इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस स्टेशनमध्ये तोबा गर्दी. पहा काय आहे कारण.
किर्तनकार इंदुरीकर महाराज कुठल्या न कुठल्या वादांमध्ये सतत अडकत असतात. किर्तन क्षेत्रात इंदुरीकर महाराज सुप्रसिद्ध आहेत ,मात्र वादात अडकण्यात ही ते नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. कधी संततीप्राप्ती बद्दल वक्तव्य असेल, कधी महिलांबद्दल अशा अनेक वक्तव्यांमुळे इंदुरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता इंदुरीकर महाराजांवरती गावकरी म्हणतायेत गुन्हा दाखल करा हे गावकरी एवढे संतप्त का झाले आहेत. किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल का करायचा म्हणताहेत हा सगळा प्रकार कोठेही घडला पाहुयात बातमी सविस्तर…
बीड जिल्ह्यातील कळसंबर या ठिकाणी इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. कळसंबर येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते. यासाठी गावकऱ्यांनी एक -एक रुपया जमा होऊन तब्बल एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला मात्र अचानक इंदुरीकर महाराज यांनी पलटी मारली आणि आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं सांगितलं. म्हणून नागरिक संतप्त झाले.
इंदुरीकर महाराज यांच्या वतीने कीर्तनासाठी शब्द दिला होता. तारीख नक्की करण्यात आली होती, गावकऱ्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करून पूर्ण तयारी देखील केली होती. अस असताना देखील या इंदुरीकर महाराज येत नाहीये हे कळताच ग्रामस्थ भडकले. आमच्या तारखेच्या दिवशी जरी इतर ठिकाणी तुम्ही कुठे कार्यक्रम केला तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा सज्जड दमच जणू काही गावकऱ्यांनी इंदुरीकर महाराज यांना भरला.
” तुम्हाला जर बरं वाटत नसेल, पित्ताचा त्रास होत असेल, तर तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो , दिलेला शब्द मोडू नका आमची फसवणूक करू नका असं गावकरी सातत्याने म्हणत होते. आम्ही लोकांकडून एक – दोन रुपये गोळा करून ही रक्कम उभी केली, या निदान तुम्ही लोकांना फसवू नका जर तुम्हाला आम्हाला फसवून इतर ठिकाणी कीर्तन केलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे असं ग्रामस्थ म्हणत होते.
त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल मात्र इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन म्हटलं की अगदी आजूबाजूच्या गावांमध्ये देखील कीर्तनाला येण्याचे लगबग असते. तशी जय्यत तयारी आयोजकांकडे केली जाते. हीच तयारी गावकर्यांनी केली होती. मात्र किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना पित्ताचा त्रास होऊ लागल्यामुळे ते कीर्तन करणार आहेत असं कारण पुढे करण्यात आल, पुढे काय होतं हे पाहणे फार महत्त्वाचं ठरेल.