” तुम्ही माझा फोटो काढला ?” अस म्हणत चक्क एका तरुणाने ट्राफिक पोलिसाच्याच कानाखाली वाजवली.
‘चोर तर चोर अन वर शिरजोर ‘ हा प्रकार घडला मुंबई मध्ये, एकेकाळी पोलीस म्ह्टल तर चांगल्या चांगल्यांची दैना व्हयाची मात्र आता परिस्थती बदली आहे, पोलिसांवरच हल्ले केले जात आहेत. पोलीस हवालदार व्ही. टी. संजीव यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार मुंबईच्या अंधेरीत घडला आहे. चलान फाडल्यानं दुचाकीस्वारानं पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार मुंबईच्या अंधेरीत घडला आहे.
परेश गावकर (२५) असं बाईकस्वाराचं नाव आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असल्यानं पोलीस हवालदार व्ही. टी. संजीव यांनी गावकरच्या नावे ई-चलान फाडलं. त्यामुळे गावकर संतापला. त्यानं संजीव यांच्या कानशिलात दिली. त्यामुळे क्षणार्धात संजीव यांचा गाल काळानिळा पडला. त्यांच्या कानाचा पडदा फाटला. परेश गावकरकडे बाईक चालवण्याचा परवानाही नव्हता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गावकरनं कानशिलात लगावल्यानं संजीव यांच्या कानाला गंभीर इजा झाली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर संजीव यांनी गावकरचा फोटो काढला आणि चलान फाडलं. संजीव यांनी फोटो काढल्यानं पाहून गावकर थांबला. तुम्ही माझा फोटो काढला का, अशी विचारणा त्यानं केली. संजीव यांनी त्याला फोटो दाखवला. फोटो पाहून गावकरनं संजीव यांना मारहाण सुरू केली.
पुढे हा मुजोर बाईक वाला म्हणाला की ‘ तुझ्या घरातील महिलांवर लैंगिक अत्याचार करेन, अशी धमकी गावकरनं संजीव यांना दिल्याचं एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितलं.
तू पुन्हा या जागेवर कसा ड्युटी करतो तेच मी बघतो, अशीही धमकी गावकरनं संजीव यांना दिली. संजीव यांच्या कुटुंबाला या घटनेची माहिती नाही. कुटुंबाला याबद्दल कळल्यास ते मला ब्रेक घ्यायला सांगतील. मला बरं वाटेपर्यंत गावाला घेऊन जातील. माझ्या कानाच्या पडद्याला छिद्र पडलं आहे. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत आणि ५ दिवसांनी पुन्हा बोलावलं आहे, असं संजीव यांनी सांगितलं. असा प्रसंग आपल्यासोबत पहिल्यांदाच घडल्याचं ते म्हणाले. या आधी नवी मुंबई मध्ये एका वाहतूक पोलीसाला फरफटत घेऊन गेल्याची घटना घडली होती.