बाप रे ! शाळेत यायला उशीर झाला म्हणून विद्यार्थ्यांकडून हे काय करवून घेतले ?

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्वाना शिक्षण असा सरकारचा निर्धार आहे. सर्वाना किमान मोफत शिक्षण मिळाले पाहिजे असा संकल्प असतो.
आपण आपल्या पाल्याला शाळेत शिकायला पाठवत असतो. आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करावी किंवा चांगल्या पदावर विराजमान व्हावं असे आपण स्वप्न पाहत असतो. त्या प्रमाणे त्या पाल्याची दैनंदिन प्रक्रिया चालू असते. सकाळी लवकर उठणे, राहिलेला गृहपाठ करणे, आणि सगळ काही आवरून शाळेला जाणे. पण कधी कधी काही कारणांस्तव शेल्ट वेळेवर जायला उशीर होत असतो. पण त्यावेळेस शाळेतले शिक्षक छोटी-मोठी शिक्षा करत असतात. पण कर्नाटक मधील एका शाळेत अनोखा प्रकार घडला आहे.
शाळेत उशिरा आली म्हणून विद्यार्थ्यांना टॉयलेट स्वच्छ करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेत. कर्नाटकातील गदग या जिल्ह्यातून ही घटना समोर येतीय. शाळेत विद्यार्थी स्वच्छतागृह साफ करताना दिसत आहेत. या घटनेत व्हायरल व्हिडिओ सध्या प्रचंड धुमाकूळ गाजवतोय हा व्हिडिओ एका स्वयंपाकीने शेअर केलेला आहे.
हा व्हिडीओ 12 जुलैला आला होता. येथील शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील घटना आहे. या शाळेतील स्वच्छता गृहे साफ करताना सहावी आणि सातवी च्या विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि त्यामुळेच विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. वेळेवर न आल्यानं शाळा प्रशासनाने शिक्षा म्हणून स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यास सांगितले असा पालकांनी आरोप केला. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं.
स्वयंपाकी विजय लक्ष्मी यांनी सांगितले की, मी शाळेत असतानाच शौचालय साफ करण्यासाठी विद्यार्थी माझ्याकडे बादल्या आणि झाडू घेऊन आले आणि मला सांगितलं की शिक्षकांनी त्यांना तसं करायला सांगितला आहे. मला वाटले की हे काही योग्य नाहीये अशा प्रकारे ही घटना माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. आणि व्हाट्सअप वरती शेअर केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात. अतिशय दुःखद हे कृत्य विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे सुजाण नागरिक आहेत आणि त्यांना अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक मिळणे हे फार चुकीचा आहे.