कलेक्टर साहेब बाहेर या ! शेतकऱ्यांचे गाऱ्हाणं ऐकायला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही….
महाविकास आघाडीच्या वतीने खा. निलेश लंके यांच्या नेतृत्वात भव्य जनकृषी शेतकरी आंदोलन सुरू आहे, कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्या गाई ,म्हशी ,बैल घेऊन उपस्थित आहेत. गेल्या चार तासापासून खासदार निलेश लंके शेतकरी आणि मुके जनावर देखील भर उन्हात तळपत आहेत.
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आक्रमक अशी भाषणा केली आहे, अनेक शेतकरी डोक्यावरती शेतकरी नावाची टोपी घालून आले आहेत , या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला जनावर बांधली आहेत , दरम्यान उन्हामध्ये उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मच्याऱ्या ना खासदार निलेश लंके यांनी स्वतः आपल्या हाताने पोलीस कर्मचाऱ्यांना दूध वाटप केलं, काही वेळ हातामध्ये टाळ घेऊन खासदार निलेश लंके भजनात देखील दंग झाले
गेल्या चार तासापासून सर्व शेतकरी या ठिकाणी उन्हात आंदोलन करतात मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून या आंदोलनाची दखल घेण्यासाठी कोणीही दाखल झाले नाहीये.
जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नाही तोपर्यंत या आंदोलन सुरूच राहील असा पवित्र या ठिकाणी घेण्यात आला आहे , दुसऱ्या दिवशी उद्या देखील हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील . दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुकी जनावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधली जातील असा सूचक इशारा या ठिकाणी देण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातून एक अधिकारी निवेदनात घेण्यासाठी दाखल झाला होता , मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदनासाठी कार्यालयाच्या बाहेर येणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच भर उन्हात सुरू राहील असं स्पष्ट मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला खासदार शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी पाच मिनिटे वेळ काढू शकत नाहीत का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.