खा. राहुलजी शेवाळे यांची सदिच्छा भेट घेवुन चर्मकार समाजाच्या मागण्याविषयी सकारात्मक चर्चा – नगरसेविका सौ. आशाताई सुभाष मराठे.
मुंबई:- चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. संजयजी खामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शिका मा. नगरसेविका सौ. आशाताई सुभाष मराठे यांचे नेतृत्वाखाली मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा खासदार मा. राहुलजी शेवाळे यांची सदिच्छा भेट घेवुन चर्मकार समाजाच्या मागण्या विषयी सकारात्मक चर्चा केली.
या प्रसंगी मुंबई, देवनार येथील लिडकॉम च्या जागेत संत रविदास महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच चर्मकार विकास केंद्र करण्यात यावे, मुंबईत गटई कामगारांना पीच परवाना द्यावा, स्वयं रोजगारासाठी जाचक अटी रद्द करुन विनातारण,विना जामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
या वेळी वरील सर्व मागण्याचा सहानुभूती पूर्वक विचार करून शासन स्तरावर पाठपुराव्याने समाजाला न्याय मिळवून देईन असे आश्वासन खासदार मा. राहुलजी शेवाळे साहेब यांनी दिले.
या शिष्टमंडळात श्री राजेश साबळे (सहसचिव महाराष्ट्र), श्री अशोक कांबळे (गटई कामगार अध्यक्ष), श्री हंसराज रेगर (रेगर समाज अध्यक्ष), सौ. चेतना कोरगावकर, सौ. मीनाक्षी ताई सोनावणे ( जिल्हाध्यकक्षा उत्तर पश्चिम), प्रकाश चिमणकर (घाटकोपर तालुकाध्यक्ष), राजेंद्र ठोसर (तालुका सचिव), श्री. राहुल कांबळे, इत्यादी मान्यवरासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सुभाष मराठे – निंमगावकर
अध्यक्ष,
चर्मकार विकास संघ, मुंबई प्रदेश.