अतिवृष्टीमुळे हातात आलेले पिक वाहून गेले, कर्ज फेडू शकत नसल्यामुळे शेतकरी पती पत्नीने उचलले टोकाचे पाऊल.
अकोल्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, शेतकरी पती-पत्नीने आत्महत्या केली ,कर्जाचा डोंगर वाढला की शेतकरी हे टोकाच पाऊल उचलतो , शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे , त्यामुळे कोणत ही संकट आल की शेतकरी हा हवालदिल होतो ,
अकोल्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत झरंडी व गावंडगाव येथे महिलेसह एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाबूसिंग चव्हाण आणि मैनाबाई जाधव असे दोघा मृतकांची नावे आहेत.
मैनाबाई जाधव व बाबुसिंग चव्हाण या दोघांकडे प्रत्येकी तीन एकर शेती आहे. दोघे शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंदाही विविध पिकांची पेरणी केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कर्जाची परतफेड कशी होईल याचा धसका घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले
गावंडगाव येथील मृतक मैनाबाई जाधव हिने विहिरीत उडी घेऊन, तर झरंडी येथील मृतक बाबूसिंग चव्हाण यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळतात ठाणेदार योगेश वाघमारे व सहकारी बाळकृष्ण येवले, भगवंत शिंदे, महादेव बाप्पू, ज्ञानेश्वर गीते, सुरेश चव्हाण आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा केला.