जरंडी व फर्दापुर ग्रामपंचायतची केली पाहणी……
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाटोदा ग्राम पंचायतीनंतर त्याच पॅटर्नवर आधारित जरंडी ग्रामपंचायतीने वाटचाल केली असून शनिवार दि.२४ दिल्ली येथील केंद्रीय पथकाने जरंडी ग्राम पंचायत ला भेट देऊन जरंडी ग्रामपंचायततीने राबविलेल्या विविध उपक्रमांची स्तुती करून कौतुक केले व अभिप्राय बुकमध्ये त्याची नोंद केली
जरंडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांना समक्ष भेटून दिल्ली केंद्रीय पथकाचे केंद्रीय सचिव प्रियंका दुत्ता व सुद्धासत्व बरिक कसलेंटेट यांची जरंडी विकास कामाची पाहणी पाहणी केली व अभिप्राय नोंद वही मध्ये चांगल्या कामाची नोंद केली
जरंडी गावातील ग्रामस्थांना शंभर टक्के कर भरणा असलेल्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत दळण करण्यासाठी नवीन पीठ गिरणी तसेच गावाला ग्राम पंचायतीने सी.सी.टी.व्हीच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले असून गावाच्या मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही बसविण्यात आले आहे . तसेच वन महोत्सव निमित्ताने दहा एकर वरील क्षेत्रात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच
गावातील वृद्धांसाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमात जरंडी ग्राम पंचायत कार्यालयाने कक्ष स्थापन केला असून या वृद्धांच्या कक्षाची स्थापणा करण्यात येऊन यात एलईडी टीव्ही, वृत्तपत्रची व्यवस्था करण्यात आली आहे, गावातील वृद्धांना मोफत काठ्या आणि पावसाळ्यात छत्रीचे मोफत वितरण करण्यात येवून पिण्यासाठी थंड पाणी व अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे, गावातील ओला सुका कचरा जमा करण्यासाठी घंटा गाडी, तरुणांसाठी व्यायामशाळेचे साहित्य ,स्मशान भूमी मध्ये गावातील बसस्टँड चौकात सिमेंट, घोबीघाट, अंगनवाडी,केंद्रीय प्राथमिक शाळेत खेळण्याचे साहित्य घसरकुंडी आदी देण्यात आले असून लोक वर्गणीतून लोखंडी पुलाचे काम,मंगलकार्यालय, सभामंडप चे काम करण्यात आले आहे गावातील अपंग लोकांना ग्रामपंचायत निधीतून पाण्याचे जार भांडे वाटप करून त्यांना मोफत आरओचे २० लिटर पाणी मिळणार आहे…तसेच आठवडी बाजार भरविण्यासाठी नवीन जागेची पाहणी करून तिथे बाजार ओट्याची व्यवस्था करण्यात येणार आहे
याकामात जरंडी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, सरपंच वंदनाताई पाटील ,उपसरपंच संजय पाटील, सदस्य मधुकर पाटील, दिलीप,पाटील, प्रकाश पवार, अमृत राठोड, बनेखा तडवी, लिपिक संतोष पाटील यांच्यासह समस्त जरंडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत असून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे व सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या कल्पकतेतून जरंडी ग्राम पंचायत आता औरंगाबाद जिल्ह्यात हायटेक बनणार आहे .