नगर ब्रेकिंग ; आईवरून शिवीगाळ केल्याने पहा या पठ्ठ्याने काय केले ? नगर जिल्ह्यातील घटना.

आई ही सर्व श्रेष्ठ असते , आई बाबत कोणी काही बोल तर राग अनावर होतो .नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील देवठाण येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावाने आईवरुन शिवीगाळ केल्याने राग अनावर झाल्याने चुलत भावाचा दगडाने मारून खून केल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी दि.५/१०/२०२२ रोजी अकोले तालुक्यातील खडकेवाडी येथे घडली आहे.
बारकू दामू गिरे असे मयताचे नाव आहे.काशिनाथ सोमनाथ गिरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत अकोले पोलिस स्टेशनला मयताची पत्नी इंदुबाई बारकू धीरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे कि,दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादीच्या घराच्या ओटयाचे जवळ काशिनाथ सोमनाथ गिर्हे (खडकेवाडी,देवठाण तालुका अकोले) त्याचा चुलत भाऊ फिर्यादीचे पती बारकू दामु गिर्हे यांनी आई वरून शिवीगाळ केली याचा राग आल्याने काशिनाथ सोमनाथ गिर्हे याने चुलत भाऊ असलेल्या बारकू दामु गिर्हे यांना खाली पाडून त्याचा दगडाच्या गोट्याने मारून खून केला.
फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गु.र.न. ४५६/२०२२ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक मिथुन घुगे करत आहेत.