कोरोनाने आपल ‘कोण ‘ हे शिकविले – हभप पाटील
टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी
शाळेमध्ये असताना काटकोन त्रिकोन विशाल कोन हे सर्व शिकविले गेले मात्र सामाजिक शाळेमध्ये कोरोना आजाराच्या काळामध्ये ‘ आपल कोण ‘ हे खऱ्या अर्थाने शिकविले अशी मार्मिक टिप्पनी शिव चरित्रकार हभप आप्पासाहेब पाटील ( औरंगाबाद ) यांनी केले. पारनेर कान्हूरपठार रोड वरील गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात आयोजित केलेल्या ३३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे किर्तन मालेतील चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हभप पाटील पुढे बोलताना म्हणाले की समाजात जीवन जगत आसताना माणसे स्वार्था पोटी लयाला गेली. माणसाला माणसाची किंमत राहीली नाही.
दोन वर्षा पूर्वी कोरोनाची लाट आली आणि गरिबा पासुन ते श्रीमंता पर्यन्त सगळेच एका रांगेत उभे केले. बायको मुल आई वडील नातेवाईक सगळे लांब गेले मात्र परमेश्वराने तुम्हाला जवळ घेतले तुमच्या वर प्रेमाची पाखर घातली म्हणुन तर आपण एवढया मोठ्या महामारीतुन जीवंत आहोत म्हणुन मिळालेल आयुष्य ‘ बोनस ‘ समजुन आता तरी माणुस पण जपा असा मार्मिक सल्ला देत. अप्पासाहेब पाटील यांनी स्री भृण हत्येवर ही कड़क शब्दात भाष्य केले.
आजच्या परिस्थित मध्ये शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल तर प्रथम माँ साहेब जिजाऊ जन्माला येऊ द्या अशी मार्मिक टिप्पनी केली . आजही चांगली सुन मिळावी असे वाटत असेल तर पहिले मुलिला जन्माला घाला . मुलिला मुलां समान दर्जा द्या स्री पुरुष समानता ही कागदावर न राहता प्रत्यक्षात कृतित आणावी असे आवाहन करून. छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जन्मा पुर्वीचा आणि नंतर चा महाराष्ट्र या वर विवेचन करून छत्रपतिचा कार्यकाल उपस्थिता समोर उभा केला त्याला उपस्थित भाविकानी टाळ्याच्या गजरात दाद दिली.