कामाच्या गोष्टी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत अतिक्रमण हटवलं

“आम्ही हे शेड आमच्या स्वतःच्या खर्चातून, केवळ रहिवाशांच्या सोयीसाठी उभारले होते. हे पूर्णपणे काढता येण्याजोगे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे होते. कन्व्हेअन्स डीडनंतर परिसर आमच्या ताब्यात असतानाही अचानक महानगरपालिकेने जेसीबी आणून कारवाई केली, हे आम्हाला अन्यायकारक वाटते. शहरातील इतर सोसायट्यांमध्ये अशा रचना असतानाही फक्त आमच्यावरच कारवाई का झाली, याबाबत प्रशासनाने स्पष्ट उत्तर द्यावे.”
— रहिवाशी, 45 शहावत अव्हेन्यू सोसायटी.

पिंपरी-चिंचवड : शहरातील 45 शहावत अव्हेन्यू निवासी सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत रहिवाशांनी स्वतःच्या खर्चातून उभारलेले काढता येण्याजोगे शेड हटविण्यात आल्याने सोसायटीमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्व्हेअन्स डीड पूर्ण झाल्यानंतर सोसायटीच्या आवारात उन्हापासून आणि पावसापासून संरक्षणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारण्यात आले होते. हे शेड सोसायटीच्या खासगी हद्दीत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मात्र, सोसायटीतील दोन सदस्यांनी बिल्डरसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे (PCMC) तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

महानगरपालिकेच्या पथकाने अचानक केलेल्या या कारवाईत जेसीबीचा वापर करून शेड हटविण्यात आले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम, संताप आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोसायटी सदस्यांचे म्हणणे आहे की, शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशाच प्रकारची संरचना अस्तित्वात असताना केवळ निवडक ठिकाणीच कारवाई का करण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी.

या घटनेनंतर कन्व्हेअन्सनंतर सोसायटीचे अधिकार, अंतर्गत वादांमध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि अतिक्रमण कारवाईतील समानता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रहिवाशांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत महानगरपालिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!