
विवाहबाह्य असणाऱ्या संबंधांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र अशा गोष्टी घडतात तेव्हा समाजाला खर्या अर्थानं कलंक लागतो. यात राजकारणी मंडळी अग्रेसर आहेत. कारण ही बातमी आहे भाजपाच्या एका नेत्याची भाजपाचे नेते मोहित सोनकर यांना मारहाण होताना चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
यामध्ये त्यांना मारहाण का केली जात आहे ? मारहाण करणारी व्यक्ती कोण आहे ? अस काय केले त्या नेत्याने कि त्याला पोलिसांसमोर मारहाण केली ? ते पाहू 10 वर्षापूर्वी मोहित सोनकर आणि मोनी सोनकर यांचा विवाह झाला होता. मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. दोघांमधील संबंध चांगले नव्हते. दरम्यान, मोहितला भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले.
उत्तर प्रदेश मधील कानपूरमध्ये भाजपा नेते मोहित सोनकर यांना रोमान्स करणे चांगलंच महागात पडले आहे. कारण की हा रोमान्स यांची पत्नी यांनी पाहिला आणि त्यानंतर त्या महिलेने मोहित सोनकर यांना रस्त्यावरती मारत मारत त्यांनी बाहेर आणला. आणि पोलिस उपस्थित होते मात्र पत्नीचा राग अनावर झाला होता की, त्यांनी पोलिसांचाही विचार केला नाही. यावेळी मोहितच्या पत्नीसह सासू-सासर्यांनी इतरही लोक उपस्थित होते.
या सर्वांनीच भर रस्त्यामध्ये रात्रीच्या सुमारास मोहितला चप्पलन चांगला मारलं होतं. तब्बल तासभर झालेल्या गदारोळानंतर सगळे तिथून निघून गेले या प्रकरणी दोन्ही पक्षांनी तक्रार दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दक्षिण भाजपाचे अध्यक्ष या प्रकरणी म्हणाल्या की, ही बाब अद्यापही त्यांच्या निदर्शनास आलेली नाहीये आणि त्यांनी हा व्हिडिओ पाहून आमच्या भाजपाचे पक्ष श्रेष्ठी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे, कारण दिवसेंदिवस भाजपा पक्षातही महिला निगडित असणारे जे व्हिडिओ आहे ते व्हायरल होत आहेत.
त्यामुळे यामध्ये आता पक्ष काय भूमिका घेतं पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे फार महत्त्वाचं कारण की भाजपचा नेता आणि भाजपाची महिला नेता यांच्याशी निगडित असणारा हा व्हिडिओ आहे.