडणूक जाहीर झाल्यापासून मुद्दाम लक्ष्य केले जात आहे.

प्रशासनाकडून सातत्याने अडचणी निर्माण केल्या जात असून, विरोधकांच्या दबावाखाली कारवाया केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या सगळ्याचा कळस म्हणजे शिवसेना नेते जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्याकडे धाड टाकण्यात आली, ते हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असताना, दुसरीकडे जाधव कुटुंबीयांवर मारहाणीच्या घटनांची मालिका सुरू राहिली.

दरम्यान, प्रतिस्पर्धी विरोधकांनी सुवर्णा जाधव यांच्या मुलाला एकट्यात गाठून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अभिषेक दळवी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या संपूर्ण शरीरावर मुका माराचे खोल घाव आहेत. तो रक्तभंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार पाहता हा साधा वाद नसून निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा उघड प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीच जाधव कुटुंबीयांनी लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवले होते की आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे. तरीही कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. आता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. जखमी असतानाही पोलीस प्रशासन तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाही.

➡️ गेल्या तब्बल 4 तासांपासून जाधव कुटुंबीय कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत ठाण मांडून बसले आहेत.
हा प्रकार म्हणजे,
❓ पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का?
❓ जखमींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का?
❓ न्याय मागणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये तासन्तास बसवणे हीच का कायदा-सुव्यवस्था ?

निवडणुकीच्या काळात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी जर मारहाण, धमक्या आणि पोलिसी दुर्लक्षाचा वापर होत असेल, तर ही लोकशाही नसून दहशतीचे राज्य असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
➡️ दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी
➡️ जखमींची तक्रार त्वरित नोंदवावी
➡️ जाधव कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे
➡️ निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी
अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे स्वागत सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळायलाच खा. नीलेश लंके खा. लंके यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
अहिल्यानगर : प्रतिनिधी      सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करत खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.      पत्रकारांशी बोलताना खा. लंके म्हणाले की, शिस्पे घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे अडकले असून अनेकांनी दोन पैशांच्या आशेने गुंतवणूक केली आणि त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. काही दुर्दैवी ठेवीदारांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे या घोटाळ्याची सखोल, निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.     खा. लंके म्हणाले, “ज्यांनी हा घोटाळा केला आहे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून ठेवीदारांचे पैसे वसूल करून सर्वसामान्य नागरिकांना परत मिळाले पाहिजेत.” सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण काही ठेवीदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. हा विषय राजकीय न करता केवळ ठेवीदारांचे पैसे मिळवून देणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.     विरोधकांकडून आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून राजकीय आकसापोटी आपल्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत खा. लंके यांनी विखे पिता–पुत्रांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. “स्वतःचे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचे उघडे करायचे, हीच त्यांची सवय आहे,” असे ते म्हणाले.     खा. लंके पुढे म्हणाले की, सिस्पे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मात्र जेव्हा केंद्रीय मंत्री लोणी किंवा कोपरगावच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवेदन का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी विखे यांचे नाव न घेता उपस्थित केला. ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याऐवजी काहीजण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी डाव आखले जात असले तरी नगर जिल्ह्यातील मतदार सुज्ञ असून भाजपची खेळी सर्वांनी ओळखली असल्याचे लंके यांनी सांगितले. नगर येथील सभेत मुख्यमंत्री शहरातील रस्ते घोटाळ्यावर एक शब्दही न बोलल्याची टीकाही त्यांनी केली.     जिल्ह्यात दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले असून त्यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खा. लंके यांनी केली. ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह इतर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेवगाव येथे शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.     मुख्यमंत्र्यांनी शिस्पे घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याची घोषणा केल्यावर प्रतिक्रिया देताना खा. लंके म्हणाले, “जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाच राज्याच्या पोलिसांवर विश्वास नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” श्रीरामपूर आणि शिर्डी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनांचीही सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली……जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे नियमितपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून सुरू असल्याचा आरोप खा. लंके यांनी केला. पोलीस दलावर वारंवार टीका करून काही नेते जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करत असून कार्यक्षम अधिकाऱ्यांना नामोहरम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.. ..  दरम्यान, शिस्पे–इन्फिनिटी घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे खा. नीलेश लंके यांनी ठामपणे स्पष्ट केले. केवळ इन्फिनिटीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलो म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून हा राजकीय हेतूने चालवलेला खोटा प्रचार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाला विविध पक्षांचे आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी उपस्थित होते. “उद्घाटनाला उपस्थित राहणे म्हणजे घोटाळ्यात सहभागी असणे नव्हे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी कोणालाही पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलेले नसून, उलट ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करत काही ठिकाणी धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.     महाविकास आघाडीचा विचार महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून नगर शहराने शांतता, विकास आणि पारदर्शक कारभारासाठी या विचारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही खासदार नीलेश लंके यांनी केले.      महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, रखडलेल्या विकास योजना, पाणीपुरवठा व मनमानी कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टीईटी बंधनकारकतेवर पुनर्विचाराची मागणी: खा. लंके यांचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना साकडे.
नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशभरातील प्राथमिक शिक्षकांवर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेचा परिणाम लक्षात घेऊन, अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके व खा. भास्कर भारे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन टीईटी संदर्भातील धोरणात मानवी व सामाजिक दृष्टिकोनातून संवेदनशील बदल करण्याची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्याचा शिक्षकांवर परिणाम झाला आहे. त्यांना १ सप्टेंबर २०२७ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, देशातील सर्व प्राथमिक शिक्षकांना १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खासदार लंके यांनी मंत्री प्रधान यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “हा निर्णय लाखो शिक्षकांवर थेट परिणाम करणारा असून, त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारा आहे.” लंके यांनी स्पष्ट केले की, अनेक प्राथमिक शिक्षकांनी आपापल्या नियुक्तीच्या वेळी शासनाने ठरविलेल्या सर्व शैक्षणिक आणि प्रशिक्षण पात्रता पूर्ण केलेल्या आहेत. तसेच त्या काळातील आवश्यक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यावरच त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे एनसीटीईने टीईटीची अट लागू करण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर नंतरचे नियम लादणे योग्य नाही, असे मत त्यांनी नोंदविले.

सरकारने न्याय्य तोडगा काढावा : खा लंके यांनी आरटीई कायद्याच्या कलम २३(२) मधील सुधारणा करून टीईटीबाबतची अट पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्रात नमूद आहे की, “एनसीटीईची अधिसूचना लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ते बदल करावेत, ही सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे.”

खा. निलेश लंके यांचा बाबा पीर रतननाथ मंदिराला पाठिंबा; धार्मिक संवेदनशीलता अबाधित ठेवण्याची सरकारला सूचना.
अहिल्यानगर : प्रतिनिधी
दिल्लीतील झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिराच्या जमिनीवर महानगरपालिकेने केलेल्या बुलडोझर कारवाईनंतर स्थानिक भक्त आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. धार्मिक भावनांना धक्का बसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. अशा संवेदनशील वातावरणात खासदार नीलेश लंके यांनी मंदिराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत भाविकांना धीर दिला.

महानगरपालिकेच्या कारवाईनंतर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाई करताना ना पूर्वसूचना देण्यात आली, ना मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा अनादर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेनंतर खासदार निलेश लंके यांनी काल मंदिराला भेट देत मंदिर परिसराची पाहणी करून साधू–महंत व मंदिर व्यवस्थापनाशी समोरासमोर चर्चा केली. त्यांनी स्थानिक भक्तांच्या भूमिका व तक्रारींची माहिती समजून घेतली. भेटीदरम्यान त्यांनी झालेल्या कारवाईबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत धार्मिक स्थळांवरची कोणतीही सरकारी पावले अतिशय संवेदनशीलतेने, पारदर्शकतेने आणि कायदेशीर चौकटीत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

खासदार लंके यांनी मंदिर समितीला ठाम पाठिंबा दर्शवित पुढील पाऊल म्हणून केंद्र सरकारकडे लेखी निवेदन देणे, घटनेची चौकशी आणि न्याय मिळवण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलणे, धार्मिक भावना अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो दबाव टाकणे यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

खासदारांच्या भेटीनंतर मंदिर परिसरात दिलासा व समाधान व्यक्त केले गेले. भक्तांनी “धार्मिक परंपरा, आस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचा सन्मान राखावा” अशी ठाम मागणी पुन्हा अधोरेखित केली.

नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार निलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र.
नवी दिल्ली : अहिल्यानगर
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रस्तावांची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्राचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहून पाठपुरावा अधिक वेगाने करण्याची मागणी केली आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या आठ प्रमुख रेल्वे प्रस्तावांवर लंके यांनी तातडीने अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.

पुणे–अहिल्यानगर इंटरसिटी गाडी सुरू करण्याबाबत पूर्वी पाठवलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती कळविण्याची खासदारांनी मागणी केली आहे. या गाडीमुळे दोन्ही शहरांतील रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणाच्या संधींना चालना मिळेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अहिल्यानगर – चोंडी (जेउर–चोंडी) नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. या प्रस्तावाच्या अभ्यास व निर्णय प्रक्रियेची स्थिती तत्काळ कळवावी, अशी लंके यांची विनंती आहे.

संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे नवीन रेल्वे लाईन या बहुप्रतिक्षित नव्या रेल्वे मार्गाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप स्पष्ट स्थिती मिळालेली नाही. मार्गाचा सर्वेक्षण, डीपीआर, मंजुरी प्रक्रिया आणि पुढील टप्पे कोणत्या अवस्थेत आहेत, हे कळवण्याची विनंती खासदारांनी केली आहे. श्रीरामपूर–परळी नवीन रेल्वे मार्ग या महत्वपूर्ण प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाने कोणता निर्णय घेतला आहे, हे तातडीने कळवावे, असे खासदारांनी म्हटले आहे.

राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे लाईन या मंजूर रेल्वे मार्गासाठी भू-अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भूसंपादन कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत माहिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे. अहिल्यानगर स्थानकाजवळील एलसी क्र. ३० येथे आरओबी बांधकामाच्या प्रस्तावाची अद्ययावत स्थिती कळवावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. अपघातमुक्त वाहतुकीसाठी हा पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे गेट क्रमांक ३५(ब) असलेल्या ठिकाणी आरओबी मंजूर झाल्याचे नमूद करून, काम सुरू होण्याची निश्चित तारीख कळवावी, अशी विनंती लंके यांनी केली आहे.

सुपा औद्योगिक परिसरात रेल्वे फ्रेट यार्ड

एमआयडीसीमधील वाढत्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर फ्रेट यार्ड अत्यावश्यक असल्याचे लंके यांनी नमूद केले आहे. फ्रेट यार्ड उभारणीच्या प्रस्तावाची स्थिती आणि पुढील प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणीही पत्रातून केली आहे.

धारदार शस्त्र तलवार बाळगणा-या इसमाविरुध्द कोतवाली पोलीसांची कारवाई.
दिनांक 20/11/2025 रोजी 11:30 वाचे सुमारास मा. श्री संभाजी गायकवाड साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर येथे एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजुस प्राण घातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेवुन काहितरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ व पंचासह नमुद बातमीच्या ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

गुन्हे शोध पथकातील अंमलदार व पंच आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर येथे जाऊन बातमीतील नमुद इसमाचा शोध घेतला असता आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर एक इसम दिसुन आला त्यास जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सचिन हिंमत अवचिते वय – 21 वर्षे रा. मांदळी शीवार, ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

नमुद इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सदर इसमाच्या शर्टच्या पाठीमागील बाजुस पॅन्टमध्ये खोसलेली एक धारदार तलवार ४०००/- रु. किंमत अंमदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजुला काहीशी वक्राकार वळलेली असलेली मिळुन आली पोसई/ गणेश देशमुख यांनी पंचासमक्ष नमुद तलवार जप्त केली नमुद इसमास कारवाई कामी कोतवाली पोलीस स्टेशनला त्याच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार तलवारीसह आणण्यात आले असुन त्याचे विरुद्ध पोकॉ/ पोकॉ/ 1553 शीरीष बाळासाहेब तरटे यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोस्टे गुरनं 1060 / 2025 शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेकॉ / 109 डी. बी. दौड हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ धार्गे सो. अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे, सो.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. दिलीप टिपरसे सो.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, पोसई / गणेश देशमुख, पोहेकॉ / दौड, पोहेकॉ / वसिम पठाण, पोहेकॉ / विशाल दळवी, पोहेकॉ/ विनोद बोरगे पोना / वाघचौरे, सत्यम शिंदे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, राम हंडाळ, यांच्या पथकाने केली आहे.

थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर उजळला, पण मंत्री महोदयांचा राहाता अंधारातच – प्रभावती घोगरे
राहाता, दि. २१ ऑक्टोबर :
दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि ऐक्याचा सण, पण यंदा संगमनेर आणि राहाता तालुक्यांतील वास्तवात मोठी तफावत दिसून आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी या विरोधाभासावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे.

सौ. घोगरे म्हणाल्या, “आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांनी दिवाळीपूर्वी सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ₹१०२ कोटींचा लाभ दिला. राजहंस दूध संघ, साखर कारखाना, पतसंस्था, शेतकी संघ आणि अमृत उद्योग समूहाने एकत्र येऊन जनतेच्या हातात समृद्धीचा दिवा पेटवला. हेच थोरात साहेबांच्या सहकार आणि जनसेवेचे खरे यश आहे.”

पण राहाता तालुक्यात मात्र काळोखी दिवाळी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात कामगारांना वेळेवर पगार नाही, पाहिजे असा बोनस नाही, उसाच्या पेमेंटचा दुसरा हप्ता थांबलेला आहे. प्रवरा दूध संघ मोडीत निघाला, शेतकरी अडचणीत आहेत, आणि कामगार वर्ग निराश आहे. सत्ताधारी फक्त जाहिराती करतात, पण जनतेच्या हाती अंधारच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

त्या पुढे त्यांनी सांगितले, “संगमनेर तालुका सहकार, शिक्षण आणि शेतीच्या बळावर प्रगतीच्या शिखरावर आहे, तर राहाता तालुक्यात सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आजही कर्जबाजारी आणि हतबल आहेत. दिवाळीत दिवे पेटवले पाहिजेत, पण इथे अंधार वाढतो आहे. जनतेने आता ही लाचारी सोडून लढ्याची ज्योत पेटवली पाहिजे.”

सौ. प्रभावती घोगरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या अधोरेखित करत त्यांनी पुन्हा एकदा आपली संघर्षशील भूमिका ठळकपणे मांडली आहे.

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे
राहाता (प्रतिनिधी):
राहाता तालुक्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. उभ्या पिकांवर साचलेले पाणी शेतकऱ्यांच्या मेहनतीला वळण देऊन संपूर्ण नुकसान करून गेले असून, उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जफेड, वीजबिल आणि इतर आर्थिक ताण वाढले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या रोजच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांचे कठीण परिश्रम आणि उत्पन्न निसर्गामुळे नष्ट झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी बांधव हतबल झाले असून त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी राहाता तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की तालुक्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत व नुकसानभरपाई कोणत्याही अटीशर्तीशिवाय थेट खात्यात जमा करावी. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करून मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कर्जमाफी, वीजबिल माफी आणि थकलेली अनुदाने तातडीने वाटप करावीत. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुला–मुलींच्या शालेय शिक्षणाची संपूर्ण फी माफ करावी आणि सर्व शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली.

सौ. घोगरे म्हणाल्या, “शेतकरी कर्ज, वीजबिलाच्या ओझ्याखाली दबले असून मदतीशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही. उभ्या पिकांवर साचलेले पाणी शेतकऱ्यांच्या मेहनतीला वळण देऊन संपूर्ण नुकसान करून गेले आहे. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही घोषणा फक्त कागदावर न राहता शासनाच्या ठोस निर्णयातून प्रत्यक्षात दिसावी.” त्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.

सौ. घोगरेच्या म्हणण्यानुसार, आता शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत, नुकसानभरपाई, कर्जमाफी, वीजबिल माफी आणि थकलेली अनुदाने वितरण करण्याव्यतिरिक्त शालेय शिक्षणासाठीचे आर्थिक भार कमी करणे अनिवार्य आहे, नाहीतर शेतकरी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. “शेतकरी सुरक्षित नाही तर देशाचा अन्नसुरक्षिततेवर देखील प्रश्न निर्माण होतो,” अशा आशयाचे त्यांनी शासनाकडे आवाहन केले.

खा. निलेश लंके यांचा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर संताप – भरपाईची मागणी.
नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे अर्धवट व चुकीचे काम हे नागरिकांसाठी संकट ठरले आहे. पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पावसाचे पाणी निचरा न होता वसाहती व शेतात घुसले असून, घरांचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या गंभीर प्रकाराची जबाबदारी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करीत झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करत अधिकाऱ्यांना व ठेकेदार प्रतिनिधींना धारेवर धरले.

पाहणीवेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, तसेच अन्य स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. खा. लंके यांनी काम योग्य पद्धतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

सीना नदी पुलाचे काम सुरू होऊन २१ महिने उलटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. कामाची मुदत संपली असून जुना पूल धोकादायक स्थितीत आहे. नव्या पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी, रूग्णवाहिका व शालेय बसेस यांना अडथळा निर्माण होत आहे.

सततच्या पावसामुळे जुन्या पुलावर पाणी साचून अपघाताचा धोका वाढला आहे. या परिस्थितीवर तोडगा न काढल्यास हा विषय संसदेत उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाईल, असा इशारा खा. लंके यांनी दिला आहे.