मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?
उध्दव ठाकरे यांनी केली राजीनामा देण्याची तयारी!
ठाकरे सरकारच्या महाराष्ट्रातील राजकारणात जे काही नाट्यमय घडामोडी सुरू आहेत त्या अशा आहेत. ठाकरे सरकार अल्पमतात आहे. शिवसेनेचे शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढलाचा सुप्रीम कोर्टात दावा ,तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना इडीचे समन्स देखील आलेली आहे .
या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी केली होते. शिवसेनेतून बंडखोर आमदार जेव्हापासून गुहाटीला पोहोचले आहे .तेव्हापासून मुख्यमंत्री ठाकरे यांनी कुठलाही मोह नाही म्हणत स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्याच बरोबर त्यांची राजीनामा देण्याची तयारी देखील होती 21 तारखेला ५ वाजता आणि 22 तारखेला सायंकाळी राजीनामा दिला राजीनामा देण्यास संपूर्ण तयारी केली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे देणार होते मात्र महाविकास आघाडीचा ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं अशी माहिती समोर आली आहे
शिवसेनेतून बंडखोर आमदार यांचा शिंदे यांचा गट तयार झाला हा कोणत्या पक्षात सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकनाथ शिंदे यांच्या अटी आहेत त्या मंजूर करून कशा पद्धतीने सरकार स्थापन केले जाते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं राहील .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते ही विश्वसनीय सूत्रांची माहिती प्राप्त झाली. हि परिस्थिती हाताबाहेर गेली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? शिवसेनेतील गटबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय याला कशी आवर घालणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या देखील समर्थनार्थ अनेक मोर्चे निघत आहेत अनेक आंदोलनं होत आहेत मात्र महा विकास आघाडी सरकार च काय होतय. मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू त्याच रुपांतर कि आता सत्तांतर होते पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.