आ. बच्चू कडू यांच्या अपघातावेळी पाहा नेमक काय घडल?
रस्ता ओलांडत असताना दुचाकीची जोरदार धडक बसल्याने प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. दुचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे बच्चू कडू यांच्या डोक्याला हाताला आणि पायाला जबर मार देखील लागला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला आहे. पण या अपघातामुळे सुदैवाने बच्चू कडू यातून वाचले आहेत. अपघातानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितला आहे.
आमदार बच्चू कडू हे पहाटे साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना त्याच वेळी एक सुसाट वेगात आलेल्या दुधाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिल्यामुळे बच्चू कडून हे जागेवरच पडले. त्यावेळेस त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला जबर मार लागला आणि तसेच डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव देखील झाला त्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
डोक्याला व उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके मारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डोक्याला व पायाला बँडेज देखील लावण्यात आले आहेत पण सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेच काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितला आहे.
दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळले आणि त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. अपघातामध्ये बच्चू कडू यांना मुक्का मार लागल्याचे सांगितलं जात आहे तसेच दुचाकीस्वाराबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही पोलीस सूत्रांनीही याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र चालूच आहे आमदार बच्चू कडू यांच्या आधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्याला अपघात झाला होता. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीलाही अपघात झाला होता आणि आता बच्चू कडू यांचाही रस्ता ओलांडत असताना अपघात झाला आहे.