कामाच्या गोष्टी

कृष्णाली फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम : पुरग्रस्तांची दिवाळी गोड करण्यासाठी १४५ कुटुंबांना दिवाळी शिदा वाटप.

समाजासाठी समर्पणाची शिकवण कृष्णाली फाऊंडेशनचे कार्य आदर्शवत.

मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृष्णाली फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने संस्थेच्यावतीने एकूण 145 पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, शितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, वसेवाडी, पिंपरखेड, घोडेगाव आणि राजुरी या गावांमध्ये घरांचे, जनावरांचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत गावकऱ्यांना आधार देण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने पुढाकार घेतला.

या मदत उपक्रमात अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियंका पाटील शेळके बोबडे, सहसचिव शिवाजी उबाळे, ज्येष्ठ समाजसेवक जयेश कांबळे, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. गोरख चौधरी, श्री. भिका लकडे, खजिनदार अमर बोबडे, सामाजिक कार्यकर्त्या रत्ना जाधव, पत्रकार तुकाराम कामठे, उद्योजक संग्रामशेठ आंधळे, उपाध्यक्ष अमोल शिंदे यांसह अनेक मान्यवरांचे बहुमोल सहकार्य लाभले.

या वेळी बोलताना अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके म्हणाले :
“ खा. निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून मदतीचा हात दिला. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेत आम्हीही पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. भविष्यातही संकटाच्या काळात समाजासाठी आम्ही सदैव तयार आहोत.”

स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कृष्णाली फाऊंडेशनचे आभार मानले.

हा पूर्ण उपक्रम खा. लोकनेते निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या कृष्णाली फाउंडेशनच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!