Uncategorized – News Mall 18

कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरट्यांना केलं गजाआड.
आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र अविरतपणे कार्य करणाऱ्या पोलिसांचे योगदान अतुलनीय आहे. कोणत्याही संकटाच्या प्रसंगी सर्वप्रथम धावून येणारा घटक म्हणजे पोलीस दल. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणताही कठीण काळ असो, त्यांनी कधीही आपले कर्तव्य टाळले नाही. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या योद्ध्यांचे मनापासून कौतुक करावे लागेल.

अलीकडील घटनेत, कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर यांनी अत्यंत शिताफीने मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. चोरीस गेलेले सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात त्यांनी यश मिळवले. तपासाची सखोल पद्धत, तांत्रिक विश्लेषण आणि योग्य नियोजन यामुळे आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला. ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे

पोलिसांच्या या कार्यामुळे समाजामध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते. गुन्हेगारांना धडा शिकवून कायद्याचा धाक कायम ठेवण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे अनेक निरपराध लोकांचे नुकसान टळते. पोलीस केवळ कायदा अंमलात आणणारे नाहीत, तर समाजाचे खरे रक्षक आहेत.

सोने-चोरी-बाबत-प्रेस-नोट

अशा समर्पित आणि धाडसी पोलिसांना आपण मनापासून सलाम करतो. त्यांच्या कार्यामुळेच समाज शांततेत आणि सुरक्षिततेत जगू शकतो. प्रत्येक नागरिकाने पोलिसांप्रती आदर बाळगून त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. चला, आपण सर्व मिळून या कर्तव्यदक्ष पोलिस दलाचे मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देऊया.

माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द; खासदार निलेश लंके यांच्या ठाम भूमिकेनंतर आयुक्त डांगे यांना माघार
महानगरपालिका प्रशासनाकडून माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिक, व्यापारी, इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. माळीवाडा वेस ही केवळ एक वास्तू नसून ती अहिल्यानगरच्या इतिहासाची, परंपरेची आणि शहराच्या ओळखीची साक्ष देणारी महत्त्वाची खूण असल्याची भावना नगरकरांनी व्यक्त केली होती.

अहिल्यानगर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेल्या माळीवाडा वेस पाडण्याच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. नगरकरांच्या तीव्र भावना, वाढता लोकांचा रोष आणि खासदार निलेश लंके यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून, शहरभरातून समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाविरोधात खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. “नगरकरांच्या भावना डावलून, शहराच्या अस्मितेला धक्का देणारा कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही,” असे त्यांनी प्रशासनाला ठाम शब्दांत सांगितले. त्यांनी हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.

दरम्यान, नागरिकांचा रोष वाढत गेला. व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत प्रशासनावर दबाव वाढवला. सोशल मीडियासह विविध माध्यमांतूनही या निर्णयावर तीव्र टीका करण्यात येत होती.

या सर्व पार्श्वभूमीवर, नगरकरांच्या भावना आणि लोकांचा वाढता रोष लक्षात घेत आयुक्त डांगे यांनी अखेर माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या माघारीमुळे नगरकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, हा निर्णय जनतेच्या एकजुटीचा आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा विजय मानला जात आहे.

या घटनेमुळे लोकशाहीत जनतेचा आवाज किती प्रभावी ठरू शकतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे. माळीवाडा वेस अबाधित राहणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण झाले असून, नगरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचले एकाचे प्राण
खराब रोड मुळे होतात अपघात

शहरातील दूध डेअरी समोर अपघात एक गंभीर जखमी, संजय काका कोठारींची तत्पर मदत दूध डेअरीसमोर रविवारी संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या अपघातात राम बाबन शिंदे (रा. सौताडा) वय ३२ हे गंभीर जखमी झाले. असून रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडले होते चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे शिंदे रस्त्यावर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. अपघात होताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती सर्वप्रथम प्रशांत राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे,आशु राळेभात यांनी फोनकरून सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी यांना कळवली. माहिती मिळताच कोठारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्वतःच्या रुग्णवाहिकेत राम बबन शिंदे यांना थेट रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तातडीच्या धावपळीमुळे शिंदे यांना वेळेत उपचार मिळाले. रक्तस्राव बंद करण्यात आला

दरम्यान, अपघाताची माहिती कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. असून पुढील तपास पोलीस प्रवीण इंगळे करीत आहे . प्राथमिक चौकशीत हा अपघात वाहनचालकाच्या अतिवेग व बेपर्वाईमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चार चाकी वाहना चा ड्रायव्हरने धडक देऊन डायरेक्ट पसार झाला स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावर वारंवार अपघात घडण्यामागे वाहनचालकांची बेपर्वाई एवढेच कारण नसून रस्त्यावरील दयनीय स्थिती देखील तितकीच जबाबदार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील संथ गतीने सुरू असलेली कामे, अपूर्ण रस्त्यातील खोल खड्डे यामुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संजय कोठारी यांनी केली आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढत राहील आणि नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आरटीओ कार्यालयास भेट
अहिल्यानगर :
लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निमित्ताने संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. सगरे साहेब यांची भेट घेऊन कार्यकारिणीची अधिकृत माहिती सुपूर्त केली.

या प्रसंगी संस्थेच्या वतीने श्री. विशाल गणपती बाप्पाची प्रतिमा भेट देऊन सगरे साहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या नोंदणी पत्रासह पदाधिकाऱ्यांची यादी सादर करण्यात आली. सगरे साहेबांनी याबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि स्कूल बस व लक्झरी वाहनांबाबत मार्गदर्शन केले.

✍️ पुढील प्रमाणे कार्यकारणी आहे

अध्यक्ष – शिवाजी उबाळे

उपाध्यक्ष उपनगर – अमोल भांड

उपाध्यक्ष – प्रमोद बेदमुथा

सेक्रेटरी – रियाज मुलानी

खजिनदार – गणेश गावकवाड

सचिव – ईश्वर धोका

सहसचिव – धर्मा वाघस्कर

प्रवक्ते – सरवर कुरेशी

संघटक – गणेश उपाध्ये

या भेटीत अध्यक्ष शिवाजी उबाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने बोलताना सांगितले की, “शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि लक्झरी बस मालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील.”

या औपचारिक भेटीत आरटीओंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संस्थेला पुढील कार्यासाठी दिशा मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शेवटी संस्थेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सगरे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानत व नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या .

“महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता : निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आगळावेगळा उपक्रम”
अहिल्यानगर :
विजयादशमी (दसरा) व महात्मा गांधी जयंती या पावन दिनाचे औचित्य साधून “स्वच्छ भारत – एकतेचा संकल्प” या उपक्रमाअंतर्गत लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली व आपला मावळा संघटनेच्या वतीने शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे.

दि. २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी ७.३० वाजता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून (वाडिया पार्क, अहिल्यानगर) या उपक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, आनंद ऋषीजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता होईल.

📍 समारोप माळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता होणार असून, खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शहरातील सफाई कर्मचारी बांधवांचा सत्कार करण्यात येईल.

🌟 उपक्रमाचे वैशिष्ट्य

🔹 अनेकदा महापुरुषांचे पुतळे फक्त जयंती–पुण्यतिथीच्या दिवशीच स्वच्छ केले जातात, अन्यवेळी ते धुळखात पडतात. पण या उपक्रमातून आता पुतळ्यांची आणि त्यांच्या परिसराची स्वच्छता नियमितपणे केली जाणार आहे.
🔹 सर्व जाती-धर्मातील नागरिक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन महापुरुषांच्या शिकवणीवर चालण्याचा आणि सामाजिक एकतेची वज्रमूठ बांधण्याचा संकल्प करतील.

🌸 खासदार निलेश लंके यांचे आवाहन :

“स्वच्छता हीच खरी सेवा आहे. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण ठेवत आपण त्यांचे पुतळे व परिसर स्वच्छ ठेवू, यातूनच एकतेचा आणि माणुसकीचा संदेश पुढे जाईल.”

पारनेर तालुक्यात भावी ते भावीच राहणार आहेत,आता गुलाल फक्त आपलाच ;खासदार नीलेश लंके यांचा विश्‍वास
आगामी विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होईल असा विश्‍वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केेला.
पारनेर-नगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच बुथ कमिटी सदस्यांची बैठक नगर- पुणे महामार्गावरील ग्रीन हेवन मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी लंके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूकीत परीश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, सचिव भाऊसाहेब भोगाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी,हंग्याचे सरपंच राजेंद्र शिंदे, राधाकृष्ण वाळूंज, मारूती रेपाळे,मल्हारी आव्हाड, किसनराव रासकर,जितेश सरडे,मोहन रोकडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. लंंके म्हणाले, लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर आतापर्यंत वेळ न मिळाल्याने या मेळाव्यास उशिर झाला. या निवडणूकीत जे यश मिळाले ते तुमच्या प्रामाणिक कामचे फळ आहे. मीच नीलेश लंके म्हणून प्रत्येकाने परीश्रम केल्याने मोठया शक्तीला आपण पराभूत करू शकलो. काही लोक आपणास तुमचे काम आहे का असे म्हणून हिणवत होते मात्र सामुहिक जबाबदारीमुळे हिनवणारांना मतपेटीतून आपण उत्तर देऊ शकल्याचे खा. लंके म्हणाले.
खा.लंके पुढे म्हणाले, विविध कार्यकर्त्यांवर तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. पारनेर तालुक्यात आपण पाठीमागे आहोत असे विरोधकांनी चित्र रंगविले होते. मला केवळ दोन दिवस तालुक्यासाठी देता आले तरीही ३९ हजारांचे मताधिक्य मिळाले. हे प्रामाणिक कामाचे यश असल्याचे लंके यांनी सांगितले.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या डोळयात आश्रू उभे राहिले. मात्र प्रत्येक जाण लोकसभा निवडणूकीत जीव ओतून काम करणार याची मला खात्री होती. ही निवडणूक तुमच्याच पाठबळावर आपण जिंकू असा विश्‍वास होता. महिला भगिनींनीही मतदारसंघात फिरून प्रचाराची धुरा सांभाळली.
महाविकास आघाडीचा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाला पाहिजे अशी खुणगाठ प्रत्येकाने बांधावी. उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे उमेदवार देणार आहेत. तुमच्या भावना मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडेल. या जिल्हयात प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडूण आणण्याची माझ्यावर जबाबदारी असल्याचे लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात भावींची चर्चा सुरू आहे. ते भावीच राहणार आहेत. तुम्ही ज्यांच्या अंगावर गुलाल टाकाल तोच तालुक्याचा आमदार होणार आहे. लोकसभा जिंकली आता विधानसभाही आपणच जिंकणार आहोत असा ठाम विश्‍वास लंके यांनी व्यक्त केला.
पारनेर-नगर मतदारसंघातील ३६५ बुथपैकी केवळ २७ बुथवर आपणास कमी मतदान झाले असून या बुथवरही मतदान वाढविण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी आपली असल्याचे लंके यांनी सांगितले

मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड
रत्नागिरी:- गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

मुझम्मील काझी यांचा स्पष्ट वक्तेपणा,सामाजिक कार्य,त्याच बरोबर जनसंपर्क बघून संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांनी ही निवड केली आहे.

मुझम्मील काझी यांची प्रमुख प्रवक्ते पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र अध्यक्ष उदय गोताड यांनी देवरूख येथे झालेल्या बैठकीत दिले.यावेळी संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उपाध्यक्ष राहूल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,सुरेंद्र काब्दुले,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर,जिल्हा संघटक मनोज घुग,संगमेश्वर तालुका सरचिटणीस दैवत पवार,संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष प्रशांत घुग,सदस्य नितीन गोताड,महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे,सरचिटणीस उजमा मापारी – खान इत्यादी उपस्थित होते.

देवेंद्रनाथ कासार यांचे कार्य प्रेरणादायी : पोपटराव पवार दत्त जयंती उत्सवानिमित्त गुणवंताचा गौरव
वाळकी : दक्षिण पूर्व रेल्वे विभाग प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त देवेंद्रनाथ कासार हे दरवर्षी अंबरईवाडी येथील शिवालय,दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्याच बरोबर गुणवंत विद्यार्थी व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करत आहेत.उच्च पदावर काम करत असताना देखील ते सामाजिक बांधिलकी म्हणून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. .त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादनआदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.

वाळकी (ता.नगर ) येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.त्यावेळी पवार बोलत होते.देवेंद्रनाथ कासार, पोपटराव पवार,डॉ. मंगेश देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गुणवंत विद्यार्थी दमयंती गिरवले,श्रेयसी झावरे, समृद्धी बोठे, सायली उंडे, अपूर्वा देविकर, वैष्णवी बोठे, भक्ती परभणे,सार्थक कासार, सुप्रिया जगताप, ऋतुजा पोटे, फिजा सय्यद, शीतल जासूद, वैशाली गुंड, आदिल शेख, प्रीती भालसिंग, आरती दरेकर, साक्षी थोरात, देवता कोठुळे, कल्याणी कुंजीर, अमृता माने, गायत्री झोंड यांच्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणारेआगडगाव देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे,प्रा. रमाकांत बोठे,न्यूज महाकेसरीचे मुख्य संपादक सचिन दांगडे,प्रसार माध्यमात काम करणाऱ्या प्रियंका शेळके,न्यूरोलॉजिस्ट डॉ. वैशाली काटकर,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार,कानसा वारणा फाउंडेशनची अध्यक्ष दीपक पाटील,लोकमत प्रतिनिधी शरद कासार, डॉ. मंगेश देशमुखआदींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुक्त देवेंद्रनाथ कासार यांनी केले तर डॉ. युवराज कासार यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, संदीप जाधव, अमोल कासार, डॉ. युवराज कासार, महादेव कासार, देवराम भालसिंग, संजय भालसिंगआदीसह अंबरईवाडी तरुणांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

वाळकी (ता. नगर ) येथील अंबरईवाडी येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार.

‘या , दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीने दिली ‘सावली’ला भेट ,मुलांना झाला अगणित आनंद
गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकातील एकल पालक असणाऱ्या मुलांना सांभाळण्याचं काम केडगाव येथील संकल्प प्रतिष्ठान अंतर्गत चालणारी सावली संस्था करत आहे,त्या सावलीमध्ये या मुलांना माणुसकीचे सावली मिळते, मुलांचा संगोपन, योग्य संस्कार आणि त्यांचे शिक्षण  सूत्री वरती सावली संस्था चालते. या सावली संस्थेचा कारभार नितेश बनसोडे हे पाहतात,  सावलीतील अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, अनेक जण सावलीला भेट देतात.

आपले वाढदिवस आपले समारंभ या ठिकाणी आपल्या परीने  जेवढी होईल तेवढी मदत सावली या संस्थेतील मुलांना करता.त अशीच एक स्नेह भेट दिगगज बॉलीवूडच्या अभिनेत्रीने नुकतीच दिली ,सावलीत मुलांना खऱ्या अर्थाने मुलांना निर्भयता अनुभवण्यास मिळत आहे..परंतु समाजात गेल्यावर डरो मत असे सांगीतले. दोनशे पेक्षा जास्त जाहिराती व अनेक हिंदी फिल्म मध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या अर्शीन मेहता सावलीत आल्यावर मुलांना खूपच आनंद झाला.. मुलांबरोबर एकरूप होऊन मुलांसमवेत नृत्य केले… गाणी म्हणाली..आणि खूप गप्पा मारल्या.

मुलांचे बरोबर अंगत पंगत देखील केली.. सावलीचे काम प्रेमाने भरलेले आहे हे पाहून मी सावलीच्या प्रेमात पडले आहे. यापुढे सदैव सावलीच्या सोबत असेल असे याप्रसंगी अर्षीन मेहता यांनी सांगितले . सावलीत मुलंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि आत्मविश्वास बघून मला खूप समाधान वाटले.
मेहनत करा खूप शिका आणि मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आय एम एस मॅने कॉलेज चे संचालक सुधीर मेहता सर उपस्थित होते त्यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. अभिनेता अवनीश याप्रसंगी उपस्थित होते. संस्थापक नितेश बनसोडे यांनी अर्निष मेहता यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आभार मानले

शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध आजी-आजोबांना फळ वाटप.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी.

शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध आजी-आजोबांना फळ वाटप

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माय माऊली केअर सेंटर मध्ये व अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थित एस.टी. टाईल्स ,विश्वराज मधुकर निगडे, कवीत पटेल, प्रतीक पटेल याप्रसंगी प्रगती फाउंडेशनचे
राहुल काळे, संतोष सोनकांबळे, तसेच माय माऊली सेंटरचे संस्थापक विठ्ठल वरुडे पाटील, आणि संचालक विशाल वरुडे पाटील, उपस्थित होते.