कामगारांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार करून केला वाढदिवस साजरा.
कामगार, शेतकरी, पथविक्रेत्यांच्या समस्यांवर लढण्यासाठी संघटना मजबूत करण्याचे आवाहन.
विजय चौधरी-औरंगाबाद प्रतिनिधी
आपल्या दिनचर्येतील वर्षातील 365 दिवस कामगारांच्या हक्का साठी लढणारे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) चे राष्ट्रीय माजी सेक्रेटरी ,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव, शहिद भगतसिंग हाॅकर्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे संस्थापक सचिव, तथा भिमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनचे विधी सल्लागार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव, कॉ ऍड अभय टाकसाळ यांनी आपल्या 47 व्या वाढदिवशीही रांजणगाव फाटा येथे येत कामगारांसाठी लढण्याचा निर्धार घेऊन वाढदिवस साजरा केला.
कामगारांवर सध्या आलेल्या परिस्थितीला सरकार कारणीभूत असून. जर परिस्थिती बदलायची असेल तर भांडवलदारांचे सरकार बदलून गरीब, मजूर , शोषित, वंचित, कामगार धोरणे सरकार आणावे लागेल व त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दिलेल्या मतदानाच्या हक्काचा योग्य वापर करावा लागेल असे यावेळी ते बोलत होते. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने संघटनेत सहभागी होऊन संघटना मजबूत करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी तालुका सह सचिव रतन अंबिलवादे, भालचंद्र चौधरी, विठ्ठल त्रिभुवन, ऑल मराठवाडा कामगार युनियन रांजणगाव युनिट (संलग्न आयटक) चे अध्यक्ष योगेश गरड, उपाध्यक्ष सतीश महापुरे, सचिव अमोल सरवदे ,सहसचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष राहुल सरोदे सदस्य गोपाल लखवाल सचिन दुबिले प्रदीप थोरात संदीप जमधडे, विकास गाईकवाड, पोपट कापसे, सलीम शेख, शिवाजी भालेराव व ईतर पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.