देवेंद्रनाथ कासार यांचे कार्य प्रेरणादायी : पोपटराव पवार दत्त जयंती उत्सवानिमित्त गुणवंताचा गौरव
Devendranath Kasar's work is inspiring: Honorable man honored on the occasion of Poptrao Pawardutt's birth anniversary
वाळकी : दक्षिण पूर्व रेल्वे विभाग प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त देवेंद्रनाथ कासार हे दरवर्षी अंबरईवाडी येथील शिवालय,दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्याच बरोबर गुणवंत विद्यार्थी व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करत आहेत.उच्च पदावर काम करत असताना देखील ते सामाजिक बांधिलकी म्हणून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. .त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादनआदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
वाळकी (ता.नगर ) येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.त्यावेळी पवार बोलत होते.देवेंद्रनाथ कासार, पोपटराव पवार,डॉ. मंगेश देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थी दमयंती गिरवले,श्रेयसी झावरे, समृद्धी बोठे, सायली उंडे, अपूर्वा देविकर, वैष्णवी बोठे, भक्ती परभणे,सार्थक कासार, सुप्रिया जगताप, ऋतुजा पोटे, फिजा सय्यद, शीतल जासूद, वैशाली गुंड, आदिल शेख, प्रीती भालसिंग, आरती दरेकर, साक्षी थोरात, देवता कोठुळे, कल्याणी कुंजीर, अमृता माने, गायत्री झोंड यांच्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणारेआगडगाव देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे,प्रा. रमाकांत बोठे,न्यूज महाकेसरीचे मुख्य संपादक सचिन दांगडे,प्रसार माध्यमात काम करणाऱ्या प्रियंका शेळके,न्यूरोलॉजिस्ट डॉ. वैशाली काटकर,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार,कानसा वारणा फाउंडेशनची अध्यक्ष दीपक पाटील,लोकमत प्रतिनिधी शरद कासार, डॉ. मंगेश देशमुखआदींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुक्त देवेंद्रनाथ कासार यांनी केले तर डॉ. युवराज कासार यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, संदीप जाधव, अमोल कासार, डॉ. युवराज कासार, महादेव कासार, देवराम भालसिंग, संजय भालसिंगआदीसह अंबरईवाडी तरुणांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
वाळकी (ता. नगर ) येथील अंबरईवाडी येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार.