” बिल कमी करता का ? ” म्हणाला, म्हणून त्याला हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी हाणमार केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल.
कोरोनानंतर सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते यामध्ये देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था देखील ढासळली होती त्याचप्रमाणे या महामारीने कित्येकांचे प्राण देखील गेले त्या मागील कारण म्हणजे खाजगी हॉस्पिटलने रुग्णांकडे केलेली अवाढव्य पैशाची मागणी. कित्येकांना या खाजगी रुग्णालयांची फी परवडत नव्हती आणि त्यामुळे किती लोक या महामारीत मृत्यू पावले.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोरोना काळामध्ये काही हॉस्पिटलने रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट केलेली आहे. ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्या समोर आली आहे आणि याबाबतच्या बातम्याही तुम्ही याआधी पाहिल्या असतील. या लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या कारभारा विरोधात अनेकदा सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी आंदोलन देखील केलेले आहेत.
काही करून या खाजगी हॉस्पिटलची कारनामे कमी होताना दिसले नाहीत. असाच एक प्रकार लखनऊमधून समोर आला आहे अतिशय संतापजनक असा प्रकार घडला आहे. हॉस्पिटलचे बिल थोडं कमी करावे अशी विनंती एका रुग्णाचा नातेवाईक असलेल्या युवकाने केली यानंतर वाद होऊ लागला आणि या वादाचे रूप अक्षरशः हाणामारीत झाले.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णाचे बिल कमी करावं असं त्याचं म्हणणं होतं पण वाद होऊन या युवकाला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी निर्वस्र करत पट्यांनी मारहाण केली यामध्ये त्या हॉस्पिटलची महिला कर्मचारी यांनी सुद्धा त्या युवकाला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सदरील बातमीतील हॉस्पिटलचे नाव मेड स्टार हे असून हॉस्पिटलमध्ये राम अवतार नावाचा रुग्ण उपचार घेण्यासाठी आला होता त्याचं ऑपरेशन केल्यानंतर हॉस्पिटलने अडीच लाखाचे बिल रुग्णाच्या नातेवाईकांना दिले हे बिल पाहिल्यानंतर नातेवाईकांनी या बिलामध्ये 75 हजारांची सूट द्यावी अशी विनंती हॉस्पिटल कडे करत होते पण हॉस्पिटल मधील कर्मचारी व नातेवाईकांपैकी असलेल्या एका युवकाची या बिलावरून बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर नंतर हाणामारी झाल.
याला एका महिला कर्मचाऱ्यानी देखील पट्ट्याने मारहाण केली तसेच त्या हॉस्पिटलमधील बाकीच्या कर्मचाऱ्यांनी देखील त्याला मारहाण केली त्यानंतर युवक हात जोडून माफी मागत असल्याचे सुद्धा या व्हिडिओत दिसत आहे बिल कमी करायला सांगितलं म्हणून अशा पद्धतीने मारहाण करणे नक्कीच चुकीचे आहे असे मत नेझीटन्स व्यक्त केले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे तसेच हॉस्पिटल चालवणाऱ्या रियाज नामक व्यक्तीला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले आहेत.