ब्रेकिंग : नगर जिल्ह्यामध्ये मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव !!

फेब्रुवारी महिन्यात दैनंदिन ४०० ते १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. मार्च महिन्यापासून मात्र रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती. २२ मार्चला ७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. २१ मार्चला १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तर २८ मार्चला ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. एप्रिल व में महिन्यात रुग्णसंख्या कमालीची घटली होती.
सहा दिवसापासून रुग्ण संख्या कमी होती. मात्र बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ झाली आहे. बुधवारी श्रीरामपूर ५, महापालिका क्षेत्र २, नगर तालुका २, नेवासे २, अन्य जिल्हा १, राहुरी १, शेवगाव १ असे १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
शहर व जिल्ह्यात तीन महिन्यानंतर सर्वाधिक (९ जून) ला १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी नगर शहर व जिल्ह्यात १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगरमध्ये • मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गेल्या तीन महिन्यापासून नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने घटत होते. गुरुवारी (९ जून) ला तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वाधिक १५ पॉझिटिव्ह रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात आढळले होते.