MPSC – News Mall 18

जगदीश केदार यांची कर सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सैदापुर येथील जगदिश केदार यांची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कर सहाय्यक पदि निवड झाल्याबद्दल हत्राळ सैदापुर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी बबनराव केदार होते, तसेच गावचे सरपंच भिमराव टकले, उपसरपंच सुखदेव केदार, राजेंद्र केदार सर, पाडळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कचरे, शेषराव कचरे, भानुदास गर्जे, अशोकराव गर्जे, डॉ,क्रुषिराज टकले संभाजी बडे एकनाथ केदार, रामभाऊ केदार, नामदेव काकडे, टकले गुरुजी,पाखरे गुरुजी ,म्हतारदेव गर्जे गुरुजी,राऊसाहेब कावळे वसंत केदार, नवनाथ केदार, पोपटराव केदार, तसेच हत्राळ सैदापुर व पाडळी गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

हत्राळ हे खुप कमी लोकसंख्या असलेल गाव, परंतु एका महिन्यात चार अधिकारी या गावात झाले,या गावचा आदर्श घेण्यासारखे आहे, येथील नविन मुलं खूप मेहनत अभ्यास चिकाटीने व एकमेकांना प्रेरणा देतात,या गावाची वोळख महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, जगदीश केदार हा शेतकरी कुटुंबातील असुन खुप हलाखीच्या परिस्थितीत मात करून हे यश संपादन केल्या मुळे सर्व स्तरातून जगदीश केदार अभिनंदन होत आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा शिवणकर यांनी केले तर परमेश्वर टकले यांनी आभार मानले.

जेव्हा अंगणवाडी सेविकाचा मुलगा अधिकारी होतो….ज्ञानेश्वरची सक्सेफुल स्टोरी!
राज्य भरात अंगणवाडी सेविकास संपावरती गेला, अनेक अंगणवाडी सेविकांनी संप पुकारले. त्यामुळे अंगणवाडी सेविका या पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला चर्चेत आल्या, अशाच एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा हा मोठा अधिकारी झाला,
नुकत्याच झालेल्या एम पी एस सी मध्ये ज्ञानेश्वर यांनी घवघवीत असे यश मिळवले, सर्व सामान्य कुटुंबातील ज्ञानेश्वर बबनराव मुखेकर हे पाथर्डी चे भूमिपुत्र आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषेदेच्या शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण हे कोरडगाव येथिल हायस्कूल झाले.

आई अंगणवाडीसेविका आणि वडील शेती संभाळत मजुरी करत असे , जेमतेम परिस्थिती असताना ही धीरज ज्ञानेश्वर यांनी आपल उच्च शिकणं पूर्ण केलं . चांगला अभ्यास करून डिग्री मिळवली , भाऊ धीरज सध्या आयटी कंपनीत काम करतो तर ज्ञानेश्वरचं यांचं शिक्षण बीई पूर्ण होऊन ते ही आपल्या अभ्यासाच्या जोरावर नोकरी करत होते त्यांचा शैक्षणीक संघर्ष जाणून घेऊ ….

नगरमध्ये पॉलीटेक्निक अहमदनगर या ठिकाणी त्यानी डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर सिंहगड कॉलेज या ठिकाणी त्याने डिग्री पूर्ण केली

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आपण चांगल्या ठिकाणी नोकरी करावी आणि काहीतरी करावी अशी इच्छा मनोमन होती त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली 2018 च्या मेन्स मध्ये अगदी थोड्या मार्गाने त्यांचा कॉल राहिला पहिला प्रयत्नात आपण अगदी ध्येयाच्या जवळ पोहोचलो मात्र अपयश आलं तरीही खचून न जाता त्यांनी त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला, आणि 2020 च्या एमपीएससी मध्ये ते उत्तीर्ण झाले आणि कक्षा अधिकारी मंत्रालय म्हणून त्यांचे नियुक्ती झाली एवढ्यावर च ते थांबले नाही , ‘संघर्ष अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही… अस म्हणत अभ्यास सुरूच ठेवला. तर नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये त्यांना चांगले यश मिळालं आणि सध्या ते वर्ग एक पदी रुजू होतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. पहिल्यांदा आलेल्या अपयशाला दोन हात करत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यांना यश ही मिळाल,
त्यांच्या या अभ्यासाच्या संघर्षामध्ये त्यांना त्यांच्या आई-वडिलांचे साथ मिळाली ,मामांची ,चुलत्यांच्या ,मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणावरती साथ मिळाली असे ते आवर्जून सांगतात

प्रेरणादायी: १४ व्या वर्षी लग्न तर १८ वर्षांपर्यंत २ मुलांची आई; IPS अंबिका यांची कहाणी.
हवालदाराची बायको IPS अधिकारी त्या दोघांच्या प्रेमाची प्रेरणादायी कहाणी ;
लग्नानंतर अनेक स्त्रियाचे आयुष्य बदलत अस म्हंटल जात ,मात्र हे खरच आहे ,अंबिकाच आयुष्य बदल ,पतीच्या साथीने तिने यश मिळवलं ,एन. अंबिका या एकदा त्यांच्या हवालदार पतीसोबत प्रजासत्ताक दिनाची पोलिस परेड पाहण्यासाठी गेली होत्या. तिथे त्यांनी पतीला पोलिस अधिकाऱ्यांना सलामी देताना पाहिले. मला हा सन्मान कसा मिळू शकतो असा प्रश्न त्यांना पडला. याबाबत अंबिका आपल्या पतीशी बोलल्या. हा सन्मान मिळवणे इतके सोपे नाही आणि त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात असे पतीने यावेळी सांगितले.

यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.तामिळनाडूच्या रहिवासी एन. अंबिका यांचा विवाह १४ व्या वर्षी दिंडीकलमधील पोलीस हवालदाराशी झाला होता आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्या दोन मुलांची आई बनल्या होत्या. अंबिका आपल्या घरच्या आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त होत्या. तोपर्यंत त्यांच्या मनात यूपीएससी आणि आयपीएस होण्याचा विचार येत नव्हता. चेन्नईत राहत असताना एन. अंबिका यांनी खूप मेहनत केली आणि यूपीएससी परीक्षेची खूप तयारी केली. मात्र, असे असतानाही त्या सलग तीन वेळा अपयशी ठरला. तिसर्‍यांदा अंबिका पास झाल्या नाहीत तेव्हा त्यांच्या पतीने परत येण्यास सांगितले पण आपण शेवटचा प्रयत्न करुन पाहू असे त्यांनी ठरवले आणि तसा आग्रह धरला. त्यांच्या पतीनेही याला होकार दिला

एन. अंबिका आणि त्यांचे कुटुंब एका छोट्या गावात राहत होते. येथे शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती. त्यानंतर अंबिकाच्या पतीने आपल्या पत्नीची चेन्नईमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी पत्नीच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला आणि नोकरीबरोबरच मुलांचा सांभाळ स्वतः करू लागला.एन. अंबिका यांनी चौथ्या प्रयत्नात आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि २००८ मध्ये यूपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली.

आपल्या पतीने दिलेली साथ हि बाब श्रेष्ठ आहे , अस बोलताना त्या सांगतात. कारण एका स्त्रीला संसार करताना रोज अनेक आव्हानं असतात त्याचा समान करत , यश मिळवाव लागत .

प्रेरणादायी : एका सलून चालकाच्या पोरीने मिळवले MPSC मध्ये यश, पास होऊन बनली RTO इन्स्पेक्टर.
आपण पाहतो कि दरवर्षी खूप मुले स्वतःला आजमावून बघण्यासाठी म्हणा अथवा स्वताला Prove करण्यासाठी MPSC ( महाराष्ट्र राज्य लोकसेवा ) परीक्षा देत असतात. यासाठी त्यांची खूप दिवसाची मेहनत, अभ्यास आणि त्यांच्या अभ्यासाबाबत असणारी चिकाटी या सगळ्याने त्यांना या परीक्षामध्ये यश मिळत असते. पुणे सारखे मोठ्या शहरामध्ये किती तरी क्लासेस यावर शिक्षण सुद्धा देत आहेत तर कित्येक मुले पुण्यामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी जात असतात.

दैनंदिन राज्यात लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देतात. मात्र, फार मोजकेच विद्यार्थी या कठिण परिक्षेतून पास होतात. दरम्यान, नुकताच राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एका सलून चालकाच्या मुलीने गगनभरारी घेत एमपीएससीची परिक्षा सर केली आहे आणि आरटीओ इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे.

या यशस्वी कन्येचे नाव सृष्टी दिवाकर नागपुरे असे आहे. ती काटोल येथील रहिवासी असून, तिच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. तसेच घरची परिस्थिती बेताची आहे. या परिस्थितीतून तिने हार न मानता सृष्टी दिवाकर नागपूरे या तरुणीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. आणि निकाल लागल्यापासून सृष्टी व तिच्या घरातले अतिशय खुश आहेत. आज तिच्या कष्टाची चीज झालेलं पाहायला मिळत आहे. तसेच तिचे स्वप्न आज पूर्ण होत आहे.

सृष्टीच्या वडिलांचे गावात छोटेसे सलून आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलींना शिकवायचे आणि मोठे अधिकारी बनवविण्याचे स्वप्न आई- वडिलांनी पाहिले. त्यांच्या पहिल्या मुलीची मागच्या वर्षी पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यानंतर धाकटीनेही अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तिने यात स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. सृष्टीने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच खासगी कंपनीत नोकरी करताना जिद्दीने वेळात वेळ काढून अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचे हे एकच ध्येय तिने ठरवले होते आणि ते तिने पूर्ण करुन दाखवले. यासाठी तिला मोठ्या बहिणीची प्रेरणा आणि आई-वडिलांचे पाठबळ मिळाले, असे आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झालेली सृष्टी नागपुरे म्हणाली आहे.

प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळते, कृषिकन्या प्रियांकाने मिळवले MPSC परीक्षेत यश.
आपण जर मनाशी ठरवले किंवा एखाद्या स्वप्नाचा पाठलाग केला तसेच त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच आपल्याला मिळतेच. खूप कमी लोक आपल्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचतात कारण त्यासाठी त्यांनी ठेवलेला संयम आणि चिकाटी यामुळे ते त्याच स्वप्न पूर्ण करू शकलेले असतात. जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात, असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश तालुक्‍यातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने कमावले आहे.

आपले पालक आपल्या मुलांवर जितका विश्वास ठेवतात, त्यांनी तितकाच विश्वास आपल्या मुलींवर ही ठेवावा, मुलगीसुद्धा अधिकारी होऊ शकते, तिला संधी द्या, पाठिंबा द्या. अधिकारी होऊन ती दोन्ही घराचे नाव उंचावू शकते, अशा भावना व्यक्त केल्यात प्रियंका घोरपडे यांनी. आणि हे अस्तिवात घडते देखील आज आपण पाहतो कि कित्येक मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने काम करत आहेत.

चांदोरी गावातील घोरपडे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रियंकाचा प्रवास थक्क करणारा आहे. जिद्द, परिश्रम व तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने यश मिळवले आहे,. प्रियंकाचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्यामंदिर, तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंताची पदवी प्राप्त करत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मधून सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर तिची निवड झाली.

प्रियंका लहानपणापासूनच तल्लख बुद्धीमत्तेची होती. घरातील सर्वच शेती करत. परंतु, तिची बुद्धीमत्ता व जिद्द बघून वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिले. याही परिस्थितीतही बीई सिव्हिल पर्यंतचे उच्चशिक्षण प्रियंकाने पूर्ण केले. परिस्थितीची जाण असलेल्या शिक्षण पूर्ण करतानाच आर्थिक अडचणींवर मात करीत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगले. अखेर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत यश संपादन करून कुटुंबीयांची मान उंचावली. एवढ्यावरच तिचा प्रवास थांबणार नाही. तिला समाजाची सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. तिच्या यशात आई-वडील, कुटुंबीय व मित्रमंडळींनी वेळोवेळी मदत केली. शैक्षणिक, आर्थिक सहकार्य केले. याबद्दल या सर्वांचे तिने आभार मानले.

ती स्पर्धा परीक्षा देऊन पास झाली, मात्र ज्याच्याकडील नोट्स वापरल्या त्यालाच ब्लॉक करून निघून गेली.
असं कुठं असतं का राव आपली मैत्रीण आहे म्हणून आपण तिला मदत करतो मात्र हीच मैत्री पुन्हा प्रेमात बदलते. मात्र हे प्रेम फक्त एखाद्या कारणासाठीच असतं का ? अतिशय सुंदर प्रशासनामध्ये काम करू पाहणाऱ्या दोन मित्र मैत्रिणी बदली ही गोष्ट आहे. दोघेजण ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्यामुळे या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. एकमेकांना अभ्यासात सर्वतोपरी ते मदत करायचे.

यूपीएससी परीक्षेत मुलगी पास झाली मात्र यासाठी तिचा बॉयफ्रेंड तिला सातत्याने पाडवा देत होता कारण दोघांनाही एकाच स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होते. आयएएस होणं हे काही सोपं नसतं यासाठी अनेक अभ्यास करावे लागतात. अनेक मेहनत करावी लागते आणि त्यासाठी अनेकदा देशभरातील लाखो विद्यार्थी यूपीएससी च्या माध्यमातून आयएएस होतात मात्र यातील एक किस्सा सध्या जास्त चर्चिला गेला.

एका तरुणाची गर्लफ्रेंड यूपीएससी मध्ये पास झाली आणि त्या प्रियकराला सोडून दिलं. सरकारी अधिकारी होताच. तिने ब्रेक अप केला आतापर्यंत याने दहा वेळा परीक्षा दिली पण तो एकदाही पास झाला नाही पण गर्लफ्रेंड त्याच्याच नोट्स वापरून पहिल्याच फेरीत पास होताच ती त्याला धोका देऊन पळून गेलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. दिल्लीतील मुखर्जी नगर याठिकाणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता.

अकरा वर्षे त्यांन पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नही केले मात्र तो प्रत्येक वेळी अपयशी ठरला, तर त्याची गर्लफ्रेंड त्यानेच केलेला अभ्यास आणि त्याच्या नोट्स वापरून मात्र पहिल्याच फेरीमध्ये यशस्वी होताच सरकारी नोकरी मिळताच आज तिने त्या तरुणाला ब्लॉक केला. त्याच्या सोबत ब्रेकअप केला याबद्दलची माहिती या तरुणानं मुलाखती मध्ये दिली. अपयश एक पाप आहे जग त्या व्यक्तीला कधीच क्षमा करत नाही असा अनुभव त्या तरुणाने यावेळी सांगितला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन मित्र मैत्रिणी मध्ये अशा प्रकारचा प्रसंग घडतो हे क्वचितच पाहायला मिळतं. दोघांचेही चांगलं रुटींग सगळ्या गोष्टी चांगल्या चालू असताना सरकारी नोकरी मिळाली ती अधिकारी झाली मात्र त्याला विसरून गेली असेच काहीसे पाहायला मिळते.

अभिमानास्पद :​ मुलं पोटात असताना तलाठी पदासाठी परीक्षा दिली, जेलर पदाच्या परीक्षेत यश मिळवलं.
एका स्त्रीसाठी आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आनंदाचा वेदनादायी असा क्षण म्हणजे तिची गर्भवस्ता असते. जितका आनंद एका बाळाला जन्म देण्यासाठी असतो, तितकाच संवेदना ते बाळाला जन्म देताना होत असतात. आपल्या घरात एक बाळ येणार म्हणून घरातलं वातावरण खूप आनंदी असतं. मात्र या बाळाला जन्म देताना या आईसोबत कुठलेही बरेवाईट होऊ नये याची चिंता प्रत्येकाला असते. नऊ महिने आईच्या पोटात बाळ वाढत असतं आणि या वेळी नाना विविध प्रकारचा त्रास ही जाणवत असतो.

मात्र हे सगळं काही बाजूला सारून या महिलेनं एक परीक्षा पास केली. या परीक्षेत उत्तीर्ण होतं त्यात थेट जेलर पदाच्या परीक्षेत एका चांगल्या अधिकाराच्या पदावरती पोहोचल्या. शिक्षण सुरू असतानाच त्यांचे लग्न झालं होतं. त्यांना चांगलं सासरही मिळालं मीरा यांना त्यांचे पती विषयी यांची मोठी साथ लाभली. लग्नानंतरही आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता आणि मूल पोटात असतानाच त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली.

अवघ्या दहा दिवसाच्या मुलाला घेऊन 2010 साली तलाठी म्हणून एका खेडेगावात रुजू देखील झाल्यावर यानंतरही त्यांनी आपलं काम करत स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केला. यावेळी त्यांनी जेलर पदासाठी परीक्षा दिल्या आणि त्यातही त्यांना यश मिळालं. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगाधिकारी मधल्या. सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले देखील आहेत आणि त्यांच्या पतीचा त्यांना भक्कम साथ देखील आहे.

शिकण्याची जिद्द चिकाटी हे अंगी असलं की, आपल्याला आयुष्यात काहीही मार्ग सापडतात. आपण आकाशाला गवसणी घालू शकतो. कोल्हापुरातील कळंबा येथे राहणाऱ्या मीरा बाबर यांनी हेच सिद्ध करून दाखवला आहे. कळंबा या ठिकाणी तुरुंग अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, मात्र त्यांचा संघर्ष काही कमी नाही. या तरुण तुरुंगाधिकारी होण्यापर्यंत त्यांना अपार कष्ट करावे लागले. अगदी दहा महिन्याच्या बाळाला घेऊन असताना कामावर रूजू व्हावं लागलं. तर बाळ पोटात असताना त्यांना स्पर्धा परीक्षा ही द्यावे लागले. मात्र मीरा बावरे या कधीही मागे हटल्या नाही. त्या सतत प्रयत्न करतच राहिल्या आणि शेवटी यशस्वी देखील झाल्या.

शिक्षणासाठी आईने दागिने गहाण ठेवले, आणि आज तोच मुलगा प्रशासनात मोठा अधिकारी ! पहा सविस्तर.
प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न असते, आपल्या मुलांना शिकावं आणि उंच भरारी घ्यावी असं वाटतं आणि यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतात. कधी त्यांना आपले डाग दागिने विकावे लागतात कधी जमिनी विकावे लागतात तर कधी कोणत्याही गोष्टी करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं. आणि हीच मुलं या सगळ्याची जान ठेवून आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात.

”सिद्धत से तुम चाहो तो कयामत भी झुकती है” असे फिल्मी डायलॉग आपण बऱ्याचदा प्रेमात मारतो. मात्र करिअर वरती प्रेम करताना जर अशाच पद्धतीने मेहनत केली तर नशीब सुद्धा झुकतं हेच या पठ्ठ्याने खरं करून दाखवलं, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून, गरीब शेतकरी कुटुंबातील पांडुरंग गोरख चोरमले यांच्या यशातून दिसून येतो.

बारावीनंतर पुणे येथून धातुशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात पैशाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासत होती. त्यामुळे वडिलांनी व्याजाने कर्ज काढले. तर आईने स्वतःचे सोने गहाण ठेवून पदवीच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत कसलीही कमतरता भासू दिली नाही. याकाळातच शिक्षणासाठी काही जमीन देखील विकली. परंतु आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती.

त्यांच्या कष्टामुळेच आपण शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यांनी अनेक हालअपेष्ठा सोसत शिक्षणासाठी पैसे उभा केले. घरच्या या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिद्द व चिकाटीने अभ्यास करत चांगल्या गुणांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेच नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची व पदाची नोकरी मिळाली. आईवडिलांचे कष्ट सार्थकी लागले होते. पगारातुन आलेल्या पैशातून घरची परिस्थिती देखील थोडीफार सुधारली होती. याकाळात लग्नही झाले. परंतु नोकरीच्या काळात स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली व आपण अधिकारी होऊ शकतो असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे कंपनीकडून विदेशात नोकरीची सुवर्णसंधी असताना देखील न जाता. नोकरी करत स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.

एकीकडे स्पर्धा परीक्षेत यश नव्हते, हातात नोकरी नव्हती, वय वाढत चालले होते, समाजात बोलणे खावे लागायचे. अशा स्थितीत कुटुंबीय व मित्रपरिवारने पूर्णपणे पाठिंबा दिला. जवळपास यूपीएससीच्या सलग चार अपयशानंतर पाठीमागील चुका सुधारत एक नव्या उमेदीने व जोशाने परिक्षेला सामोरे गेलो अन् वयाच्या 32 व्या वर्षी, पाचव्या प्रयत्नात यूपीएससीतुन भारतीय डाकसेवा अधिकारी (IPOS) म्हणून निवड झाली. सध्या कोलकत्ता येथे कार्यरत आहे.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना शिकावं आणि उंच भरारी घ्यावी असं वाटतं आणि यासाठी आई-वडील सर्वतोपरे परी प्रयत्न करतात कधी त्यांना आपले डाग दागिने विकावे लागतात कधी जमिनी विकावे लागतात तर कधी कोणत्याही गोष्टी करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं आणि हीच मुलं जी जाण ठेवतात आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात.

या यशाबद्दल पांडुरंग सांगतात की, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अल्पभूधारक शेतकरी कुटुंब‌. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. आई-वडिल दोघेही अशिक्षित जरी असले तरी शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आमची वस्ती होती. तिथेच उघड्यावर एका झाडाखाली पहिली ते चौथीपर्यंत शाळा भरायची. नंतर माध्यमिक शिक्षण गावातील वामनराव बदे विद्यालयातुन पुर्ण केले. लहानपणापासून हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात असल्याने, आत्मविश्वास आणखी वाढायाचा. अभ्यासाबरोबरच घरची जनावरे राखणे, इतर कामात आई-वडिलांना मदत करून गुणवत्तेचा आलेख प्रगतीपथावर असायचा. त्यामुळे आई वडिलांना आनंद तर होत असायचा. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील अकरावी बारावीसाठी बारामती येथील महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्यात आला. शिक्षणासाठी अधिक खर्च वाढल्याने, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळेच आपले घरची परिस्थिती बदलण्यासाठी पांडुरंग यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास सुरू केला त्यांना यामध्ये यश मिळालं नशिबाला ही त्यांच्यापुढे झुकाव लागलं आणि ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत एका उच्च पदावरती विराजमान झाले.

”जिचं नाही कोणी वाली ती PSI झाली ! एका अनाथ तरुणीच्या यशोगाथा …
यश संपादन करायला कुठलीही नातीगोती लागत नाहीत, ज्याचं कोणी नसतं ते ही यशस्वी होऊ शकतात. याचं हे उत्तम उदाहरण आहे एका अनाथ तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात घवघवीत मिळवलं यश …आणि सर्वांच्या समोर ती एक आदर्श बनली सुंदरी एस बी असं या मुलीचं नाव आहे . या वयाच्या तिसऱ्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवलं. त्यानंतर ती अनाथ म्हणूनच वाढली , मूळची लोणावळा येथील रहिवासी सुंदर आहे. मेहनतीच्या जोरावर आणि अभ्यासाच्या चिकाटीमुळे ती पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मळवली येथील संपर्क बालग्राम या संस्थेत ती राहिली, या संस्थेत राहून तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर तीने आपल्या शिक्षणात थोडाही खंड पडू दिला नाही.

लोणावळ्याजवळील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यान आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्याच महाविद्यालयात नोकरी देखील केली. या महाविद्यालयातून कम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर पीएसआय पदासाठी परीक्षा दिली, आणि पहिल्याच प्रयत्नात मोठं यश संपादन केले . महाराष्ट्र शासनाच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून ए पी एस आई ची निवड करण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक बनणारी सुंदरी ही पहिलीच मुलगी आहे . या सगळ्यात तिने सनाथ वेलफेयर फाउंडेशन या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मला मदत केल्या मुळेच यश संपादन करू शकले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

फक्त पीएसआय पदावर विराजमान नाही राहायचं, तर तिचे स्वप्न हे बाल महिला विकास विभागात अधिकारी व्हायच आहे. त्यासाठी पुन्हा जोमाने आणि जिद्दीने अभ्यास करायचा आहे आणि हे स्वप्न पूर्ण करायचे आहे . तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे भरभरून कौतुक केले जाते, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत . या जगात जिच कोणीच नाहीच नाही ती देखील एक मोठ्या पदावर विराजमान होते.जिद्द न सोडता मोठी भरारी घेत हे यश संपादन करते त्यामुळे नक्कीच सुंदरी एस बी हिचा यांचा हा प्रवास आदर्शवत व प्रेरणादायी आहे

महत्वाची बातमी : MPSC चा अभ्यास क्रमाबाबत हा महत्वपूर्ण बदल. पहा सविस्तर.
विद्यार्थ्यांना आपल्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी ते मेहनत घेत असतात. अगदी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. एमपीएससीच्या मार्फत या स्पर्धा परीक्षा होत असतात. आणि यातून सरकारी नोकरीची मोठी संधी असते.

मात्र आता नवीन पॅटर्नमुळे उमेदवारांच्या सरकारी नोकरीच्या संधी कमी होतील, अशी शंका उपस्थित होण्यास सुरुवात झालीय. कारण विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षांमधील नवीन पॅटर्न हा घातक ठरत असल्याचं उमेदवारच म्हणतात. त्यासाठी उमेदवारांनी आंदोलन देखील छेडली होती, मात्र आयोगानं थेट कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती मिळाली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांमध्ये अनेकदा सरकारी नोकरदार भरती होतात.

मात्र या स्पर्धा परीक्षांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता एमपीएससीच्या आता दोनच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत मात्र या पूर्व परीक्षेच्या आधारावरती निर्णय निरनिराळ्या विभागात आपल्या इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत. राजपात्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर राजपात्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा एम सी क्यू मध्ये असणार आहेत.

नवीन पॅटर्नमुळे उमेदवारांच्या सरकारी नोकरीच्या संधी कमी होतील यात शंका उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे एमपीएससी परीक्षा मधील हा नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांना घातक ठरू शकतो. कारण की आतापर्यंत विद्यार्थ्यांनी एमसीक्यूच्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्यामुळे यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होणार अभ्यासाची पद्धत बदलणं त्यामुळे उमेदवारांच्या संध्या कमी होतील असे विद्यार्थ्यांचा म्हणण.