नगर ब्रेकिंग ; जेल मध्ये कैद्याने केला धक्कादायक प्रकार
गुन्हेगारी वाढत चाली आहे , एक धक्काद्यक प्रकार घडला आहे ,गुन्हा केल्यामुळे आरोपीला कैद होत, मात्र कैदेत असणारा गुन्हेगारच पुन्हा गुन्हा करत आहे यावर कोणाच वचक राहिला नाही अस पाह्यला मिळत .
अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील एका खून प्रकरणातील सराईत असलेला व सध्या मोक्का अंतर्गत कारागृहात असलेला आरोपी कासार वैद्यकीय कारणास्तव काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल होता.
यानंतर या आरोपीच्या हातात चक्क बंदोबस्ताला असलेल्या पोलीस बंदूक असलेला फोटो काढण्यात आल्याचे एका व्हायरल फोटोमधून पुढे येत आहे. फोटो काढल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे.
कारागृहामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असताना आतमध्ये मोबाईलवर फोटोसेशन करण्याचे धाडस कसे केले ? असा सवाल या खळबळजनक घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची नाशिक आयजी बी. जे. शेखर पाटील सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.