आत्ताची बातमी

ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड येथे नाताळ उत्साहात साजरा.

ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जगाला शांती, प्रेम आणि सेवेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, आरोग्य रक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉक्टर शोभा आरोळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “सर्वांनी एकत्र येऊन जगामध्ये शांती, प्रेम व सेवा द्यावी. त्यातूनच आपण एक सुंदर आणि मानवतावादी जग निर्माण करू शकतो,” असे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमासाठी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे, प्रसाद झावरे, रवि कडलग, ढेपे सर, ढमाळ सर, आजबे सर, डॉक्टर सुनील बोराडे, सुनील जावळे, पत्रकार प्रकाश खंडागळे, धनराज पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नाताळ गीत गायन व प्रवचन झाले, ज्यामुळे परिसर भक्तीमय झाला.

नाताळ सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अन्नदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचप्रमाणे गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ समाजसेवक जयेश कांबळे यांनी केले. हा नाताळ सोहळा शांती, प्रेम आणि सेवेचा संदेश देणारा ठरला.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!