माहिती तंत्रज्ञान – News Mall 18

बार्टी समतादूत प्रकल्प अहिल्यानगर तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्प अहिल्यानगर च्या वतीने संविधान 75 वे अमृतमहोत्सवी वर्षे च्या निमित्ताने घर घर संविधान च्या अनुषंगाने विविध उपक्रमाव्दारे संविधानाची जागरूकता, संविधानाचे महत्त्व त्यातील कर्तव्य, मूलभूत हक्क ,मुल्ये आणि त्यातील विविध तरतूदीबाबत विद्यार्थीमध्ये तसेच नागरिकामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी रॅली, प्रबोधन कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, संविधान उद्देशिका चे वाचन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी समतादूत मार्फत कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले

संविधान सप्ताह साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रम अंतर्गत देविभोयरे पारनेर अंबिका विद्यालय, लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय राहुरी, धर्मनाथ विद्यालय जवळे , संत तुकाराम विद्यालय बारागाव नांदुर, पी जी अंबरे विद्यालय संगमनेर, मढी विद्यालय ,जि.प.शाळा निंबेनांदुर , मळगंगा विद्यालय निघोज, चांदेकसारे ग्रामपंचायत अकोले ,भातकुडगाव हायस्कूल शेवगाव आदि ठिकाणी कार्यक्रम समतादूत मार्फत विविध उपक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, पालक, सरपंच उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे तसेच संपूर्ण सप्ताह अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून हर घर संविधान ही संकल्पना चे आयोजन सहा.आयुक्त समाजकल्याण अहिल्यानगर चे प्रविण कोरगटीवार साहेब , बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील समतादूत रजत अवसक, संतोष शिंदे, वसंत बढे, रवी कटके, सुलतान सय्यद व पिरजादे एजाज हे विद्यालय व महाविद्यालय येथे तालुकास्तरावर कार्यक्रम चे आयोजन केले आहे.

काव्य संमेलनातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा जागरनिमगाव वाघात रंगलेल्या काव्य संमेलनात आदर्श शिक्षक व साहित्यिकांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. शिक्षक दिनानिमित्त रंगलेल्या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी व नवोदित कवींनी आपल्या काव्यातून जीवनामध्ये शिक्षकांचे महत्त्व विशद केले. या काव्य संमेलनात शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परिवार मंगल कार्यालयात झालेल्या काव्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी काव्य संमेलनाचे अध्यक्ष गीताराम नरवडे, कार्याध्यक्षा अनिताताई काळे, संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, भागचंद जाधव, दिलावर शेख, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, उपसरपंच प्रमोद जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना घडवत नाही, तर तो समाज घडवत असतो. शिक्षणाचा अंतिम ध्येय सुसंस्कारी नागरिक घडविणे आहे. धनसंपत्ती कालांतराने संपून जाते, मात्र ज्ञान ही गोष्ट दिल्याने वाढत असते. शिक्षकांसह समाजाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके म्हणाल्या की, समाजात शिक्षकांचा सन्मान होणे आवश्‍यक आहे. शिक्षकांमुळे सक्षम भारत घडत आहे. शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून, त्यांच्यामुळे समाजव्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान कौतुकास्पद असल्याचे, त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, खेळाडू, कलाकार, साहित्यिक व कवी यांना संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांना पुरस्काररुपाने त्यांना स्फुर्ती दिली जात आहे. शिक्षक दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचे निस्वार्थ कार्य समाजापुढे येण्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या कवितेने कार्यक्रमास प्रारंभ झाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व उत्कृष्ट साहित्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अमोल महाराज फड, देवीदास बुधवंत, निवृत्ती महाराज कानवडे, गोकुळ गायकवाड, सरला सातपुते, हेमलता गिते, सिमा गायकवाड, शिवदास कांबळे, सुभाष सोनवणे, आनंदा साळवे या कवींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. तर बालकवी प्रमोदिनी पठाडे, समृध्दी सुर्वे, दुर्गा कवडे, प्रिती टेकाळे या बालकवींनी देखील उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शिवशाहीर ओवी काळे यांनी महापुरुषांवर पोवाडे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, अतुल फलके, जालिंदर बोरुडे, रामा पवार, प्रा. गणेश भगत, मयुर काळे, रघुनाथ डोंगरे, भाऊसाहेब जाधव, गोरख चौरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले.

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे:-
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- उत्तम कांडेकर, अनिता काळे, अनुरिता झगडे, कारभारी शिंदे, प्रमिला झावरे, संगिता घोडके, भरत कांडेकर, एकनाथ पालवे, सिमा गायकवाड, स्मिता गायकवाड, अविनाश साठे, साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान- सरोज आल्हाट, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब कोठुळे, ओवी काळे, शिवदास कांबळे, विजय मोरे, उत्कृष्ट पत्रकारिता- प्रियंका पाटील शेळके, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- शिवाजी पठाडे.

सावेडी येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ.
अहमदनगर (प्रतिनिधी)- अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले आहे. विश्‍वाची संकल्पना फिजिक्स शिवाय अपूर्ण आहे. अध्यात्माने परिपूर्ण असलेल्या आपल्या देशाने फिजिक्स मध्ये सर्वोच्च शिखर गाठले आहे. देशातील कानाकोपऱ्यात खऱ्या गरजवंतांना ज्ञान पोहोचवण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत असल्याचे प्रतिपादन मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केले.

शहरातील सावेडी, गुलमोहर रोड येथे दिल्ली येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरच्या शुभारंभ रविवारी (दि.7 जानेवारी) प्रसंगी कृष्ण प्रकाश बोलत होते. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमासाठी फिजिक्सवाला विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार क्षितीज कणिक, तरुण खंडेलवाल, नितीनकुमार बिट्टल, नकुल तिजारे, साहित्यिक देवेंद्रसिंह वधवा, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, संचालक हरीश तावरे, जस्मितसिंह वधवा, महेश काळे, सहेजकौर वधवा, दिपाली काळे, युगंधरा तावरे, मुकुंद गंधे, राजेश जग्गी, सनी वधवा, रमेश तावरे, नगर शाखेचे नेहा तलवार, सुवर्णा रिंगणे, सुमित वैराळ, मिसबा शेख आदींसह जिल्हाभरातून आलेले विद्यार्थी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे कृष्ण प्रकाश म्हणाले की, गुरु शिष्यांना पूर्ण क्षमतेने ज्ञान देत असले तरी विद्यार्थ्यांना परिश्रमाने व मनापासून ते ग्रहण करावे लागणार आहे. शिक्षणाला शॉर्टकट नाही. शिक्षणासाठी बुद्धी व परिश्रम गरज असून, स्पर्धा देखील मोठी आहे. ज्याच्यात क्षमता असेल तो या स्पर्धेत टिकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षणात मित्रांशी स्पर्धा न करता, त्यांच्याबरोबर एकजुटीने शक्ती निर्माण करुन पुढे जाण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शिक्षण क्षेत्राततून प्रत्येकाच्या जीवनाचा पाया रचला जातो. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याची आवश्‍यकता असून, शहरात नव्याने आलेले हे शैक्षणिक संकुल दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षणातून समृद्ध व आत्मनिर्भर भारताचे पाऊल पडत आहे. पिढी घडविण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत आहे. 2023 हे वर्ष चंद्रयान वर्ष म्हणून ओळखले जाणार असून, हा दिवस देखील दरवर्षी साजरा होणार आहे. अध्यात्मातून जीवनात ऊर्जा निर्माण होत असते व ही प्रक्रिया फिजिक्सची जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. फॅकल्टी स्टारयांनी एखादी गोष्ट मनाला लागली तर जीवनात बदल घडतो. जीवनात ध्येय प्राप्ती करण्यासाठी मनातील नकारात्मकता सोडा. स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करणारे आपल्यातीलच एक असतात. सातत्याने परिश्रम करा यश निश्‍चित मिळणार असल्याचा त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. तर स्वतःला कमी समजू नका, सर्व काही शक्य असल्याचा आत्मविश्‍वास विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थी दशेतील वेळ वाया न घालवता वेळेचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. तर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासातील येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे प्रश्‍न विचारुन अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसं देखील देण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्ण प्रकाश व विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी झुंबड उडाली होती.

फिजिक्सवाला विद्यापीठ यांचे देशात 86 ठिकाणी जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स, एनईईटी (नीट), एमएचसीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे केंद्र आहेत. त्याची शाखा नगरला सुरू झाली असून, शहरातील विद्यार्थ्यांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तर इयत्ता आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय समोर ठेऊन सायन्सचे क्लास घेऊन तयारी करुन घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन दिप्ती शुक्रे यांनी आभार मानले.

रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये नागपंचमीनिमित्त व्याख्यान; सापांना मारण्याऐवजी सर्पमिञांना कळवा – सर्पमिञ संतोष लाकडे
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,

नागपंचमी निमित्ताने रेसिडेन्सील हायस्कूल मध्ये खास संतोष लाकडे यांचे व्याख्यान मध्ये बोलत होते,निसर्गातील महत्त्वाचा घटक आणि परिसंस्थेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून सापांची ओळख आहे.

हे मूल्य जाणूनच भारतीय संस्कृतीने सापांना पूजनीय बनविले आहे. परिणामी नागपंचमीच्या दिनानिमित्ताने का होईना सापांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. हा दिन साजरा करण्यामागचा उदात्त हेतू बाजूला सारून नाग किंवा सापाला दूध पाजणे, त्यावर हळद-कुंकू टाकून त्याची पूजा करणे यासारख्या अंधश्रद्धायुक्त प्रथा पाळल्या जात आहेत.

साप दूध पित नाही किंवा त्यावर हळद-कुंकू टाकू नये, याचा प्रचार आणि प्रसार दरवर्षी केला जात असला तरी रुढींच्या ताब्यात असलेल्या या बाबी कमी होताना दिसत नाहीत असे मत जे.बी.एस.एस पर्यावरण विभाग संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा. संतोष लाकडे यांनी व्यक्त केले. ते रेसिडेन्शिअल हायस्कूल व राष्ट्रीय हरित सेना आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. सर्प हे पर्यावरणामध्ये आवश्यक आहे नागपंचमीला नाग देवतेची पूजा केली जाते. एखादेवेळी आपल्या घरामध्ये एखादा साप निघाला तर सर्प मित्राला फोन करून तो पकडण्यास सांगावे . असे आव्हान केले.याप्रसंगी सर्पमित्र संतोष लाकडे व विशाल गोरे यांचा विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे ,पर्यवेक्षिका छाया शिंगटे तसेच हरित सेना विभाग प्रमुख नितीन भुसारी आदी उपस्थित होते. त्याबरोबर विद्यालयातील सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या व्याख्यानाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर आभार रामनाथ काळे यांनी मानले.

पारनेर तालुक्यातील ती आश्रमशाळा बनली होती ‘भ्रष्टाचाराचं माहेर घर’पाहा बातमी सविस्तर
पारनेर  : प्रतिनिधी संजय मोरे

ढवळपुरी येथील धन्वंतरी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशनच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील गैरव्यवहार, अनियमिततेमुळे राज्याच्या इतर मागास बहुजन संचालनालयाचे संचालक सिध्दार्थ झाल्टे यांनी आश्रमशाळेवर प्रशासन नेमण्याचे आदेश दिले आहे. या आश्रमशाळेच्या प्रशासनाने शासनाच्या कोटावधींच्या निधीला चुना लावल्याने संभाजी देवराम रोहोकले यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात येऊन या संस्थेची चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालाच्या आधारे या आश्रमशाळेवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशामुळे तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
आश्रमशाळेचे विनापरवानगी स्थलांतर तसेच कामकाज गंभीर स्वरूपाची अनियमितता असल्याने या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठी रोहोकले यांनी अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचयाकडे दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी पुनर्विलोकन अपिल अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचलनालय यांचा प्रशासन नेमणूकीचा आदेश कायम ठेवत विनापरवाना स्थलांतर व गंभीर स्वरूपाच्या अनियमिमततेमुळे संस्थेवर प्रशसाक नियुक्ती तसेच दोन लाख रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
धन्वंतरी संस्थेने अल्फा संस्थेस बक्षिस म्हणून दिलेली जागा येत्या तिन महिन्यात परत घेण्यात यावी. ती संस्थेच्या नावावर झाल्याची खात्री करून समाजकल्याण विभागाच्या सहाययक आयुक्तांनी त्याबाबत संचनालयास सादर करावा. तोपर्यंत संस्थेला इमारत भाडे देण्यात येऊ नये. सहाय्यक आयुक्त व जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी यांनी संयुक्त तपासणी करून आश्रमशाळेस या कालावधीत देण्यात आलेलेे भाडे तीन महिन्यांच्या कालावधीत वसुल करावे शासन जमा करण्यात यावे. सहाय्यक आयुक्तांनी सखोल तपासणी करून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी किंवा कसे याबाबतचा अहवालही तीन महिन्यात सादर करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
ढवळपुरीच्या सुतारवाडी येथे प्राथमिक आश्रमशाळेसाठी शासनाने सन १९९६ मध्ये मान्यता दिली होती. काही काळ सुतारवाडी येथे आश्रमशाळा चालविण्यात येऊन नंतर संस्थेने विना परवानगी आश्रमशाळेचे ५ किलोमिटर अंतरावरील ढवळपुरी येथे स्थलांतर केले. चौकशीत तसे निष्पन्नही झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सईद अहमद काझी यांनी आश्रमशाळेकडील जागा सन २००७ मध्ये अल्फा यांस्थेस बक्षिसपत्र करून दिली. दोन्ही संस्थांचे डॉ. काझी हेच अध्यक्ष होते. धन्वंतरी संस्थेच्या इमारतीच्या तळ मजल्यावर या विभागाच्या अखत्यारित येत नसलेल्या अल्फा सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेचे उच्च महाविद्यालय सुरू करण्यात आल्याचे चौकशी निष्पन्न झाले. त्यामुळे एकाच जागेचा दोन संस्थांसाठी वापर करण्यात आल्याचे उघड झाले. आश्रमशाळेसाठी वापरण्यात येत असलेली जागा कोणत्याही परवानगी शिवाय इतर संस्थेला बक्षिस म्हणून देण्यात आली.
सन २००४ ते सन २००७ अखेरचा इमारत भाडे करारनामा ज्या २० रूपयांच्या मुद्रांकावर करण्यात आलेला आहे तो मुद्रांक दि. १६ एप्रिल २००७ रोजी खरेदी करण्यात आला असून इमारत भाडे करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी करण्यात आलेला नाही. सन २००७ ते सन २०१० दरम्यानचा भाडे करारनामा १०० रूपयांच्या मुद्रांकावर करण्यात आला असून तो मुद्रांक ११ सप्टेंबर २००९ रोजी खरेदी करण्यात आला आहे. हा करारनामाही दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदविण्यात आलेला नसल्याची गंभीर बाब चौकशीत उघड झाली आहे.
संस्थेने आश्रमशाळेसाठी ठरविलेली जागा तसेच इमारत इतर संस्थेला बक्षिस म्हणून देऊन त्यामार्फत शासनाचे इतर उपक्रम राबवून एकच जागा व इमारतीसाठी दोन विभागाचे अनुदान लाटण्यात आल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. हंगामी वसतीगृह चालविण्यासाठी संस्थेने जिल्हा परिषदेकडूनही इमारत भाडयापोटी निधी घेतला आहे.
धन्वंतरी संस्थेशी संलग्न असलेल्या अल्फा संस्थेमार्फत भाळवणी येथे चालविण्यात येत असलेल्या आयझॅक इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये अनुसुचित जमातीच्या विभार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणे या आदीवासी विकास विभागाची योजना सन २०१०-११पासून राबविण्यात आली. त्यासाठी अनुदान घेण्यात आले. याबाबत चौकशी केल्यानंतर सन २०२२-२३पासून या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. या योजनेतील विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी भाळवणी येथे वसतीगृह नसल्याने धन्वंतरी संस्थेच्या वसतीगृहामध्ये व्यवस्था करण्यात येऊन दोन विभागांकडून दोन स्वतंत्र योजनांसाठी एकाच वसतीगृहाचा वापर करण्यात येऊन भाडे उकळण्यात आले.

शेतकरी कन्या रेवाची सातासमुद्रापार भरारी; अमेरिकेत झाली या पदावर रुजू..
सामान्य शेतकरी कुटुंबाचे नाव चर्चिले जात आहे,अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावातील रेवा दिलीप जोगदंड हिने यशाची उत्तुंग भरारी घेत अमेरिकेतील नेव्हल एअरफोर्समध्ये फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली आहे. एका शेतकरी कन्येने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला असून विद्यार्थ्यांसाठी तिचे यश आदर्श ठरत आहे. रेवाने जोगदंड हिने आपल्या कर्तबगारीने हे पद मिळवलं. यासाठी रेवाने दोन वर्षांपासून अथक परिश्रम घेतले होते.पदासाठी अमेरिकेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २६ जणांची निवड झाली. त्यातून एकमेव रेवा जोगदंडची फ्लाइट कमांडरपदी वर्णी लागली आहे. यामुळे हौसेसाठी काय पण करणारे कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे

कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवून दाखविणे यावर संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. रेवा हिने बालपणातच यातून प्रेरणा घेतली. तेव्हापासून तिने पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यातही उतरले.

अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे ३०० उंबरठ्याचे गाव असून येथील व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसायातून काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सतत नवनवीन प्रयोग केले जातात. दोन वर्षांपूर्वी प्रगतशील शेतकरी राम कदम यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. आता रेवाने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केले आहे.

गावकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे. आमचे बंधू दिलीप जोगदंड यांनी मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ म्हणत मुलगी रेवा हिला वैमानिक क्षेत्रात शिक्षण दिले. रेवामुळे सामान्य शेतकरी कुटुंबाचे नाव चर्चिले जात आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी एमईटी आणि डेल्फिक कौन्सिल ऑफ महाराष्ट्रची हात मिळवणी
मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एमईटी) आणि डेल्फिक कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी राज्यातील कला आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी हातमिळवणी करत एक संयुक्त करार केला आहे. आंतरराष्ट्रीय डेल्फिक चळवळीची २८ वर्ष पूर्ण होत असल्यानं या निमित्ताने एमईटी आणि एमईटी ऋषीकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक ७० मीटर लांबीच्या लाइव्ह आर्ट वॉल कॅनव्हास पेटिंगमध्ये ‘पाणी’ या थीमभोवती महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

डेल्फिक आर्ट वॉल या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालव आणि कलाकार नीलेश मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कार्य़क्रमात एमईटी विश्वस्त पंकज भुजबळ, आंतरराष्ट्रीय डेल्फिक कौन्सिलचे महासचिव रमेश प्रसन्ना, महाराष्ट्र डेल्फिक कौन्सिल अध्यक्ष सुरेश थॉमस, हंगामा म्युझिक उपाध्यक्ष सौमनी पॉल, डेल्फिक कौन्सिल महाराष्ट्राचे मुख्य सदस्य अभिजीत भुजबळ, अनुजा सहाय, अली अकबर रिझवी, दिप्ती शाह, सेजल गाला आणि सुशील मिस्त्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते.

डेल्फिक आर्ट वॉल या कार्यक्रमात एमईटी संस्था आणि एमआरव्हीच्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी व्हावी, यासाठी डेल्फिक गेम्स २०२३ दरम्यान ही पेंटिंग्ज विविध राज्ये आणि देशांसोबत एकत्र करून ११ किमी लांबीची आर्ट वॉल तयार करणार आहे. समाजात कला आणि संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणं हा डेल्फिक चळवळ मुख्य उद्देश आहे.

“डेल्फिक आर्ट मूव्हमेंटने एमईटी आणि एमआरव्हीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन घडविण्याची संधी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे, कला आणि संस्कृतीचा विकास हा जलसाठाभोवती झाला आहे, हे एकमात्र सत्य आहे. तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी डेल्फिक कौन्सिसची मदत होत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे,” असे पंकज भुजबळ म्हणाले.

या कार्य़क्रमात एमईटी आणि एमआरव्हीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य जसे की, तारपा नृत्य, ढोल नृत्य, आदिवासी नृत्य आणि नंदी नृत्य अशा विविध कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. एमईटीच्या विद्यार्थ्यांच्या फॅशन शो ने या कार्यक्रमाची सांगता झाली. या उत्सवात एसईटी ने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठ डेल्फिक क्लबची घोषणा सुद्धा केली आहे. शोच्या थीममध्ये डेल्फिक आर्ट वॉल लाइव्ह पेंटिंगसह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे पोशाख प्रदर्शित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र डेल्फिक कौन्सिलचे अध्यक्ष सुरेश थॉमस म्हणाले की, “महाराष्ट्राची संस्कृती आणि कला ही विविध गोष्टींनी निटलेली आहे. या कलासंस्कृतीचे दर्शन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांमध्ये आणि जगातील इतर भागांमध्ये दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे मिशन आहे.”

मुंबईतील महापालिकेच्या विद्यार्थ्यांची कमाल ! मुंबईचे अंतरंग दाखवणाऱ्या फोटो प्रदर्शनाची ,जाणून घेऊयात सविस्तर माहिती …
सलाम बॉम्बे मीडिया अकादमीचे बहुरूपी मुंबईचे फोटो प्रदर्शन

सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम, खेळ, कला, व्यावसायिक कौशल्य विकास आणि मीडिया अकादमी असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या ‘A CHILD IN SCHOOL HAS A FUTURE’ या ब्रीद नुसार सलाम मुंबई मीडिया अकादमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे.
मीडिया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रामधिल करियरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. सदर प्रशिक्षणातून विकसीत झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करून व विद्यार्थ्यांनी विविध छायाचित्रांचे प्रकल्प केले आहेत. ते राहत असलेल्या वस्त्यांमध्ये त्यांच्याशी निगडीत विषयाला अनुसरून त्यांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर करणार आहेत.
मुंबई सुमारे १.८४ करोड लोकांची वैविध्यपूर्ण जीवनशैली असून सर्वांचे पालनपोषण करते. मुंबई हि सर्व प्रकारच्या लोकांसाठी स्वप्ननगरी आहे. परंतु याठिकाणी सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतील असे नाही. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या लोकांना विविध उत्पन्न स्तरावरील मिळणारी संधी. सुमारे ६५% लोकसंख्या वस्त्यांमध्ये राहत असल्याने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची पुरेशी संसाधने उपलब्ध नाहीत. ते या मल्टिव्हर्सचा एक भाग आहे. या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून सलाम बॉम्बे मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईचे विविध चित्र दाखवण्यासाठी त्यांच्या लेन्सद्वारे हे सार टिपले आहे.
बालदिनाचे औचित्य साधून ‘मल्टीवर्स ऑफ मुंबई (बहुरूपी मुंबई)’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक १४/११/२०२२, सोमवार, सकाळी ११ ते संध्याकाळी ६ रोजी कोरम क्लब ८ वा मजला, टॉवर 2A, वन वर्ल्ड सेंटर, लोअर परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनाला वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी, मीडिया कॉलेजचे विद्यार्थी, नामांकित छायाचित्रकार तसेच वेगवेगळ्या माध्यमांचे प्रतिनिधि उपस्थिती दर्शविणार आहेत.
८१०८३६९३७१ या संपर्क क्रमांकावर सकाळी ११ ते सायं ०६ पर्यंत संपर्क साधा अथवा amruta.shinde@salaambombay.org या मेल आय.डी वर आपली तपशीलवार माहिती पाठवून द्या.

आय.एम.एस ( IMS )च्या आयटी विभागाच्या एम.सी.ए. च्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये या वर्षीही घवघवीत यश.
शिक्षण झाल्यानंतर त्या डिग्रीमध्ये मास्टर करून चांगला ठिकाणी नोकरीला लागायचे हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं आणि त्यासाठीच त्याची शिक्षण घेण्यासाठी धडपड चालू असते. व याच शिक्षणाच्या जोरावर नोकरी करून आपले भविष्य उज्वल करत असतो. अहमदनगरच्या अशाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे आणि चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये यश मिळवला आहे.

एम. सी. ए. च्या २०१९ मधील २२ विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये या वर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मुलाखतीच्या द्वारा निवडीच्या संधी दिल्या. १८ विविध कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्नाली काळे, मयूर गव्हाणे व अपुर्वा देवळालकर यांना सर्वाधिक पॅकेज मिळाले आहे.

अपुर्वा देवळालकर(आरहील, पुणे), स्वप्नाली काळे(होनुर, पुणे), राधिका देवी (बन नेटवर्क, पुणे), नितिन घाडगे (सिलेरिटीओ, पुणे), सुम्मय्या शेख (सोल्युशन लाईन्स, पुणे), पल्लवी जाधव (वाई टेकनॉलॉजी), आहे

(ईएमडीईपी पुणे), आणि दुस स्कैनर, मुंबई), प्रतीक्षा वेदीकर ( टेस्टींग पुणे), सदीप नाकाडे (केके टीम), तृप्ती निभोरे (दादा पाटील कॉलेज) या विद्याथ्र्यांची निवड झाली आहे. प्लेसमेंट समन्वयक डॉ. अंजली वैद्य, प्रा. गौरी पाटील व सर्व विषय प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य व तंत्रज्ञान कौश्यल्य यांच्या जोरावर या संधी मिळविल्या. या निवडीबद्दल विभाग प्रमुख, डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर व बी. पी. येच ई. सर्व संस्था प्रमुख यानी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले

त्यांनी केलेला अभ्यास त्यामुळे त्यांच्या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांना हे यश संपादन झालेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज मालेतील त्यांना खूप खूप शुभेच्छा

तिसऱ्या वर्षी कोडींग तर 8व्या वर्षी 40 अवार्ड; जगातील सर्वात कमी वयातील CEO आहे श्रीलक्ष्मी.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी आपण ऐकली असेलच. जिथे आजकालची 9-10 वर्षांची बहुतेक मुलं नवीन खेळणी किंवा गॅझेट्समध्ये आपला वेळ घालवत असतात, ते त्यांच्या स्वप्नांच्या जगात हरवलेले राहतात. त्याच वेळी एक मुलगी अशीही आहे जीने तिच्या व्यवसायाची कल्पना दिली आणि लहान वयातच तिनं ते स्थान प्राप्त केलं, जे वयाच्या 30-40 पर्यंत लोकांना मिळूही शकत नाही. अखेर ही मुलगी कोण आहे आणि तिने इतक्या कमी वयात तिनं काय सक्सेस मिळून दाखवलं आहे हे जाणून घेऊया.

कल्पना करा कि 9 वर्षांच्या मुलीने वेबसाइट बनवली आणि एका कंपनीची सीईओ बनली. विश्वास बसत नाही ना? हो पण हे खरंय. भारतीय मुलीनं अवघ्या नऊ वर्षांच्या वयात एक वेबसाईट कंपनी काढली आणि ती त्या कंपनीची CEO बनली आहे. तिने वेबसाइट कशी बनवली आणि ती सीईओ कशी झाली. हे सगळे प्रश्न तुमच्या मनात येऊ लागले असतील. चला तर मग आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणार आहोत.

या 9 वर्षाच्या मुलीचे नाव श्रीलक्ष्मी सुरेश असे आहे. ती केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील आहे. श्रीलक्ष्मी यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1998 रोजी झाला. अवघ्या 19व्या वर्षी श्रीलक्ष्मी सुरेश ही भारतातील सर्वात तरुण वेब डिझायनर आहे. तिने वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी संगणकावर काम करायला सुरुवात केली. त्या वयात श्रीलक्ष्मीने कॉम्प्युटर कोडिंग शिकायला सुरुवात केली. श्रीलक्ष्मीच्या या इच्छेचा परिणाम असा झाला की वयाच्या 8 व्या वर्षी तिने www.presentationhss.com या नावाने तिच्या शाळेसाठी वेबसाइट तयार केली. श्रीलक्ष्मी सुरेश यांनी स्वतःची वेब डिझाईन कंपनी www.edesign.co.in सुरू केली. यानंतर, वयाच्या 11 व्या वर्षी श्रीलक्ष्मीने रेनबो टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक सैनुल आबेदिन यांच्यासोबत ऑनलाइन पिक्सेल ट्रेडर्स नावाची दुसरी कंपनी सुरू केली.

श्रीलक्ष्मीला देशातच नाही तर जगात ओळख मिळाली. वयाच्या 8 व्या वर्षी श्रीलक्ष्मीला 40 हून अधिक पुरस्कार मिळाले होते. यामध्ये अमेरिका वेबमास्टर असोसिएशनचे सदस्यत्व, गोल्ड वेब पुरस्कार आणि अपवादात्मक कामगिरीसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय बाल पुरस्कार यांचा समावेश आहे. याशिवाय श्रीलक्ष्मी इन्फोग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आणि YGlobes च्या डायरेक्टर देखील आहेत. जगातील सर्वात तरुण सीईओ बनण्याचा मानही यांच्या नावावर आहे. व्यवसायाने वकील असलेल्या श्रीलक्ष्मीच्या वडिलांनी लक्ष्मीला लहानपणी खेळण्याऐवजी जिवंत संगणक दिला. ती वडिलांनी दिलेल्या कीपॅडवर लिहायला शिकली, एमएस पेंटमध्ये चित्रं काढायला शिकली. लहानपणी, लक्ष्मी तिच्या वडिलांनी दाखवलेल्या एका लहान मुलाने डिझाइन केलेल्या वेबसाइटने इतकी प्रभावित झाली, की तिने तिच्या शाळेची वेबसाइट बनवली. त्यावेळी लक्ष्मी एमएस वर्डवर काम करायची, पण आज ती ड्रीमवीव्हरवर वेबसाइट बनवते.

लक्ष्मीला तिच्या कंपनीच्या भवितव्याबद्दल अजिबात काळजी नाही, कारण ती तिच्या छोट्या घरगुती व्यवसायाच्या ग्राहकांसाठी छोट्या प्रकल्पांवर काम करते. त्याचप्रमाणे श्रीलक्ष्मी तिच्या अभ्यासाबाबत सुद्धा खूप जागरूक आहे. सकाळी 8.30 ते 2.45 पर्यंत घरी आल्यानंतर शाळेचा गृहपाठ करून विश्रांती घेतल्यानंतर ती दररोज 2 ते 4 तास वेब डिझायनिंग करते. तिला मोठी झाल्यावर श्रीलक्ष्मी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे आहे. मात्र, श्रीलक्ष्मी हे महिला सक्षमीकरणाचे दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांची यशोगाथा आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, परंतु यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द आणि काहीतरी करण्याची जिद्द असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांच्याशिवाय यश मिळवणे फार कठीण आहे.