नगर ब्रेकिंग : पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल, 830 प्रवाशांसह कोईम्बतूरमधून साईनगरीत.
नगर जिल्ह्याला सर्वात मोठा मान मिळतो. कोणतीही योजना असो कोणतीही सुविधा असो यात नगर जिल्हा पहिला असतो , ती म्हणजे देशातील पहिली खाजगी रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईनगर या ठिकाण पोहचली
भारत गौरव साऊथ स्टार ही रेल्वे कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली होती.योजनेअंतर्गत देशातील पहिली खाजगी रेल्वे सकाळी आपल्या निर्धारित वेळेत आपल्या निर्धारित वेळेच्या एक तास आधीच शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन वरती पोहोचली. या साउथ स्टार रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता त्यानंतर तब्बल 830 प्रवाशांना घेऊन ही रेल्वे शिर्डी दाखल झाली. या प्रवाशांचा यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं शिर्डी साईनगर या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रवाशांनी आणि साईभक्तांनी खाजगी रेल्वेत बसण्याचा आनंद आणि आपला अनुभव व्यक्त केला.तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी असे थांबे पार करुन तिला सकाळी 7:30 वाजता साईनगर रेल्वे स्थानकावर पोहचणे निर्धारित केले होते. अगदी फुलांनी सजले रेल्वे साईनगर रेल्वे स्टेशनच्या साईनगर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक १ वरती ही खाजगी रेल्वे पोहोचली यातून 830 प्रवासी खाली उतरले खाजगी रेल्वेच्या चालकाचा आणि या भाविकांचा यावी सन्मानपूर्वक भव्य असे स्वागत येथे करण्यात आला.
या रेल्वेने आलेल्या प्रवाशांचे यावेळी स्वागत करण्यात आले. वेळेआधीच पोहचल्याचे समाधान आणि पहिल्या खाजगी रेल्वेत बसण्याच्या आनंद साईभक्त प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसून आला.