दहावीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली मोठी घोषणा
शालेय शिक्षणातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी कोरोना काळानंतर पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर याचा निकाल कधी लागणार या याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांमध्ये होती इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जूनला लागणार हे जाहीर झाल्यावर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ही परीक्षा देत असत
१७जून ला या दिवशी दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहेत. राज्य मंडळातर्फे ही तारीख जाहीर करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बद्दल ची संपूर्ण माहिती दिली
आपल्या पाल्याचा निकाल अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही निकाल मिळवू शकता
१.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
२.वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
३.त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
४.पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
५.प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
६.निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
या पद्धतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळे यांनी घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आपण मिळवू शकता यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल काय लागतोय याकडेच सर्वांचे लक्ष निकालात कोण बाजी मारत आहे याची सर्वांना आतुरता!