तुम्हीही तुमच्या मुलांना प्ले गृप, नर्सरीमध्ये पाठवता का? तुमच्या लहान मुलांसोबत पहा काय काय घडते ?
सदरील व्हिडीओ बंगुरुळुमधला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कि, लहान मुलं एकत्र खेळण्यांसोबत खेळत आहेत. निळ्या रंगाची साडी नेसलेली महिला एका मुलाला घेऊन बाहेर जाते आणि दरवाज्याला बाहेरून कडी लावते.
यानंतर बाकी मुलं रूमच्या आतमध्येच असतात आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये, आणि यातच एक मुलगा दुसऱ्या मुलाला मारायला सुरूवात करतो. हा मुलगा सतत त्या मुलीला मारताना दिसत आहे. हे सगळं सुरू असताना ते थांबवायला तिकडे कुणीही केअर टेकर नव्हता.
जेव्हा या सगळ्याचे फुटेज समोर आले तेव्हा पालकांच्या अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली, एक मुलगा त्या मुलीला सारखं मारत असतो आणि ते सोडवायला अथवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही.
हे सगळे घडल्यानंतर पालकांनी त्या शाळेवर गुन्हा दाखल व्हावा याची मागणी करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा.