सावळदबारा येथे दहीहंडी उत्सव व श्रीकृष्ण जन्मोत्सव आज जोरदार तयारी.

सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण.
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी मंदीरावर दि 18/8/22 गुरुवार रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. गेले दोन वषेँ सण उत्सव कोरोनाच्या महामारी बंद होते. परंतु यंदा प्रशासनाने स्थीरलाता दिल्याने सुरुवात झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर चक्रधर स्वामी मंदीरावर आज “मेरे चक्रधर मेरे श्याम”महानुभाव पंथीय भजनसंध्या विशाल जोगदेव याचां कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्मोत्सव पर्यंत चालणार असल्याचे माहिती आयोजक मधुकर पुजारी यांनी लोकशाही पोर्टल न्यूज उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले.
उद्या दि.19 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता दरवर्षी प्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त श्रीकृष्णाची पालखीची भव्य मिरवणूक दुपारी 3:00 वाजता निघणार आहे. व सायंकाळी सात वाजता चक्रधर स्वामी मंदीराजवळ दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडून प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.आणि दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. अशे पण आयोजक मधुकर पुजारी यांनी माहिती दिली आहे.
18/19 ऑगस्ट राज्यात सर्वत्र दहीहंडीची जोरदार तयारी सुरु आहे.सावळदबारा गोविंदा पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा शुक्रवार दि 19/8/2022 रोजी गोपाळकाला आहे. दहीहंडी मोठ्या उत्साह साजरा करण्यात येणार आहे.या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात व सोयगाव तालूक्यात व सावळदबारा परिसरात जोरदार पूर्व तयारी चालू आहे. भगवान श्रीकृष्णा पासून ही परंपरा, हा सण राज्यात आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हिंदू धर्मातील एक पवित्र व प्रसिद्ध सण म्हणून याकडे पाहिले जाते. दही हंडी या क्रीडा प्रकारातून युवकांच्या कौशल्यांची परीक्षा होते. त्यांचा कस लागतो. युवकांची कौशल्ये पणाला लागतात. मात्र या स्पर्धेतून युवकांना, बाळ गोपाळाना एक वेगळा आनंद मिळत असतो.युवकांसाठी, लहान मुलांसाठी हा एक मोठा सणच असतो. झाडांना किंवा इमारतीना किंवा खाबांना दोर बांधून दोरीच्या मधोमध उंच मडका बांधले जाते. मडक्यात दूध, दही, सुट्टे पैसे, प्रसाद ठेवले जाते. मनोरे रचून, एकावर एक उभे राहून मानवी गोल साखळी बनवून हा मटका फोडला जातो. या सणाचा आनंद लहान बालकापासून ते आबाल वृद्धा पर्यंत सर्वच जण सावळदबारा परिसरात लुटत असतात.