मोठी बातमी : देहूचे आजी-माजी विश्वस्त पिं.चिंचवड पोलिसांनी रंगेहात पकडले.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या या राज्यांमध्ये तसेच बाहेर सुद्धा वारकरी संप्रदाय पाहायला मिळतात. कित्येकजण पंढरपुराची वारी करत असतात, विठुरायाला दरवर्षी भेटायला जात असतात. त्याच प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम यांच्या देहूला सुद्धा कित्येक जण पायी दिंडी वारी करत असतात.
अशाच या देहूमधून एक बातमी समोर येत आहे. ज्या देहूसाठी लोक भरपूर अंतर कापून पायी दिंडी घेऊन येत असतात; त्याच देहू मध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या संस्थांचे आजी – माजी विश्वस्त चक्क जुगार खेळताना रंग हात पकडले आहेत. त्यांच्या समवेत देहू नगरपरिषदेचे नगरसेवक, व एका नगरसेविकेच्या पतीसह 26 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या कारवाईनंतर वारकरी संप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची खबर पोलीस पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावर एक बंद अवस्थेमध्ये कंपनी आहे. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर पत्त्यांचा खेळ चालला होता.पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजमा केली आणि मंगळवारी रात्री सापळा रचला गेला. एका मागोमाग एक असे 26 जण त्या ठिकाणी जमा झाले आणि नोटांचे बंडलचे बंडल खुलु लागले. जे या डावांमध्ये जिंकत होते ते आनंदी होते, तर त्यांचे पैसे जात होते ते नाराजी दिसत होते.
आणि इतक्यात पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला आणि अचानक टाकलेल्या छाप्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी अशाप्रकारे छापा टाकला होता की, यामधून कोणाला निसटता आलं नाही. यानंतर सर्वांची माहिती घेतली गेली आणि माहिती घेत असताना पोलिसांना धक्का बसला.
कारण या 26 जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे जुगार खेळत होते. त्याचप्रमाणे यांच्यासोबत देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयुर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचा देखील या जुगारामध्ये समावेश होता. पोलिसांनी अटक केलेल्या या 26 जणांकडून 35 लाखांचा ऐवज जप्त केला गेला. दरम्यान या जुगार खेळणाऱ्या मध्ये चक्क देहु संस्थांचे आजी माजी विश्वस्त सापडले आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये खळबळ उडालेली आहे.