मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बचत गटातील महिलांना मा.सरपंच सुरेखा तायडे यांच्या हस्ते प्रमाणापत्राचे वाटप.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निमित्ताने महिला बचत गटामार्फत घेण्यात आल्या होत्या विविध स्पर्धा……
सोयगाव दि.१८..देशात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला होता या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ते यशस्वीपणे राबविण्यात आले होते सोयगाव तालुक्यातील गलवाडा(अ)येथे देखील १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्यात आला.
महिला बचत गटाच्या वतीने सीआरपी सोनाली मोरे यांनी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यातील सहभागी महिलांना १७ सप्टेंबर मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनी गलवाडा(अ)ता.सोयगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रमाणपत्राचे वाटप सुरेखाताई भारत तायडे (मा.सरपंच)गलवाडा (अ)यांच्या हस्ते सुशिलाबाईल इंगळे,ललिताबाई इंगळे,करूनाताई इंगळे यांच्यासह इतर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.