मुख्यमंत्री शिंदे यांचा तरुणपणीचा रिक्षासोबतचा फोटो व्हायरल, पण तो फोटो मात्र….
काही दिवसापासून एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फिरणारा फोटो तुम्ही पाहिला असेल. एका रिक्षावाला रिक्षाच्या बाजूला उभा आहे.
यात विशेष म्हणजे या रिक्षावाल्याला दाढी आहे. मग हा रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नाही ना ? असा विषयाच्या चर्चा मध्यंतरी चालू होत्या. तर हा फोटो खरा कोणाचा आहे. याचा शोध लावलाय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी. या फोटो बद्दलची सत्यता स्वतः अजितदादा यांनी पडताळणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी रिक्षाचालक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. नवीन सरकार आल्यापासून बऱ्याचदा रिक्षाचालकाचे सरकार आहे अशा खोचक टिप्पणी केली जाते. अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा फोटो देखील व्हायरल केला. आणि या मध्ये तो फोटो व्हायरल करताना तो एकनाथ शिंदे यांचे तरुणपनीचा आहे अस हि म्हंटल गेल आहे.
पण प्रत्यक्षात हा फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नाही तर पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा आहे, ही माहिती पुढे आलीय आहे. हा फोटो व्हायरल झाला त्यानंतर विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी थेट बाबा कांबळे यांना फोन केला आणि या बाबत माहिती विचारली “तो फोटो तुझा आहे का रे ?” असं त्यांनी बाबा कांबळे यांना विचारलं असता कांबळे यांनी होकार दिला आणि चांगले काम करा म्हणत शुभेच्छा दिल्या.