नगर ब्रेकिंग : कर्जबाजारपणाला कंटाळून ज्ञानेश्वर कांबळे यांनी केली आत्महत्या.

कर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर असल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नगर तालुक्यातील पारगाव मौला या गावाच्या शिवारात सायंकाळच्या सुमारास बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन ज्ञानेश्वर कोंडीबा कांबळे वय वर्षे 45 या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
आपल्या घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेली ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला कांबळे यांच्या पाठीमागे यावर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवलं होता. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा गावांमध्ये रंगू लागली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे आणि वडील सुद्धा आहेत.
वरुणराजा शेतकर्यां वरती नाराज झाला की, हा पाऊस लांबतो आणि पाऊस लांबला की दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येत असते. या शेतकऱ्यांनी उन्हाळी काम संपलं की शेतीची मशागत करून नव्या पिकासाठी शेत तयार करून त्यामध्ये पेरणी करणे त्याचबरोबर पेरणी साठी लागणारी बैलजोडी कुठलं यंत्र या सगळ्याची तडजोड करत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो. एवढं करूनही पाऊस नाही आला आणि आपलं पिक नाही उगवलं तर अस्मानी संकट शेतकर्यां वरती उगवले जातात. त्यामुळे शेतकरी असा टोकाचा निर्णय घेतात. बीड जिल्हामध्ये दर दिवसाला एक आत्महत्या हे ठरलेले गणित आहे. कृषी प्रधान देशात बळीराजा सुंदर अशा पद्धतीने दिवसेंदिवस आत्महत्या करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाचा काळा चेहरा आपल्यासमोर येतोय असं म्हणायला काही हरकत नाही.