गुन्हेगारी

” तुझ्या दुकानात साधी एक बियर नाही का ? ” म्हणत त्याने वाईनच्या व्यवस्थापकासोबत भिडला आणि…पहा सविस्तर.

नांदेड शहरातून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते, एका तरुणानं अत्यंत धक्कादायक असं काम केल. आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास ती मिळाली नाही म्हणून भर बाजारात अनेक जण वाद घालताना आपल्याला पाहायला मिळाले असतील, कधी भाव कमी जास्त करण्यावर किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून खटके उडून असे अनेक प्रकार सर्रासपणे होत असतात. मात्र हा प्रकार थोडा निराळा आहे.

“तुझ्या दुकानात बियर नाही का ? बियर नसेल तर दुकान बंद कर म्हणत तरुणांन वाईन शॉप च्या व्यवस्थापकासोबत वाद घातला. वाद झाल्यानंतर युवक थोडा वेळ बाहेर जाऊन पुन्हा चार ते पाच जणांना घेऊन आला. या युवकांनी दुकानात घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत वाईन शॉप चा व्यवस्थापक जीवनराव वाकोरे यांच्या वरती धारदार शास्त्राने वार केले. आणि त्यामुळे त्या व्यवस्थापकाचा जागेस मृत्यू झाला.

नांदेड शहरातील सिडको भागातील ढवळे कॉर्नर या ठिकाणी असणाऱ्या प्रदीप वाईन्स शॉप मध्ये ही घटना घडली. या रात्रीच्या आठ वाजण्याच्या जवळपास ही घटना घडली असावी, साई इंगळे अशा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी आला त्याने बियरची मागणी केली मात्र बियर उपलब्ध नसल्याचं कर्मचाऱ्यांन सांगितलं, त्यानंतर पसंतीची बियर नाही का असं म्हणत कर्मचाऱ्यांसोबत साई ने वाद घातला.

दुकानातील कर्मचाऱ्यांनी असे वाद नेहमी होतात म्हणून युवकाची दखल घेतली नाही. पुन्हा तोच युवक तीन ते पाच जणांना घेऊन या शॉप वरती आला, लोखंडी गेट तोडून शॉप मध्ये घुसला आणि त्यानंतर त्यांन थेट व्यवस्थापकावरतीच हल्ला चढवला. धारदार शस्त्र ने वार करून आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला.

या हल्ल्यात व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेत सहा आरोपी असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अगदी शुल्लक कारणावरून एवढा जीवघेणा हल्ला होण यात एकाचा जीव जाणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!