माझं गाव – News Mall 18

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचले एकाचे प्राण
खराब रोड मुळे होतात अपघात

शहरातील दूध डेअरी समोर अपघात एक गंभीर जखमी, संजय काका कोठारींची तत्पर मदत दूध डेअरीसमोर रविवारी संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या अपघातात राम बाबन शिंदे (रा. सौताडा) वय ३२ हे गंभीर जखमी झाले. असून रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडले होते चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे शिंदे रस्त्यावर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. अपघात होताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती सर्वप्रथम प्रशांत राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे,आशु राळेभात यांनी फोनकरून सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी यांना कळवली. माहिती मिळताच कोठारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्वतःच्या रुग्णवाहिकेत राम बबन शिंदे यांना थेट रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तातडीच्या धावपळीमुळे शिंदे यांना वेळेत उपचार मिळाले. रक्तस्राव बंद करण्यात आला

दरम्यान, अपघाताची माहिती कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. असून पुढील तपास पोलीस प्रवीण इंगळे करीत आहे . प्राथमिक चौकशीत हा अपघात वाहनचालकाच्या अतिवेग व बेपर्वाईमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चार चाकी वाहना चा ड्रायव्हरने धडक देऊन डायरेक्ट पसार झाला स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावर वारंवार अपघात घडण्यामागे वाहनचालकांची बेपर्वाई एवढेच कारण नसून रस्त्यावरील दयनीय स्थिती देखील तितकीच जबाबदार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील संथ गतीने सुरू असलेली कामे, अपूर्ण रस्त्यातील खोल खड्डे यामुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संजय कोठारी यांनी केली आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढत राहील आणि नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कृष्णाली फाउंडेशनकडून जिल्हा परिषद कर्जुनेखारे वर्ग १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान.
तसेच शाळेत मोफत शालेय साहित्य वाटप आणि गुणवंतांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न.

नगर प्रतिनिधी,
जर आपण समाजात जन्माला आलो तर आपल्याला समाजाला काहीतरी परत द्यावे लागेल. पत्रकारिता करत असताना गावापासून शहरापर्यंत, जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत प्रवास केला आणि त्यावेळी अनेक गोष्टींच्या कमतरता जाणवल्या, उदाहरणार्थ, समाजातील काही घटक आहेत ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि तेव्हा या घटकांवर काम करण्याची गरज भासू लागली. आणि म्हणून या घटकांमध्ये पुढे येऊन मदत करण्याची इच्छा निर्माण झाली. पण हे काम करण्यासाठी एखाद माध्यम म्हणून, आम्ही, काही मित्र आणि कुटुंबातील सदस्य यांनी एकत्र येऊन कृष्णाली फाउंडेशनची स्थापना / सुरुवात केली.

जिल्हा परिषदेत शाळेचा माणूस असावा सर्वसामान्यांची लेक या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांना मदत व्हावी या सेवाभावातून कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी एक अनोखा उपक्रम या शाळेमध्ये राबवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जुनेखारे मध्ये ज्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश पहिली मध्ये घेतला अशा पालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना ” स्कूल बॅग, वह्या- पेन – पेन्सिल किट ” हे देऊन त्यांचं जंगी स्वागत केला तसेच इतर वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले व त्याच प्रमाणे गोष्टीची पुस्तके, महापुरुषांचे चरित्र पुस्तके देखील देण्यात आले.

दीप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेतील मुलींनी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागत गीत गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिव प्रियंका पाटील शेळके यांनी केलं. शाळेतील एका विद्यार्थिनीने खासदार निलेश लंके आणि राणीताई लंके यांचे स्केच काढून स्वतः सप्रेम भेट दिली, धडक कारवाईच्या कामामुळे डीवायएसपी संतोष खाडे यांना उपस्थित राहता आलं नाही, फोन द्वारे त्यांनी मुलांशी हितगुज केले.

या कार्यक्रमासाठी मा. जिल्हा परिषद सदस्य राणी निलेश लंके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर युवा शास्त्रज्ञ डॉक्टर रणजीत राऊत , सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा मेट्रन सौ.छाया निमसे, आपला मावळा अध्यक्ष रामेश्वर निमसे, उद्योजक संग्राम आंधळे, शिवाजी उबाळे, गावचे मा.उपसरपंच अंकुश शेळके, विद्यमान उपसरपंच रामेश्वर निमसे, नवनाथ शिंदे सर, गणेश तोरडमल, मेजर भागवत शेळके, भारत बोबडे, स्वप्नील निमसे, गणेश मोरे, अमर बोबडे, कैलास लांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गेल्या 30 वर्षी पासून अविरत पणे रुग्णसेवा देणाऱ्या, गावातील अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या छायाताई निमसे यांचे कृष्णाली फाऊंडेशन कडून सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात आला. युवा शास्त्रज्ञ रणजीत राऊत यांचा देखील वटवृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात ट्रॉफी देऊन करण्यात आला, कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी आपण गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली, राणीताई लंके यांनी कृष्णाली फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना उपसरपंच अंकुश शेळके पाटील, आपला मावळा’चे अध्यक्ष रामेश्वर निमसे व छाया ताई निमसे यांनी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले, व यापुढेही आपण मुलांच्या पुढील भवितव्यासाठी नेहमी तत्पर राहून भरीव असं काम करण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमात कृष्णाली फाउंडेशनच्या या उपक्रमात हातभार लावणारे, मा श्री सागर गांधी उदयोजक ( श्री टाईल्स ), उद्योजक संग्राम आंधळे, अहिल्यानगर पोलीस प्रशासन व इतरांचे अध्यक्षांकडून आभार मानण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव kp यांनी केले तर आभार कैलास लांडे यांनी व्यक्त केले.

दक्ष प़ोलिस मित्र संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी वजीर शेख यांची निवड करण्यात आली.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते वजीर शेख यांची दक्ष प़ोलिस मित्र सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शहादेव मुंगसे, संस्थेच्या सचीव शारदा कुलकर्णी, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र अहमदनगर कार्यालयात देण्यात आले.

यावेळी रामदास गिर्हे यांना हि पच्छिम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली , वजीर शेख हे विविध क्षेत्रांतील अनुभव व काम करण्याची पद्धत खूप छान आहे, तसेच ते गेली दहा वर्षांपासून पोलिस मित्र म्हणून काम करत आहे त्यांचा अनुभव व जनसंपर्क पहाता,त्यांची निवड करण्यात आली आहे, तेव्हा शेख म्हणाले संस्थेने जी माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे,

संस्थेला कुठे हि गालबोट लागणार नाही याची काळजी करुन, संस्थेच्या कार्याची दखल घेत ,गाव तेथे शाखा करु असे आवाहन त्यांनी दिले, सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात भेटी घेऊन पोलिसांना मदत करु, असेही म्हटले आहे, हा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता,

यावेळी, बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते, शेख यांच्या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे, यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शहादेव मुंगसे संस्थेच्या सचीव शारदा कुलकर्णी यांनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकांच्या दारात रोज पेपर टाकणारा बापच्या, मुली झाल्या डॉक्टर, वकील!
बापचं आणि लेकीच हे नातं सर्वांनाच माहिती आहे , यातल्या प्रेमाला जगात तोड नाही, मात्र कुटुंबामध्ये लेक जर एक असेल तर तिचा अत्यंत लाड होतो मात्र हीच संख्या जास्त असेल तर कधी कधी त्या मुलींचा राग राग होतो, मुलगी ही परक्याचं धन असतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं त्यामुळे मुलींना कितीही शिकवलं काहीही केलं तरी त्या एके दिवशी त्या लोकांच्याच घरी जाणार हे समाजमान्य टोमणे बऱ्याचदा दिले जातात. मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या मुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या बापाची ही कहाणी आज प्रेरणादायी ठरते.

नेवासा तालुक्यातील भानस हिवरे या ठिकाणी राहणारे अशोक पेहेरकर यांना तीन मुली एक मुलगा आहे, मुलगी होणं हे कमी समजलं जातं मुली झाल्या म्हणून समाजात कमी लेखलं जातं असा अनुभव सुरुवातीला अशोक यांना येत होता, मात्र याच मुलींना आपण समाजाचा आदर्श बनवण्याचा असा मानस त्यांनी आखला होता. आणि त्यासाठी अशोक पेहेरकर आणि रंजना पेहेरकर यांनी अहोरात्र कष्ट केले, हातावरच पोट, दहा बाय दहाच्या दोन खोल्या , पाचवीला पुजलेली अठरा विश्व दारिद्र्य जास्त कमी पाहुणा आला तर त्याला दारात झोपाव लागेल अशी परिस्थिती, अशोक यांच्या आईचे लवकरच निधन झालं त्यामुळे अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे लवकर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली,
आर्थिक परिस्थिती ही त्यांची बेताची तरी ही या परिस्थितीत सुद्धा न डगमगता आपल्या मुलींना उच्चशिक्षित करायचं आणि त्यांना समाजात एक मोठा मान मिळवून देण्याचा संकल्प या बापाने केला होता, आणि त्यासाठी त्यांनी आपल्या तीनही मुलींना उच्च देण्याचा निर्णय घेतला, यामध्ये आर्थिक अनेक अडीअडचणी आल्या यामध्ये त्यांना दानशूर लोकांची मदतही मिळाली,

मुली ही अभ्यासात अत्यंत हुशार होत्या नेहमी त्यांचा पहिला नंबर येत असे , त्यामुळे त्या अभ्यासाच्या जोरावर दोन मुली डॉक्टर झाल्या एक मुली वकीलीच शिक्षण घेत आहे.डॉ. श्रुती पेहेरकर हिने BHMS पूर्ण करून एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून नोकरी करते.तर जान्हवी ही BHMS शेवटच्या वर्षाला शिकत प्रॅक्टिस करते.तर छोटी अस्मिता ही एलएलबी करत आहे.तर मुलगा श्लोक हा देखील मोठा होऊन कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतो

अशोक बहिरकर त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना भरभरून बोलतात एका छपरामध्ये त्यांचा संसार सुरू झाला तो अजूनही संघर्षाच्या अनेक झळा सोसत फुलला ,अशोक बहिरकर हे पेपर टाकण्याचे काम करतात त्यामधून जास्त पैसे येत नाहीत त्यानंतर मिळेल ते काम करतात जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या गरजा ते भागवू शकतात त्यांच्या जोडीने पत्नी देखील त्यांना हातभार लावते आज ही पत्नी मोल मजुरी करत २५०,३००रुपये रोजाने कामाला जातात.

मात्र आता मुली शिकल्या हळू हळू परिस्थिती बदलेल , जी गरिबी या दांपत्यानी भोगली ती पुढे आपल्याला मुलांच्या नशिबी नको म्हणून त्यांना पूर्ण शिक्षण देणारा हा बाप समाजासाठी मोठा आदर्श आहे.

जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
हमदनगर (प्रतिनिधी)- वाकोडी फाटा ते वाळकी या 18 किलोमीटर रस्त्याचे (प्र.जी. मा- 81) काम मागील दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखी खाली करण्यात आले असुन ते अत्यंत खराब झाल्याने हा रस्ता ठेकेदाराकडून तत्काळ दुरुस्त करून घेण्याच्या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी के.एम.डोंगरे यांना निवेदन देताना जर आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, गौतमी भिंगारदिवे, विजय मिसाळ आदी उपस्थित होते.

वाकोडी फाटा ते वाळकी या 18 किलोमीटर रस्त्याचे (प्र.जी.मा.- 81)काम मागील दोन वर्षांपूर्वी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर केवळ चार महिन्यात या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडून खराब झाले होते. त्यावेळी देखील जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने त्या विषयाचा आवाज ऊठवल्याने तो रस्ता दुरुस्त केला होता. परंतु रस्त्याचे काम सुरू होत्या वेळी ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच कमी कालावधीत रस्त्याची अवस्था बिकट झाली.

दोन वर्षानंतर हा 18 किलोमीटर रस्ता लाखो रुपये खर्च करून जवळपास अर्ध्याच्या वर खराब झालेला आहे. ज्या रोडच्या कंत्राट एजन्सीने हा रस्ता बनवलेला आहे त्यांच्याकडे या रस्त्याची दुरुस्तीचा कालावधी जवळपास सहा महिने शिल्लक असल्याने त्यांनी तातडीने या रस्त्याचे काम व्यवस्थित करून घ्यावे

त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दळणवळण करताना अनेक समस्या येत असुन हे काम आपण पुढील आठ दिवसाच्या आत सदर रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा जनआधार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बापरे ! शेतकरी झाडाची पाने तोडायला गेला अन् वाघ येताच होत्याचं नव्हतं झालं…
शेत शेतकरी कामासाठी जात असतो , वन्य जीव मोठ्या प्रमाणत शेत शिवारात येतात ,पशुधन हल्ला करत आहेत .देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला, या हल्ल्यातली शेतकरी आनंदराव दुधबळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं खळबळ माजल्याने नागरिकांमध्ये वन विभागा विरोधात संतापाची लाट उसळली.

वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला.आरमोरी शहाराजवळ असलेल्या रामाळा येथे ही थरारक घटना घडली. शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली शिंदी वृक्षाची पाने तोडण्यासाठी एक शेतकरी जंगलात गेला होता. त्यानंतर समोरूनयेणाऱ्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली.

या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आनंदराव दुधबळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. या धक्कादायक घटनेमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे

खाटीक समाज परिवर्तन संघटनेचे स्नेह मिलन व गांधी जयंती साजरी.
खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती तर्फे दिनांक 2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त संघटनेचे पदाधिकारी व आजीवन सदस्य यांची एकत्रित सभा व स्नेह मिलनाचा कार्यक्रम स्थानिक प्रभादेवी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदू भाऊ हरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषराव लोणारे,माणिकराव नेहर, अविनाशजी धनवटे,अजाबराव घनाडे हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले,तसेच संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधीजी बद्दल अविनाशजी धनवटे,माणिकरावजी नेहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच संघटनेच्या वृक्ष वाढीसाठी उपस्थित सर्व पदाधिकारी व आजीवन सदस्य यांनी हातभार लावावा असे मत कार्याध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कठाळे यांनी व्यक्त केले, तर आस्था असावी पण त्याच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला बळी पडून आपला विकास खुंटवू नये असे मत सल्लागार डॉ.श्रीकृष्ण कंटाळे यांनी व्यक्त केले,तर अध्यक्षीय भाषणात सन 2023 मध्ये होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत व दिमाखदार सोहळा कसा करता येईल याबाबत नंदू भाऊ हरणे यांनी मार्गदर्शन केले.

तर आभार प्रदर्शन प्रसिध्दी प्रमुख सतीश भाऊ माहुरे यांनी केले.या कार्यक्रमास प्रमोद हरणे,सुधाकर कंटाळे,रामेश्वर माहुरकर, गजानन कंठाळे,प्रवीण माहुरे,धनंजय माहूरकर,कृष्णा माकोडे,मंगेश माहोरे,मनोहर पारवे,सुरेश माहुरे,विजय हरणे,संजय कुर्हेकर,उमेश डोईफोडे,अमित दुर्गे,रवी पारवे,भास्कर माहूरकर,प्रेम पारवे,सुरेश धनवटे,आकाश माहूरकर,संतोष पारवे,कैलास हरणे,महादेव कुर्हेकर,विनायक लवटे,पवन सदाफळे,सौ लोणारे ताई,सौ लवटेताई इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मान.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील जरंडी आणि फर्दापुर गावाचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यानां यंदाचा आदर्श पुरस्कार जिल्हा परिषद औरंगाबाद कडून देण्यात आला.

ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांनी य शासनाच्या विविध योजना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अंजिठा पर्वत रांगेतील ग्रामीण डोंगराळ भागात असलेल्या जरंडी गावात विविध उपक्रम राबवून औरंगाबाद जिल्ह्यात जरंडी अव्वल ठरताना दिसत आहे.

ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या प्रशासकीय,विकासात्मक कामे,कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या हातून उल्लेखनीय कामे झाले फर्दापुर व जरंडी गावात गावामधे विकासात्मक कामे केल्या गेली.

म्हणुन त्या कार्याचा गौरव व्हावा करीता ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यानां आदर्श पुरस्कार देण्याचे जि.प. औरंगाबाद यांनी ठरविले होते त्याप्रमाणे तो आदर्श ग्रामसेवक पुरस्कार तापडीया नाट्य मंदिर, निराला बाजार औरंगाबाद येथे ता.२/१०/२०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांना प्रदान करण्यात आला.

सोयगाव पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आले मागण्यांचे निवेदन….
महाराष्ट्र राज्यात गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात प्रशासनाबरोबर पोलीस पाटील आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत आहे गृह विभाग व महसूल बरोबरच वनविभाग आरोग्य विभाग ग्राम विकास विभाग कृषी विभाग प्रशासनाच्या इतर विभागांनाही गाव पातळीवर प्रशासन आणि ग्रामस्थ यातील दुवा बनून आपली जबाबदारी समर्थपणे राज्यातील पोलीस पाटील निभावत आहेत.

कोरोना आपत्ती निवारण राज्यातील पोलीस पाटील यांनी आपापल्या गावात बहुमोल अशी कामगिरी केली आहे आपले कर्तव्य करत असताना ग्राम पोलीस पाटील अधिनियम 1967 नुसार खाजगी नोकरी न करणे व इतर काही बंधनांमुळे व रुपये 6500 फक्त इतके अत्यल्प मानधन मिळत असल्याने तसेच सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटील यांना कुठलीच आर्थिक तरतूद नसल्याने पोलीस पाटील व त्यांचे कुटुंबीय यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

यासंबंधी सोयगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनाच्या वतीने सोयगाव येथे रविवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यात आले या मागण्यांमध्ये पोलीस पाटील यांना दरमहा 18 हजार रुपये मानधन मिळावे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 दुरुस्त करून सुधारित आदेश काढावा पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी ,पोलीस पाटलांना मंजूर असलेला थकित प्रवास भक्ता तात्काळ मिळावा त्यात वाढ करण्यात यावी,

सेवानिवृत्तीनंतर मानधनाच्या 50% रक्कम दरमहा मिळावी अथवा एक रकमी दहा लक्ष इतके आर्थिक सहाय्य मिळावे, पोलीस पाटील यांना दर महा मानधना व्यतिरिक्त कोणतेच लाभ नसल्यामुळे इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावे कोरोना काळातील पोलीस पाटलांचे 90 दिवसांचे अतिरिक्त मानधन आणि मरण पावलेल्या पोलीस पाटलांना 50 लाख रुपये विमा कवच देण्यात यावा. अशा मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आले यावेळी सोयगाव पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी, तसेच तालुक्यातील पोलिस पाटील हजर होते. या वेळेस मंत्री महोदयांनी या बाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले……

गुणवत्तेची लेणी दत्तवाडी गावात राबवला जातोय रात्रीचा अभ्यासिका वर्ग.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी

जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या डोंगर रांगेत हिरवाईने नटलेली छोटीशी दत्तवाडी वस्ती अवघड व दुर्गम डोंगर परिसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही शैक्षणिक गुणवत्तेचे संवर्धनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी चे मुख्याध्यापक बापू बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून शाळा व गावाचे कार्य इतरांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरले आहे.

सध्या दत्तवाडी गावात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचे अधिव्याख्याता नारायण पडूळ यांच्या प्रेरणेतून गावात रात्री 7 ते 9 या वेळेत गावातील वर्ग पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद दत्तवाडी शाळेच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्या सोबत वाचनाची आवड तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी व सराव सोबत भविष्यातील संधी ओळखून आतापासूनच मुलांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सोबत गावातून शासकीय अधिकारी निर्माण करण्याविषयी ची दूरदृष्टी ठेवून ग्रामस्थांनी गावात अभ्यासिका वर्गाची सुरुवात केली आहे.

सदर उपक्रमासाठी प्रविण मसालेवाले पुणे यांच्याकडून शाळेसाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी व वाचनाची गोडी निर्माण करणारे 25 हजार रुपयांची पुस्तके शाळेला भेट दिली आहेत. सदर अभ्यासिका वर्गाची पूर्ण जबाबदारी गावासोबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, माता-पालक संघातील अध्यक्ष सदस्य, शिक्षक-पालक संघातील अध्यक्ष सदस्य, सोबत गावातील शिक्षित तरुणांनी पुढाकार घेत दररोज रात्रीच्या वेळेस 7 ते 9 या वेळेत मुलांकडून नियमित अभ्यासाचा सराव करून घेत आहेत. सदर अभ्यासिका वर्गासाठी गावातून 9 सदस्यांचा गट स्थापन केला आहे.अभ्यासिका वर्गातून शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणणे.मुलांमध्ये चांगल्या साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणे. मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय रुजवणे.आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षेतील मुलांची संख्या वाढवणे. सोबत गावातून मोठ्या पदावर शासकीय सेवेत अधिकारी निर्माण करणे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्याध्यापक बापू बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करून घेण्यासाठी सर्व गाव एकवटले आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचे नारायण पडूळ यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी गावात रात्री 8 वाजेला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गट साधन केंद्र सोयगाव चे परमेश्वर कठोरे, तसेच सुनील बावचे विषय तज्ञ् सोबत शाळेचे मुख्याध्यापक बापू बाविस्कर व शिक्षक गणेश बाविस्कर सोबत ग्रामसेवक गणेश गवळी यांच्यासमवेत सदर उपक्रमा विषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करुन भविष्यवेध या शीर्षकाखाली पुढील काही वर्षात गावात सकारात्मक बदल कसा घडवून आणता येऊ शकतो.याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहतात परंतु गाव मात्र आहे त्याच ठिकाणी राहते. म्हणून सदर उपक्रम गावाचा आहे आणि गावातीलच मुलांसाठी ग्रामस्थांनीच राबवावा याविषयी ग्रामस्थांना नारायण पडूळ यांनी सूचना दिल्या.संबंधित उपक्रमाची पूर्ण कल्पना गावाला दिल्यानंतर ग्रामस्थांनी सर्वानुमते सदर उपक्रमाची अंबलबजावणी विषयी संमती दर्शवली.

ग्रामस्थांच्या पुढाकाराने सदर उपक्रम दिनांक 27 /09 /2022 पासून दत्तवाडी गावात रात्रीच्या वेळेस 7 ते 9 या वेळेस वर्ग 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणारे व गावातच राहणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी नियमित सुरू करण्यात आला आहे. अभ्यासिका वर्गासाठी गावातील पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या 32 विद्यार्थ्यांसाठी सध्या हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातून शाळेतील क्रमिक पाठ्यपुस्तके सोबत वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी कथा कादंबऱ्या प्रवासवर्णने सोबत इतर साहित्यिकांची पुस्तके मुलाना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच बारावीनंतर विविध स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करता यावी व त्याची पायाभरणी शाळेतून व्हावी हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकाशनाची व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी व मार्गदर्शन असणारी विविध पुस्तके सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे.

मोठ्या वर्गातील मुले आपल्या अभ्यासा सोबत लहान वर्गातील मुलांनाही शिकवण्याचे कार्य करून स्वतःचाही अभ्यास करून घेत आहे. गावातील शिक्षित तरुण तसेच पालक वर्ग मुलांच्या अभ्यासावर लक्ष व मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे निश्चितच गावात चांगले शैक्षणिक वातावरणाची पायाभरणी ग्रामस्थांनी करून घेतली आहे. सोबत शाळेतील मुख्याध्यापक बापू बाविस्कर व सहशिक्षक गणेश बाविस्कर हे गावात रात्रीच्या वेळेस थांबून अभ्यासिका वर्गाचे अंमलबजावणी गावाकडून करून घेत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शिक्षक व अधिकाऱ्यांच्या बदल्या जरी झाल्या तरी मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. याची गावातील व्यक्तींना खात्री पटत आहे. व पुढील काही वर्षात निश्चितच गावातून एखादा प्रशासकीय अधिकारी निर्माण होईल अशी आशा डोंगराळ व दुर्गम भागातील दत्तवाडी वस्तीतील ग्रामस्थ उराशी बाळगत आहेत.

*दुर्गम भागात असलेल्या दत्तवाडी गावातील अभ्यासिकामुळे गावातील सर्व मुलांना अवांतर वाचन करण्याची सवय लागेल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी होतील खात्री वाटते दत्तवाडी येथील ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

नारायण बाबासाहेब पडूळ
अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद

बापु सुकदेव बाविस्कर मुख्याध्यापक जि प प्रा शाळा दत्तवाडी तालुका सोयगांव जिल्हा औरंगाबाद जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रत्येक समस्येवर उपाय शोधता येतो. गावातून मोठा प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तशी संधी विद्यार्थ्यांना गावातच उपलब्ध करून देण्यासाठी उचललेले पाऊल निश्चितच ग्रामस्थांना यशाकडे घेऊन जाणार आहे

*ग्रामस्थ:शांताराम वनाजी भोरकडे *
या उपक्रमामुळे आम्हाला गावातील सर्व मुलांचा एकाच वेळी एकाच ठिकाणी अभ्यास करून घेता येऊन मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती घडवून आणणे शक्य होणार आहे.