दूरगावचे सुपुत्र शहाजी भगत यांच्या कार्याचा कोल्हापूर मध्ये डंका ! महसूल मंत्री आ. विखे पा. यांनी केले कौतुक.

दूरगावचे सुपुत्र शहाजी भगत यांच्या कार्याचा आता कोल्हापूरमध्ये डंका गाजतोय !
महसूल मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले कौतुक…
राज्यातील अग्रगण्य साखर कारखाने बंद पडण्याच्या अवस्थेत होते त्या कारखान्यांना पुनरुज्जीवित करणारे दूरगावचे सुपुत्र शहाजी भगत यांच्या कार्याचा डंका आता कोल्हापूरमध्ये गाजतोय. अगदी तरुण वयातच मोठ्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊन त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या, आपल्यातील अभ्यासूवृत्ती, आकलनशक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नाची असलेली जाणं, नेतृत्वगुणांच्या जोरावरती त्यांनी अनेक कारखान्यांना उभारी दिली.

अनेक दिग्गज मंडळींच्या कारखान्याची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांच्या कार्यकौश्याल्यामुळे साडेतीनशे कोटी गुंतवणूक असलेल्या 44 मेगावॉट क्षमतेचा राज्यातील सर्वात मोठा वारणानगर इथला ऊर्जांकुर तात्याराव कोरे वारणा पॉवर कंपनीच्या सहवीज निर्मिती प्रकल्प संचालक पदाची धुरा देखील श्री शहाजी भगत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या अगोदर ते वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम सांभाळत होते, त्यांच्या कार्य कुशलते मुळे त्यांच्यावरती सहवीज निर्मिती प्रकल्पाची देखील जबाबदारी देण्यात आली.

वारणा सहवीज निर्मिती प्रकल्पाला व वारणा साखर कारखान्याला तसेच वारणा दूध केंद्राला महसूल मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक दौंडचे आमदार राहुल कुल ,कोल्हापूरचे आमदार विनायकराव कोरे हे देखील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे सत्कार संचालक शहाजी भगत यांनी सत्कार केला.
अहमदनगर जिल्ह्यच्या राजकारणाचे महामेर महसूल मंत्री विखे पाटील जिल्ह्यातीलच दूरगावचे सुपुत्र शहाजी भगत याची हि भेट दरम्यान चर्चा हि झाली. ग्रामीण भागातून आलेल्या भगत यांच्या यशस्वी वाटचाली बद्दल त्यांनी कौतुक केल. संचालक शहाजी भगत यांच्या कामाची जी कार्यपद्धती आहे याची दखल अनेक संस्थांनी घेतली. त्यामध्ये व्हीएसआय याचा मानाचा समजला जाणारा ‘बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर ‘हा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.