” कर्मचाऱ्यांनो संपावर जाताय ना ? पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ” – पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी सालीमठ.
शासकीय कर्मचारी उद्यापासून संपावर चालले आहेत पण यावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे काय म्हणतात याबद्दल आपण जाणून घेऊ,
संपाच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी काळजी घ्यायची आहे. अत्यावश्यक सेवा या नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यायची आहे असं जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितला आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, शासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जात आहेत या संपाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा या नियमितपणे सुरू राहिल्या पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपाच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुख आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस जिल्हाधिकारी बोलत होते. संपाच्या काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस देखील काढण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयामध्ये उपस्थित राहायचे आहे. कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची व्यवस्था करायची आहे ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी आवश्यकता असल्यास गृहरक्षक पोलीस दलाची मदत घ्यावी असं जिल्हाधिकारी म्हणाले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाने “ काम नाही वेतन नाही “ हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात यावे शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम अंतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत. रुग्णालय, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह जनतेशी निगडित सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले आहे. सध्या दहावी व बारावीचे परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षांमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी देखील शिक्षण विभागाने योग्य ती काळजी घ्यायची आहे त्यासाठी पर्यायी मनुष्यबळ देखील उपलब्ध करावे असं जिल्हाधिकारी म्हणतात.
विभाग प्रमुखांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही रजा मंजूर करू नये जनतेला सेवा मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या आहेत.