भाजप – News Mall 18

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कांदा – सोयाबीन – धान उत्पादकांसाठी आनंदाची बातमी.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले पंतप्रधानाचे विशेष आभार

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार.

मुंबई, दिनांक १४ (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यतेलाच्या आयातीवर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी खाद्यतेलच्या आयातीवर शुल्क नसल्याने आपल्या देशातील आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. आता मात्र सोयाबीन उत्पादकांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% केल्याने याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आल्याने त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. लोकसभा निवडणूकीत त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय जनता पक्षालादेखील बसला होता. ही चूक सुधारून केंद्र सरकारने आज कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात (एम ई पी) किंमत हे पूर्णपणे संपवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात किंमतदेखील पूर्णपणे मागे घेण्यात आल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस म्हणाले.

महविकास आघाडीला आरक्षण नको; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला खुलासा
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे निष्पक्षता म्हणजेच समानता. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल आणि आता तशी परिस्थिती नाही. प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली.

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले…राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत, जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत.

आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

अंतरराष्ट्रीय मंचों पर राहुल गांधी ने हमेशा ही देशविरोधी बयान दिया है, जो किसी भी प्रकार से राष्ट्रहित में नहीं है।
हाल में ही आरक्षण ख़त्म करने को लेकर राहुल गांधी का बयान निंदनीय है। लोकसभा चुनाव के दौरान राहुल गांधी और कांग्रेस ने आरक्षण को लेकर झूठा नैरेटिव फैलाया लेकिन अब… pic.twitter.com/sVFqwbmml6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2024

राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि ते किती दिवस सुरू राहणार असा सवाल केला होता. त्यावर ते म्हणाले, ‘जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारत यासाठी योग्य जागा नाही.’ राहुल गांधी म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना १०० रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे.

नगर शहरातील रस्त्यांसाठी १० कोटीचा निधी -खा.विखे
अहमदनगर दि.२९ प्रतिनिधी
महापालिके अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १० कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी असून याबबातचा शासन आदेशही निर्गमित झाला असल्याची माहीती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खड्डेमुक्त रस्त्यांकरीता नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन २५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती केली होती.यापैकी ५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता झाली होती.या निधीचा दुसरा टप्पा म्हणून आता १० कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्यासही नगरविकास विभागाने मान्याता दिली असल्याचे खा डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.

नगर शहरातील नागरीकांना भेडसावणारी रस्त्यांची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी खा.विखे पाटील यांनी नगरविकास विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यांमध्ये निधी मंजूर करून केलेल्या सहकार्याबद्दल खा.विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत.

उपलब्ध होणार्या निधीतून शहरातील रस्त्याच्या कामांना गतीने पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या निधीच्या मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा डॉ सुजय विखे यांनी केलेल्या सहकार्याबदद्ल नगरसेवकांनी तसेच भाजपच्या शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत.

उदयनराजेंनी आणि अमित ठाकरे भेटीत नेमक काय घडल ? ठाकरे चक्क लाजले, VIDEO होतोय व्हायरल.
खा, उदयन राजे भोसले हे नेहमी त्यांच्या stlye ओळखले जातात, त्यामुळे चर्चेत राहिले आहेत, नुकतेच त्यांना ठाकरे पुत्र अमित ठाकरे भेटले त्यावेळी अस काही घडल, अमित ठाकरे चक्क लाजले, काय घडल असेल पाहुयात बातमी सविस्तर ,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. जेव्हा उदयनराजेंनी पत्रकारांना काय भेट दिली तेव्हा अमित ठाकरे चांगलेच लाजले आणि एकच हश्शा पिकली.

अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली असुन यानंतर त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होवून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे.अमित घरी आला तो माझा मुलगा घरी आल्यासारखा वाटला. अमित सारख्या तरुण नेत्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे.

अगदी प्रबोधकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सगळ्यांचा त्यांनी नाव लौकीक केला पाहिजे, अमित ठाकरेंचा फॅन फॉलोईंग जोरात आहे, असं म्हणत अमित येणार आहे म्हटल्यावर मला केसांना क्लब केलं पाहिजे, असं मिश्कील उत्तर सुद्धा उदयनराजेंनी दिलं. तसंच अमित ठाकरे यांच्या हातून खूप मोठं काम व्हावं‌ अशा शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं.

खासदार उदयनराजे भोसले यांची अमित ठाकरे यांनी साताऱ्यात घेतली भेट pic.twitter.com/jD9Y62g8US
— News18Lokmat (@News18lokmat) January 29, 2023

‘Bvlgari men हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला यावेळी ‘तू लहान राहिला नाहीस मोठा माणूस झाला आहे आणि आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे, असं उदयनराजे भोसले म्हणताच शेजारी अमित ठाकरेंना चक्क लाजले होते.तर, साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असं होवू शकत नाही. ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक होती, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. राजे किती दिलखुलास आहेत याची आत गप्पा मारताना प्रचिती आली, असं वक्तव्य करताच एकच हश्शा पिकली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दम नाही थेट इशारा; “अन्यथा बुलडोजर खाली घालू…” काय आहे प्रकरण ?
नितीन गडकरी हे नेहमीच राजकारणामध्ये वेगळे राहिलेत कारण त्यांची भाषा शैली त्यांची काम करण्याची पद्धत ही भाजपात राहून देखील वेगळी आहे असं अनेक जण म्हणतात त्यांचा स्वतःचा काम करण्याचा एक वेगळाच दरारा आहे,रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर खाली घालू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला.सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे.

या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता. हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

हा रस्ता या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही. अशा पद्धतीचे काम केलं जाईल असा विश्वास व्यक्त करत मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही, या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्ग संदर्भात आणि विमानतळावरील हवाई पट्टी संधर्भात तसेच फलटण ते सांगली रस्त्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असून नवीन मुंबई ते बंगलोर हायवे मुळे फलटणहून मुंबईला तीन तासात पोहोचता येईल, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच उंडवडी कडेपठार बारामती फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन शिंदेवाडी भोर वरणघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि लोणंद ते सातारा रस्त्याच्या मजबुती करण्याच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपा प्रदेश संयोजक तन्मय जैन करणार आत्मदहन; पहा काय आहे प्रकरण सविस्तर.
श्री लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी उंटावद, तालुका शहादा, जिल्हा नंदूरबार या सूतगिरणी संचालकांनी शेतकरी श्री बबनराव बोरसे, मानक चंद लोढा, हार्दिक लोढा, गजानन सोनावणे, सोनाबाई कायस्थ आदी अनेकांचा कापूस २ वर्षापूर्वी खरेदी केला व मालाची रक्कम २ महिन्यांनी मिळेल असे देखील सांगितले.

त्या ऐवजी त्यांनी पक्के बिल व धनादेश सुद्धा दिले. पण आज २ वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा सूतगिरणी चालक व मालक शेतकऱ्यांचे पैसे देत नसल्यामुळे हवालदिल झाले आहे. एकूण ४३ लाख रुपये हे या शेतकऱ्यांचे येणे बाकी असून, अंदाजे ३०-४०कोटी रुपये हे इतर शेतकऱ्यांचे सूतगिरणी कडे बाकी आहे.

त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. कृपया आपण या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून शेतकऱ्याना न्याय द्यावा ही विनंती. यासाठी दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी हितासाठी मी आत्मदहन करणार आहे. यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल ही अपेक्षा

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे व रक्कम(अंदाजे)
बबनराव माधवराव पाटील:- १५००००० (१५लाख)
मानकचंद ताराचंद लोढ़ा :- ८०००००( आठ लाख)
हार्दिक माणकचन्द लोढ़ा :- १२०००००( बारा लाख)
सोनाबाई सुभाष कायस्थ :-४५००००(चार लाख पन्नास हजार)
गजानन दोधा सोनावने :- ३६६०००( तीन लाख सहासष्ट हजार)

भर कार्यक्रमात BJP नेत्यांमध्ये हाणामारी; स्टेजवरच लावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल.
गल्लीमध्ये होणारे नळावरचे वाद अनेकदा पहिले असतील, ट्रेन मध्ये नळावरून होणारे वाद हि पाहिले असतील .महिला कधी कुठे वाद सुरु करतात, असाच एक वादाचा किस्सा भर स्टेजवर घडला आहे, दोन महिला कार्यकर्ता स्टेजवरच वाद करत होत्या,मध्यप्रदेशमधील पन्ना या येथे हा कार्यक्रम सुरु होता.मोदी सरकारनं स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. आपला परिसर स्वच्छ राहावा, प्रदुषण कमी व्हावं, रोगराई पसरू नये म्हणून केंद्र सरकार काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे. असाच एक कार्यक्रम मध्यप्रदेशमधील पन्ना या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमात चक्क भाजपाच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.

लक्षवेधी बाब म्हणजे कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे माईकवर भाषण करत असताना पाठीमागे स्टेजवर या महिलांची हाणामारी सुरू होती. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अन् देशभरातील नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.तर त्याचं झालं असं की पन्ना या ठिकाणी राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रादेशिक खासदार व्हीडी शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पन्ना में मंच पर बैठने को लेकर BJP की महिला नेत्री ने दूसरी नेत्री को मारा थप्पड़
जमकर वायरल हो रहा वीडियो, 22 दिसंबर को नेशनल चैंपियनशिप के समापन के दौरान कुर्सी पर बैठने को दौरान हुई झड़प
Video source-viral pic.twitter.com/Wtu9sAZARf
— Yogendra Chandel (@Ritvip1987) December 25, 2022

त्यांच्या हस्ते विजयी खेळाडूना पुरस्कारही देण्यात आले. शिवाय शिवराज सरकारचे कृषी मंत्री कमल पटेल, कामगार मंत्री ब्रिजेंद्र सिंह आणि स्थानिक आमदार संजय पाठक देखील उपस्थित होते. शिवाय शेकडो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. अशा नामांकित कार्यक्रात भाजपा महिला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

प्रमुख पाहुणे आपल्या भाषणातून स्वच्छ भारत अभियानाचं महत्व सांगत होते. पण नेत्याचं स्टेजवर भाषण सुरू असताना पाठीमागे एक महिला कार्यकर्ता उठली अन् ती दुसऱ्या महिलेसोबत भांडण करू लागली. पाहता पाहता हे भांडण इतकं वाढलं की एकीने दुसरीच्या कानशिलात लगावली. अन् मग काय स्टेजवर एकच हाणामारी सुरू झाली. या दोन महिला नेत्यांमध्ये मारामारी सुरू होताच भाजपचे सर्व प्रमुख नेते व्यासपीठावरून निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. शिवाय विरोधक नेते या प्रकरणावरून आता भाजपाला ट्रोल करत आहेत.

शिवरायांचा एकेरी उल्लेख तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या कोशारीचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाख रु बक्षीस.
राज्यपाल भगतसिंग कोसरी हे कायमच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेचा विषय बनले आहेत. याआधीही त्यांनी कित्येक वेळेस महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेले आहे. आणि आता पुन्हा एकदा या भगतसिंग कोषारीने सगळ्यांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त विधान केला आहे. आणि त्यामुळे सर्वांकडून या राज्यपालाचा तीव्र निश्चित केला जात आहे.

पुण्यामध्ये तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने बॅनरबाजी करून निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, जो कोणी या राज्यपालाच धोतर फाडील किंवा फेडिल त्याला चक्क एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे. याबद्दलची माहिती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोशारी याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे यांनी हे बॅनर लावले आहे.

आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणार पण उतरत्या वयामध्ये धोतरामध्ये घाण करायची सवय या राज्यपाल कोशारीला आहे आणि त्यामुळे आम्ही या कोशारीचा जाहीर निषेध करत आहोत. या कोषारीचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असा मजकूर त्या बॅनर वरती दिसत आहे.

या दरम्यान या कोशारीच्या विधानमुळे पुन्हा एकदा नवा निर्माण झाला आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केला आहे. त्यामध्ये शिवाजी तर जुन्या काळातले आहेत असं म्हणत नव्या वादाला या कोषारीने तोंड फोडला आहे. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावर संत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा असे त्यांनी यावर म्हटला आहे. कोषारी सातत्याने अशी बडबड का करतात असा प्रश्न मला कायम पडतो मी म्हणतो या कोषारीला महाराष्ट्राच्या बाहेर काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्राला नको आहे असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटल आहे.

” आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला विचारत होते तुमचा आवडता हिरो कोण आणि त्यावेळी सुभाष चंद्र बोस, गांधी जे चांगलं वाटत असेल त्यांची नावे सांगत होतो. पण आता महाराष्ट्रात तुम्हाला नवीन हिरो मिळतील. शिवाजी तर जुने झाले आहेत, नवीन काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींनी हे शिरोळ मिळतील असं राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली आहे.

काय ते नशीब ! भाजपच्या एका खासदारासाठी दोन बायकांनी ठेवलं व्रत, एकत्रच पूर्ण केला करवा चौथ.
एखाद्यचे काय नशीब असू शकते याचा अंदाज तुम्हाला या बातमीमध्ये येऊन जाईलच. आजच्या काळात इथे एक लग्न होईल कि नाही याची चिंता असते पण जर तुम्हाला २-२ बातम्या मिळाल्या तर ? हो तुम्ही म्हणाल कि इथे एकच होत नाही तर २ कुठून आणणार पण या बातमी मधील खासदार आहेत यांना चक्क २ बायका आहेत. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघीही सोबत राहतात.

ही बातमी उदयपूरचे भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या बद्दलची आहे. यांना दोन पत्नी आहेत. दोघीही एकाच घरात एकत्र राहतात. या दोघींनीही करवा चौथच्या निमित्ताने एकत्र उपवास करत अर्जुनलाल मीणा यांची पूजा केली. त्याचप्रमाणे या दोघींनी एकत्र पाणी पिऊन उपवास सोडला.

भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी अनेक वर्षांपासून आपल्या पतींसाठी करवा चौथचं व्रत करतात. करवा चौथच्या निमित्ताने दोघींनी कथा ऐकली आणि चंद्र आल्यावर पती खासदार मीणा यांना पारंपारिक पद्धतीने टीळा लावून, मिठाई भरवत, आरती करुन दोघींनी एकत्रच चंद्र आणि मीणा यांना चाळणीतून पाहिलं. अर्जुनलाल मीणा हे म्हणतात की, ते खूप दिवसांपासून आजारी होते, पण आता ते बरे झाले आहेत. दोन्ही पत्नींच्या व्रतामुळेच बरे होऊ शकल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे.. याआधी ते अनेक दिवस दिल्लीतील रुग्णालयात दाखल होते.

खासदार अर्जुनलाल मीणा यांनी दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं आहे. मीणा यांनी सख्ख्या बहिणींशी लग्न केल्यामुळे या दोघींमध्ये दुरावा नाही. खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या एका पत्नीचं नाव राजकुमारी असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे. दुसऱ्या पत्नीचं नाव मीनाक्षी आहे. ती एका गॅस एजेन्सीची मालकीण आहे. या दोघी सख्ख्या बहिणी असल्याने त्या मागील कित्येक वर्षांपासून एकाच घरात आनंदाने राहत आहेत. आदिवासी भागात पुरुष एकाहून अधिक महिलांशी लग्न करू शकतात अशी परंपरा आहे.

अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील २५ खासदारांपैकी एक आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयपूरच्या जनतेने मीणा यांना संसदेत निवडून दिलं. पण या सगळ्यात चक्क दोघी सख्या बहिणी एकाच नवऱ्यासोबत गेले कित्येक वर्षापासून संसार करत आहेत. आणि कोजागिरी निमित्त या दोघींनी उपवास सोडताना सोबत उपवास सोडला आहे.

भाजपच्या ” या ” मोठ्या नेत्याने स्वतःवरच झाडल्या गोळ्या, बीडमधील धक्कादायक घटना पहा बातमी सविस्तर.
सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना आपण सगळे पाहत आहोतच. काही दिवसापूर्वी बीडचे जे आमदार आहेत यांचा मुंबई पुणे या महामार्गावर अपघात झाला होता. या अपघाताला नंतर बरेचसे वेगवेगळे मार्ग देखील देण्यात आले. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच आता भाजपाच्या एका नेत्याने स्वतःवरच गोळी झाडून घेतलेला प्रकार समोर आला आहे. सदर घटना ही बीड मधील असून या घटनेने पूर्ण राजकीय क्षेत्रांमधील लोकांमध्ये एकच खळबळ होताना पाहायला मिळत आहे.

यामध्ये मिळालेली माहिती अशी की, बीड मधील भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली आहे. भगीरथ बिहारी यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता या गोळीबारामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणीचे समर्थक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बियाणे यांच्या घरी धाव घेतली.

तसेच घटनेची माहिती मिळतात खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरांमध्ये एकच खळबळ पाहायला मिळत आहे. याबाबतचा अधिक तपास बीड पोलीस करत आहेत. पण सध्या भाजप आणि शिंदे यांची सत्ता असताना एक भाजपाचा कार्यकर्ता किंवा भाजपाचा शहराध्यक्ष चक्क स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करत आहे आणि याबाबतची चर्चा रंगली आहे तसेच कोणालाही अंदाज येत नाहीये कि नेमकी बियाणी यांनी हे पाऊल का उचलले असेल. याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.